Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

बंगळूर स्फोटामुळे राष्ट्रकुलावर परिणाम नाही!
पीटीआय
Tuesday, April 20, 2010 AT 12:00 AM (IST)
मेलबर्न - बंगळूर स्फोटामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सहभागावर कोणताही परिणाम होणार नाही, असे राष्ट्रकुल क्रीडा संघटनेचे सचिव पेरी क्रॉसव्हाईट यांनी सांगितले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी दिल्लीत येणाऱ्या क्रीडापटूंना लक्ष्य करण्यात येईल, असा इशारा "अल्‌ कायदा' संघटनेने दिला आहे; मात्र त्यानंतरही ऑस्ट्रेलियाने आपला सहभाग निश्‍चित असेल, असे स्पष्ट केले. बंगळूर स्फोटानंतर कोणाही क्रीडापटूने सुरक्षाव्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी आपल्याशी संपर्क साधला नसल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रकुल स्पर्धेपर्यंत या प्रकारच्या घडामोडी कदाचित घडत राहतील; पण सुरक्षाव्यवस्थेनुसार सध्या तरी राष्ट्रकुल स्पर्धेस कोणताही धोका नाही, असेही त्यांनी सांगितले.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: