Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

ऍग्रोवन आता ई पेपर स्वरुपात
सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, April 19, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: agrowon,   e paper,   snn,   pune

पुणे - सकाळ माध्यम समूहाचे कृषी दैनिक "ऍग्रोवन'चा पाचवा वर्धापनदिन मंगळवारी (ता. 20) साजरा होत आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ऍग्रोवनच्या "ई-पेपर'चा उद्या (ता. 19) मुंबईत प्रारंभ होणार आहे. त्यामुळे ऑनलाइन वाचकांना ऍग्रोवन जशाच्या तशा स्वरूपात http://epaper.agrowon.com/ या वेबलिंकवर वाचायला मिळणार आहे.

लोक-पत्रकारितेला (सिटिझन जर्नालिझम) प्रोत्साहन देण्यासाठी वाचकांना बातम्या, लेख, माहिती "ऍग्रोवन'कडे पाठविण्याची व्यवस्था हे ऍग्रोवनच्या "ई-पेपर'चे वेगळेपण आहे. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढतो आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी सातत्याने ऍग्रोवनच्या "ई-पेपर'ची मागणी नोंदवली होती. राज्यासह देशभरातून, तसेच अमेरिका, युरोप, मध्य-पूर्व, ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झालेल्या आणि महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात रस असणाऱ्या वाचकांनी सातत्याने या मागणीचा पाठपुरावा केला होता. वाचकांची ही मागणी अत्याधुनिक सुविधांसह आता "ई-पेपर'मधून पूर्ण होत आहे.

संगणकाच्या पडद्यावर सुव्यवस्थितपणे वाचता येईल, अशी या "ई-पेपर'ची रचना आहे. पडद्यावरील पानाचा आकार लहान- मोठा करण्याची, एकाचवेळी एक किंवा दोन पाने वाचण्याची सुविधा त्यात आहे. वाचकांना संपादकीय विभागाशी थेट संवाद साधणे सुलभ व्हावे, यासाठी "ई-पेपर'मध्येच पत्र पाठविण्याचीही सुविधा आहे. विशेष म्हणजे, आपल्या भागातील कृषिविषयक माहिती "ऍग्रोवन'पर्यंत पोचविण्यासाठीची स्वतंत्र सुविधाही "ई-पेपर'मध्ये आहे. या सुविधेद्वारे वाचक त्यांची बातमी "ऍग्रोवन'पर्यंत पोचवू शकतात.

"माय विश्‍व डॉट कॉम'चे साहाय्य
ऍग्रोवनच्या "ई पेपर'साठी "माय विश्‍व डॉट कॉम' या अमेरिकास्थित मराठी उद्योगाचे तांत्रिक साहाय्य घेण्यात आले आहे. "ई-पेपर'मध्ये नजीकच्या काळात आणखी सुविधा उपलब्ध करून देऊन वाचकांशी नाते अधिकाधिक बळकट करण्याचा प्रयत्न ऍग्रोवन करणार आहे.
प्रतिक्रिया
On 13/01/2012 01:53 PM ramdas aghav said:
१ च nabar
On 03/01/2012 12:58 PM AMOL DESHMUKH said:
माज्याकडे दालीम्बाची बाग आहे पण थोडा प्रोब्लेम आहे कि झाडे मोठी होत नाहीत, की माहित मिळू शकते का प्ल्झ.....
On 06/12/2011 09:26 PM Raj wadikar bidar karnataka said:
इ -पेपर उपलब्ध करून दिल्या बद्धल सकाळ चा मी खूप खूप आभारी आहे
On 26/11/2011 05:48 PM Satyajit said:
Plz Sent Date 07 Sap.2011 Epaper Sent on My E-mail ID
On 13/11/2011 11:09 AM chetan anil chaudhari said:
agro1 team congrats u r no1...just do one thing..bharpur ase project aahet sheti related je apure aahet je purna zalyas hajaro shetkari sujalam sufalam hotil..Eg.chopada talukyatil Dharan.asha prakalpancha tumhi path purava karava ashi mazi ichha aahe.. thank you..
On 05/11/2011 08:34 AM Sayyed bablu--Editor Tejwarta said:
Agrowon Shetkryanchi Prerna V atmavishvas vadhvinara Mitra ahe. shetila mukhya darja dene kalachi garaj ahe. Agrowon che Aabhar.
On 01/11/2011 02:10 PM nikhil chaware said:
धन्यावंद आम्हाला अ ग्रो वन पेपर आन लाईन करून दिल्याबद्दल ......मनापासून तुमचे आभार
On 23/10/2011 12:02 PM ASHOK LENDVE said:
THIS IS A CHANCE FOR WHO WANT TO DEVELOP HIS FARM AND LIFE ALSO
On 19/10/2011 11:05 AM digambar mane said:
vardhapan dinacha hardik shubheccha.!!
On 05/09/2011 07:37 AM rahul kumbharde said:
अँग्रोवन हा सकाळचा छान उपक्रम आहे
On 04/09/2011 11:08 AM suresh patil said:
thanks for agrowoneproviding valuable information online
On 05/07/2011 09:44 AM deshpande d b said:
last year varun yantra was used by a number of farmers.Why it is not used this yearwhen the rain is delayed?
On 27/06/2011 08:08 PM GANESH GAIKWAD said:
SAKAL THANQU
On 27/06/2011 08:08 PM GANESH GAIKWAD said:
SAKAL THANQU
On 01/01/2011 01:14 PM padmakar rokade said:
as on today labour is one of the major problem in agriculture, nobody wants to do labour work in this modern world,as developement progresses no new labour class will born ,as in western countries they found mechanization of agiculture as a solution to this problem to minimize labour.so its requested that more publicity is to be given on whatever new techniques developed in our country to cut down labour.thanx
On 01/01/2011 12:56 PM padmakar rokade said:
as i m serving in state govt in urban areas online agrowon is very helpful for me to keep close supervision on my farm with new technologies and experiace of farmers,very thankful to agrowon teem
On 05/10/2010 07:38 PM rameshwar takalkhede said:
अग्रोवन खूप रंजक व माहितीपूर्ण व शेतीविषयी नवीन चेतना उत्साह देणारा पेपर आहे .इंटरनेट वर विदर्भ आवृत्ती मिळाल्यास सोयीस्कर होईल .धन्यवाद.
On 7/19/2010 12:57 PM KOMALSINGH PAWAR said:
सकाळ ला माझ्या हार्दिक शुभेचा अग्रो वन दैनिक हे शेत्कारांसाठीच नवे तर सर्वांसाठी अत्यंत उपुक्त दैनिक आहे .मी नौकरी करून शेती करतो मला अग्रो वन कडून जर महाराष्ट्रातील डाळींब बागायतदारांची माहिती मिळाली तर फार बरे होईन ..पुन्हा एकदा धन्यवाद ....कोमलसिंग पवार ..
On 5/20/2010 4:27 PM Avchat Umesh said:
धन्यवाद सकाळ. आता आम्हासारख्या सैन्यात राहून आपल्या शेतीची काळजी घेणारांची सोय होईल.
On 4/21/2010 10:58 AM Gorakh Sonawane said:
सकाळ चे अभिनंदन ! आणि खूप शुबेच्छा !!!!
On 4/20/2010 9:36 PM Sagar Patil (Koulavkar Patil) Shirol said:
सकाळचा मी आभारी आहे.
On 4/19/2010 6:03 PM VAibhav said:
Thanks for giving u best service
On 4/19/2010 2:42 PM RANGA PATIL , SINGAPORE said:
thanks . Sakal is really doing agreat job. I think this would be the first reputed Indian e paper dedicated to agriculture. All the best.....
On 4/19/2010 2:42 PM संदीप रणदिवे said:
खूपच छान, सकाळचा मी आभारी आहे.
On 4/19/2010 10:54 AM Sanjay Tambe said:
एग्रो one ने आम्हा सगळ्यांना त्यांचा पेपर ऑनलाइन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो .....
On 4/19/2010 9:01 AM Dnyaneshwar Vasaikar said:
एग्रो one ने आम्हा सगळ्यांना त्यांचा पेपर ऑनलाइन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो .....
On 4/19/2010 3:16 AM dr.h.m.datar nasikroad said:
माझ्यासारख्यांना बंगल्यातील जमिनीची सोयील टेस्टिंग अग्रोवोन करून देत असल्यास आभारी होईन


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: