Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

प्रसारण हक्कांबाबत २७५ कोटींचा गैरव्यवहार
सकाळ वृत्तसेवा
Friday, April 23, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: ipl,   telecast,   fraud,   sports

मुंबई - इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या गैरव्यवहारातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून, त्यानुसार प्रसारण हक्कांबाबतचा सर्वांत मोठा गैरव्यवहार समोर येण्याची शक्‍यता आहे. एका खासगी वाहिनीने दिलेल्या बातमीनुसार प्राप्तिकर खात्याला चौकशीदरम्यान मिळालेल्या कागदपत्रांवरून "आयपीएल'चे प्रसारण हक्क देताना मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत असून, हा गैरव्यवहार तब्बल 275 कोटी रुपयांचा असण्याची शक्‍यता आहे.

"आयपीएल'च्या प्रसारण हक्कांशी संलग्न असणाऱ्या तीन कंपन्यांवर प्राप्तिकर खात्याकडून छापे टाकण्यात आले असून, गेले सत्तावीस तास ही चौकशी अखंड चालू आहे. प्राप्तिकर खात्याने याविषयी अजून अधिकृत टिप्पणी केलेली नाही. तरी आतापर्यंतच्या तपासात 275 कोटी रुपयांचा हिशोब नसल्याचे उघडकीस आले आहे. केवळ 125 कोटी रुपयांचाच हिशोब देण्यात आला आहे. मोदी यांनी आपल्या जवळच्या नातेवाइकांना प्रसारण अधिकार दिल्याचेही समोर येत असल्यामुळे प्राप्तिकर अधिकारी या प्रकरणी पुन्हा मोदी यांची चौकशी करू शकतात.
प्रतिक्रिया
On 4/23/2010 9:33 AM Rakesh said:
फक्त २७५ कोटी ?? २००० कोटी च्या पुढे आकडा असणार यात काहीच शंका नाही ...


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: