Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

चैत्यभूमी विकास प्राधिकरण स्थापनेस विलंब
सकाळ वृत्तसेवा
Sunday, April 18, 2010 AT 12:37 AM (IST)

मुंबई -  चैत्यभूमीच्या विकासासाठी राज्य शासनाच्या पुढाकाराने इंडिया युनायटेड (इंदू) मिलची जागा केंद्र सरकारकडून मिळविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असून त्यासाठी चैत्यभूमी प्राधिकरण स्थापन करण्याचे आदेश राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीत देवूनही राज्याच्या मुख्य सचिवानी जीआर काढण्यास विलंब केला आहे. या ऐतिहासिक कामाला गती देण्यासाठी प्राधिकरणाची लवकरात लवकर स्थापना करण्याची मागणी आमदार संजय दत्त यांनी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्‌द्‌याद्वारे केली.

इंदू मिलची जागा चैत्यभूमीच्या विकासासाठी संपादित करण्यासाठी राज्याचे नगरविकास खाते तसेच केंद्र सरकारचा वस्त्राद्योग विभाग यांची गेल्या 8 मार्च रोजी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक झाली. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही या प्रकरणी लक्ष घातले आहे. केंद्रीय वस्त्राद्योग मंत्री दयानिधी मारन यांच्याशी चर्चा करण्यासाठी तसेच प्राधिकरण स्थापन करण्यासाठी जीआर काढण्यात मुख्य सचिव विलंब लावत असल्याची बाब आमदार दत्त यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. राज्याच्या मुख्य सचिवांनी तत्काळ जीआर काढावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
प्रतिक्रिया
On 30/07/2011 01:21 PM manoj said:
भारता भारता तू कशाचा महान रे तुझ्याच घटनाकाराचा इथे होतो अपमान रे मग तू कशाचा महान
On 26/07/2011 12:54 AM santosh shelke said:
एवड्या मोठ्या महापुरुषाचे स्मारक बांधायला विलंब लावायला नको , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे झ्हालेच पाहिजे.
On 23/07/2011 01:54 PM asit shinde said:
मला वाटते महाराष्त्रापेक्ष उत्तर प्रदेश मध्ये बाबासाहेबांना जास्त मानत असावेत,एवढ्या मोठ्या थोर पुर्षाच्या नावाने नुसते मत मागायचे काम फक्त इथील स्थानिक नेते करतात.निवडणुकी पुरते हा विषय असतो.पण आता फार विलंब लावायला नको.
On 01/06/2011 11:21 AM valmik trihbuvan said:
महाराष्ट्र सरकार लाजवाट ली पाहिजे
On 8/28/2010 9:59 AM kedar joshi said:
मुख्य मंत्र्यांच्या बंगल्या साठी करोडो रुपये खर्च झाल्या नंतर पैसा शिल्लक राहिला नसेल ..असो


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: