Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

ऑपरेशन रेड लोटस्‌: जाज्ज्वल्य मराठा इतिहास
सम्राट फडणीस (samrat.phadnis@esakal.com)
Saturday, April 24, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: exclusive,   esakal,   tatya tope

सम्राट फडणीस (samrat.phadnis@esakal.com)
 
'मॅनपॉवर', 'लॉजिस्टिक', 'कम्युनिकेशन टूल्स' ही एकविसाव्या शतकातील कोणत्याही यशस्वी 'प्रोजेक्‍ट'मागची शक्ती. एखादा प्रकल्प, 'मिशन' आखून ते शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी या तीन तंत्रांचा उपयुक्त वापर अनिवार्य. एकविसाव्या शतकातील यशाची ही त्रिसूत्री बरोबर १५३ वर्षांपूर्वी एका मराठा योद्‌ध्याने वापरली. इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. पारतंत्र्यात राहून निबर बनलेल्या भारतीय मनांना प्रज्ज्वलित केले. जगाच्या इतिहासात १८५७ चे स्वातंत्र्य समर अजरामर केले.
तात्या टोपे हे त्या मराठी योद्‌ध्याचे नाव.
  • नवी दृष्टी का हवी?
    आज दीडशे वर्षांनंतरही या नावाची जादू, मोहिनी ताजी टवटवीत. महान योद्धा, अतुलनीय कुटनीतीज्ज्ञ आणि अत्यंत कुशल नियोजनकार अशी तात्या टोपे यांच्या व्यक्तीमत्वाची विविध अंगे. गुलामगिरीचे जोखड फेकून देऊन स्वदेशाची हाळी देणारा आणि आधुनिक एकात्मिक भारतासाठीभविष्याचा पाया घालणारा हा योद्धा इतिहासात सुवर्णाक्षरात झळाळतो आहे. या झळाळीवर पडलेला एक डाग आता दीडशे वर्षांनंतर पुसण्याचा प्रयत्न झाला आहे. 'ऑपरेशन रेड लोटस्‌' या ग्रंथाने ही कामगिरी बजावली आहे. विशेष म्हणजे तात्या टोपे यांच्या वंशजांनी चार वर्षे अथक परिश्रमाने हा ग्रंथ सिद्ध केला आहे. 'तात्या टोपे यांना इंग्रजांनी फाशी दिली,' हा आजवर वाचलेला इतिहास चुकीचा होता, हे या ग्रंथाने सप्रमाण दाखवून दिले आहे. 'तात्या टोपेंना इंग्रजांशी लढताना वीरमरण आले...', हा नवा ऐतिहासिक पुरावा या ग्रंथाने जगासमोर आणला आहे.

  • संशोधनाची सिद्धता
    'भारताचा विशेषतः 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामाचा बहुतांश इतिसाह हा इंग्रजी दृष्टिकोनातून लिहिला गेला आहे. म्हणून याला बंड म्हणून पुढे आणले गेले. हे बंड नव्हते. हे स्वातंत्र्य युद्ध होते. तात्या टोपे त्याचे निर्णायक नेते होते. हा इतिहास आम्हाला कधी शिकवलाच गेला नाही. म्हणूनच संशोधन करून स्वतःच हा इतिहास उजेडात आणण्याचे ठरवले...', 'ऑपरेशन रेड लोटस्‌'चे लेखक पराग टोपे सांगतात. 'ई सकाळ'शी बोलताना इतिहासातल्या अनेक पैलूंवर ते कसलेल्या इतिहास संशोधकाप्रमाणे प्रकाश टाकतात. तात्यांचे उत्तर भारतातील संघटन, युद्धे, प्रवास याचे वर्णन अत्यंत तन्मयतेने करतात. साहजिकच पहिला प्रश्‍न पडला, तो पराग मुळचेच इतिहास संशोधक आहेत का?...

  • ग्रंथाची तयारी
    'नाही. मी अमेरिकेत असतो. सॅनफ्रान्सिस्कोला. व्हिस्टारस ही माझी कंपनी. व्यवसायाने मी मॅकॅनिकल इंजिनिअर. नंतर फायनान्स ऍन्ड स्ट्रॅट्‌जीमध्ये एमबीए केलेय. १८५७ ला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याच्या बातम्या २००६ मध्ये येत होत्या. १८५७ चा जो इतिहास आपण शाळेत शिकलो आणि तात्या टोपेंनी जे कार्य केले, त्यामध्ये खूप तफावत होती. शिकवला गेलेला इतिहास खूप छोट्या दृष्टिकोनाचा होता. दीडशेव्या वर्षानिमित्त आपण इतिहास नव्या दृष्टिकोनातून अभ्यासला पाहिजे, अशी आमची चर्चा होत होती. बहिणी रुपा जोशी-टोपे हीने हा विषय मांडला. मी पुस्तक लिहायचे ठरवले,' अशी 'ऑपरेशन...'ची जन्मकथा पराग मांडतात.

  • मध्य, उत्तर भारतात धांडोळा
    'सप्टेंबर २००६ पासून कामाला सुरूवात केली. २००९ च्या डिसेंबरमध्ये पुस्तक पूर्ण झाले. तात्या टोपेंशी निगडित खूपशा दंतकथा आहेत. त्या सगळ्या पूर्ण बाजूला ठेवून सगळे संशोधन केले. त्यांची कर्मभूमी उत्तर भारत होती. दिल्ली, भोपाळ, ग्वाल्हेर, झांसी, कानपूर, बिठूर या ठिकाणी जाऊन सगळे अर्काईव्ह्ज्‌ तपासले. ग्रंथालयांमध्ये तासन्‌तास बसलो.', ग्रंथाचा प्रवास पराग सांगू लागतात...'सर्वात महत्वाचे संशोधन होते, ते भोपाळ अर्काईव्ह्ज्‌मध्ये मिळालेली सव्वोश उर्दू पत्रे. फेब्रुवारी-मार्च १८५८ मध्ये तात्या टोपे यांना लिहिली गेलेली ही पत्रे होती. काही पत्रे नानासाहेबांच्या कोर्टातून, काही अखबार नवीसमार्फत, काही सैन्यातील अधिकाऱ्यांनी, काही खबऱ्यांनी लिहिलेली अशी ही पत्रे. ही पत्रे नुसत्या उर्दूत नव्हे, तर खते शिकस्तामध्ये होती. खते शिकस्ता वाचता येणारी खूप कमी लोकं असतात. त्यांना शोधण्यात आम्हाला जामियामिलियॉं विद्यापीठाच्या प्रा. अझिझुद्दीन यांची मदत लाभली. त्यांच्यामुळे आम्हाला अमीन उल्ला यांना भेटता आले. त्यांनी ही पत्रे वाचून दिली. या पत्रांमधून उलगडलेला इतिहास खूप वेगळा होता. त्यावेळी भारताचा बराचसा भाग स्वतंत्र झालेला होता. त्यावेळचे सरकार कसे चालवले जात होते, याची माहितीही पत्रांमध्ये होती. ग्रंथातील अत्यंत महत्वाच्या भागांपैकी हे एक संशोधन आहे.'

  • तात्यांची व्युहरचना
    पराग टोपे यांना इतिहासाचा दृष्टिकोन बदलायचा होता. त्यासाठी संशोधन अधिक सखोलपणे आणि वेगवेगळ्या साधनांद्वारे करणे गरजेचे होते. फक्त इंग्रजांचीच माहिती वापरली, तर इतिहासावर इंग्रजांचाच प्रभाव राहिला असता. त्यामुळे इंग्रजांचे गुप्तचर अहवाल वापरले, तरी त्याला नकाशाची जोड दिली. तात्यांच्या सैन्याच्या हालचाली नकाशावर अधिक प्रभावीपणे उमगत गेल्या. परिणामी, नोव्हेंबर 1858 च्या काळात मुळताई (मध्यप्रदेश)पासून पिपळज, राजपूरपर्यंत (गुजरात-मध्य प्रदेश सीमा) असे तात्यांचे सैन्य अघाडीवरच चालले असल्याचे पुढे आले. तात्यांची व्यूहरचना पराग यांनी अत्यंत उत्तमपणे पुस्तकात उभी केली आहे. इंग्रजांचे सैन्य महत्वाच्या शहरांमध्ये केंद्रीत होते. त्यांना शहरांमधून बाहेर काढून लढायला भाग पाडण्याची तात्यांची योजना होती. त्यासाठी तात्या गुजरातच्या पंचमहलमध्ये नाईकदास आदीवासींची मदत घेऊन लढले, तर बांसवाडामध्ये भिल्लांच्या मदतीने युद्ध केले. अखेरीस तात्यांनी इंग्रजांच्या सैन्याला शहरांमधून बाहेर काढलेच.

  • १८५७ ची फळे
    'मुख्य युद्धापूर्वी बादशाह बहाद्दूरशहा जफरच्या नावाने एक जाहिरनामा काढला होता. इंग्रजांनी भारताला कसे लुटले आहे, याची माहिती आणि या जोखडातून मुक्ततेची हमी या जाहिरनाम्यात होती. त्यात करप्रणाली, व्यापाराची एकाधिकारशाही, कामगारवर्गाची गुलामी, सरकारी नोकरीतील जाच, ख्रिस्ती धर्म हा सरकारी नियम आदींचा समावेश होता. आर्थिक, वैयक्तिक आणि राजकीय स्वातंत्र्याची घोषणा या जाहिरनाम्याने केली. १८५७ च्या युद्धामुळे इंग्रजांनी खिस्ती सक्ती दूर केली. भारत राष्ट्र म्हणून जिवंत राहिला. या युद्धाचेच हे फळ होते. अर्थातच, या घोषणेनंतरही संपूर्ण विजयासाठी तात्या लढत राहिले. आपल्याला झांसीच्या लढाईपर्यंतच तात्या माहिती आहेत. प्रत्यक्षात ते त्याही नंतर लढत होते...', याकडे संशोधक पराग लक्ष वेधतात.

  • तात्यांचा मृत्यू रणांगणावर
    'ऑपरेशन रेड लोटस'चे सर्वांत महत्वाचे संशोधन म्हणजे तात्यांच्या मृत्यूवर टाकलेला प्रकाश. मध्य प्रांतात तात्या आणि उत्तर भारतात फिरोजशहा लढत होता. १८५९ च्या जानेवारीत दोन्ही सैन्य एकत्र येऊन त्यानंतर इंग्रजांच्या छत्राखालील शहरांवर हल्ला करणार होते. १ जानेवारी १८५९ ला राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर छिपाबरोट येथे सकाळी साडे सात वाजता इंग्रजांसोबत तात्यांच्या सैन्याची लढाई झाली. ब्रिगेडियर सॉमरसेट याच्या नेतृत्वाखालील सैन्याला तात्या भिडले. इंग्रजांच्या सैन्यात मेजर पॅजेटच्या नेतृत्वाखाली तोफखाना होता. या लढाईचे वर्णन मेजर पॅजेटच्या बायकोने, जॉर्जिया पॅजेटने १८६५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात आले आहे. 'कॅम्प ऍन्ड कॅन्टॉनमेन्ट'नावाच्या या पुस्तकाला खुद्द मेजर पॅजेटची प्रस्तावना आहे. 'पांढऱ्या घोड्यावर स्वार झालेला शुभ्र वेशातला नेता त्यांच्या सैन्याला प्रोत्साहन देत होता. घोडा दौडत होता. अचानक एक तोफगोळा आला आणि घोड्यावर आदळला. घोडा कोसळला. नेता कोसळला. त्यांचे सारे सैन्य हादरले. पडलेल्या नेत्याभोवती गोळा झाले. हा नेता होता तात्या टोपे...'. या युद्धात जखमी झालेल्या तात्या टोपे यांचे नंतरच्या दोन-तीन दिवसांत निधन झाले. त्यांना युद्धमरण आले.

  • फाशी दुसऱ्यालाच
    'तात्यांसारखा नेता गेला, हे समजले, तर सैन्याचे मनोबल तुटून पडेल, याची माहिती रावसाहेब, फिरोजशहा यांना होती. म्हणूनच त्यांनी तात्यांचा मृत्यू जाहीर केला नाही. ते तात्यांच्या नावानेच लढत राहिले. तात्या गेले, हा गुप्तचर अहवाल इंग्रजांना मिळत होता. पण, मृत्यू जाहीरही होत नव्हता. अखेरीस इंग्रजांनी भागवत नावाच्या एका माणसाला शिवपुरीत पकडले आणि तात्या टोपे म्हणून त्याला फाशी देऊन युद्धाची अखेर केली...मात्र, ज्यांनी ज्यांनी या माणसाला पाहिले, त्यांना हा माणूस तात्या टोपे नव्हे, याची खात्री होती. म्हणूनच तात्या जिवंत असावेत, अशा अफवाही पसरत गेल्या. तात्यांच्या नावाने अनेक दंतकथा तयार झाल्या...', इतिहासातली एक अत्यंत संवेदनशील कथा पराग यांनी एकविसाव्या शतकात साधार उलगडली आहे.

  • 'ऑपरेशन रेड लोटस' का?

     प्रत्यक्ष युद्धापूर्वी अनेक सैन्यांमध्ये रोज एक माणूस कमळाचे फूल घेऊन येत असे. हे फूल तो माणूस पहिल्या सैनिकाच्या हातात देत असे. तो सैनिक पाकळी काढून मागच्या सैनिकाकडे देत असे. या क्रमाने प्रत्येक सैनिक एक पाकळी काढून घ्यायचा. अखेरच्या सैनिकाच्या हातात कमळाची दांडी राहिली, की ती मुळ माणसाकडे परत दिली जात असे. अनेकदा हा प्रकार श्रद्धा म्हणून पाहिला गेला. प्रयक्षात 'आपली माणसं किती', हे मोजण्यासाठी तात्यांनी केलेली ही योजना होती. कमळाला विशिष्ट पाकळ्या असतात. ज्याच्या हातात पाकळी, तो आपला सैनिक, ही तात्यांची खूणगाठ होती.

    - युद्धापूर्वी अनेक गावांमध्ये काही माणसे चपात्या किंवा पोळ्या घेऊन जायची. गावकऱ्यांना एकत्र करून या चपात्या खाल्ल्या जात असत. हजारो गावांमधून अशा चपात्या युद्धापूर्वी पोहोचवल्या गेल्या. प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले, तर सैन्याला रसद पुरवठा कसा करायचा, याची योजना या चपात्यांच्या वाटपातून साकारली गेली.

    - युद्ध सुरू होण्यापूर्वी सहा महिने अगोदर मथुरेला मोठ्या यज्ञाची घोषणा केली गेली. यज्ञात सहभागी होणाऱ्या ब्राम्हणांना सात लाख रुपये (आताचे सुमारे 35 कोटी रुपये) दक्षिणा देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. या यज्ञाच्या निमित्ताने गोपनीय माहितीची देवाण-घेवाण सुकर झाली. अनेक राजांचे राजगुरू संदेश घेऊन सगळीकडे संचार करू लागले. हा यज्ज्ञ ग्वाल्हेरच्या बायजाबाई शिंदे यांनी आयोजित केला होता.

    या तिन्ही योजनांमुळे १८५७ च्या प्रत्यक्ष युद्धापूर्वीची तयारी करता आली. 'मॅनपॉवर', 'लॉजिस्टिक' आणि 'कम्युनिकेशन', 'इंटेलिजन्स्‌' या साधनांची चाचपणी आणि व्यवस्थापन करता आले. या योजनांचे सूत्रधार होते तात्या टोपे. म्हणून या ग्रंथाचे नाव आहे, 'ऑपरेशन रेड लोटस्‌'

    ऑपरेशन रेड लोटस
    लेखक - पराग टोपे
    प्रकाशक - रुपा ऍन्ड कंपनी, नवी दिल्ली
    पृष्ठसंख्या - ४६८
    प्रकाशन - १ जानेवारी २०१०
    हिंदी आणि मराठीतही अनुवाद होणार 
     
     

    तात्या टोपे परिवार (१९३२)
     

    कुंवरसिंग मिर्झापूर
     

     
     

    तात्या टोपे परिवार (२०१०)
     

    उर्दू पत्र

प्रतिक्रिया
On 8/14/2010 12:46 AM samidha patil said:
realy tatya tope was great worrier and also great freedom fites.but you know our history book should change the conten of '1857 band' to '1857 che swantantrya samer'.
On 7/26/2010 1:52 AM madhav vad said:
पराग टोपे हास दोने अ ग्रेअत हिस्तोरीकॅल्क वोर्क व्हीच शाल ओपेन इयेस ऑफ हिस्तोरींस इन स्वतंत्र भारत अंड हिस्तोर्य बे व्रीत्तेन इन भारतीय कोन्तेक्ष्त विएव पोइंत यौर वोर्क इस नोने लेस ठाण स्वातंत्र्य वीर सावरकर व्हो रेनामेद १८५७स वर ऑफ इंदीन्देन्चे रात्हेर ठाण सेपोय मुतीन्य .कीपित उप वाद माधव गों वा, भारत
On 7/21/2010 1:38 AM Milind Kawale said:
धन्यवाद, टोपे साहेब मराठी आवृत्ती लवकरात लवकर वाचायला मिळावी हि कळकळीची विनंती, जयहिंद मिलिंद कावळे अलिबाग
On 6/24/2010 9:56 PM girish said:
टोपे साहेब - आपण खरोखर एक छान आणि तितकेच महत्वाचे काम हे पुस्तक लिहून केले आहे. याबद्दल आपलयाला धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत. मुंबईच्या लऑ कॉलेजचे प्राचार्य टोपे हे पण आपल्यापैकीच का?
On 6/22/2010 1:46 PM Mangesh Pandit said:
Very Nice Mission अशा गोष्टीनी पूर्वजांचा उद्धार होतो
On 6/17/2010 1:15 PM संजय तांबट said:
सम्राट, खूपच छान लेख. पराग टोपेंनी केलेलं काम खरंच खूप अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे. नव्या इतिहासलेखनाची ही नांदी असावी.
On 6/16/2010 4:47 PM S Phapale said:
मला मराठा असल्याचा अभिमान वाटतो....
On 20/05/2010 9:55 PM Sarang Madgulkar said:
श्री. पराग टोपे यांचे अभिनंदन ! त्यांनी खरच एक महत्वपूर्ण काम केले आहे. आपला तेजस्वी इतिहास आपल्याला माहिती असलाच पाहिजे. ... सम्राट फडणीस यांनी उत्तम लेख लिहिला आहे. धन्यवाद !!
On 5/20/2010 6:49 PM Lalit Mahadeshwar said:
श्री पराग टोप्यांना मानाचा मुजरा ! आमच्या पूर्वजांचे पराक्रम स्वकष्टाने मेहनतपूर्वक आणून तुम्ही आम्हाला व सर्व भावी पिढ्यांना उपकृत केले आहेत. तात्यांच्या घराण्यात तुम्हाला जन्म मिळाला त्याचे सार्थक केलेत. सम्राट, ह्या पुस्तकाच्या सुंदर ओळखीसाठी, धन्यवाद !
On 14/05/2010 16:38 sasonkar yardena israel said:
पराग मला तुमचा लेख खूप आवडला खूप चांगली माहिती आहे हल्ली इस्राईल मध्ये केबल लाईनवर झी टीवी वर मालिका सुरु झाली आहे झांशिकी राणी त्या मालिकेत मुख्य किरदार तात्या टोपे आहेत आणि मनुचे ट्रेनर पण असे मला वाटते बेस्ट ऑफ लक पराग अशीच अजून माहिती असेल तर जरूर द्या वाचाला जरूर आवडेल सासोन्कर यार्देना इस्राईल
On 5/13/2010 3:41 PM viki said:
पराग टोपे नि फार सुंदर काम केला आहे...पण दुर्दैव अस आहे कि आजकालच्या मराठी तरुण तरुणींना याचा काही घेण -देन नाही....शिवाजी महाराज फक्त कसे बसे आठवतात लोकांना...संभाजी राजे,सदाशिवभाऊ ,बाजीराव,राघोबादादा,माधवराव पेशवे यातला कोणाबद्दल विचारला तर परग्रहावरची लोक असतील अशी तोंड होतात या लोकांची....m-tv ,channel v वरच्या लोचट कार्यक्रम मध्ये खूप रस आहे लोकांना..तात्या टोपे चा महापराक्रम तुम्ही परिश्रम ने प्रसिद्ध केलात....अभिनंदन......आशा करू या कि जाज्वाला मराठा इतिहास पासून तरुण मंडळी काही बोध घेती.
On 5/12/2010 7:06 PM Dr BHOKRE A P said:
Wonderful discovery. Our history is still unknown to us and what britishers have written is taught in the school and colleges. But it is difficult to tarce this history since we indians dont have the habit of writing the documents. But the research and painstaking efforts taken by Parag Tope will put a new dimension to 1857 Fredom Struggle.Our heartful congratulations to the author and publisher.
On 5/2/2010 8:33 AM ashokvbettigiri( california) said:
श्री. parag tope has outstanding piece of work, which is to be appreciated by one and all. he deserves a bouquet. every one should have the same feeli gs for our India i e Bharat. one day will come, when india will be on top of world.
On 5/1/2010 3:29 AM ashokvbettigiri(Los Angeles) said:
श्री. पराग टोपे यांनी फारच चांगली कामगिरी केली आहे, त्यांचे आभार मानल तेवढे थोडेच आहेत. त्यांच्या कुटुंबाला दीर्घायुष लाभो अशी देवाचरणी प्रार्थना करतो.तात्या टोपे यांचा इतिहास चांगलाच लोकापुढे आणला आहे. धन्यवाद
On 4/30/2010 11:03 PM Vilas Savargaonkar said:
सम्राटजी, फारच सुंदर लेख व माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! स्वन्त्र्यांचा लढाहितले या सर्व महापराक्रमी वीराना त्रिवार मुजरा! टोपे साहेब धन्यवाद!
On 4/30/2010 11:12 AM Rishikesh Gautam said:
फआरच छआन
On 4/29/2010 1:44 PM sagar_US said:
वालावलकर साहेब, पराग टोपे हे आत्ताच्या काळातले आहेत. येथे एकजण जनरल डायर च्या नावाने लिहीत आहे. खर्या डायर चे वंशज काही वर्षांपूर्वी भारतात येऊन गेले. कारण आपल्या सरकारने विचार केला असणार कि आता झाले गेले होवून गेले, या वंशजांचा काय दोष? तसेच पराग सर इतिहास संशोधक असले तरी आपण आता कोणत्या काळात वावरतो आहोत ह्याचे भान राखून आहेत. स्वामी विवेकानंदांचे परदेश गमानाबाद्दल्चे विचार वाचावेत.
On 4/28/2010 5:51 PM sanjay gawali said:
अभिनंदन ! आपण परदेशी मराठी बांधवांनी यातून प्रेरणा घेतली पाहिजे कि परदेशी राहूनदेखील आपल्या देशासंदर्भात इतिहासाबद्दल मायभूमीबद्दल अभ्यास करता येतो नवीन दृष्टीने इतिहास मांडता येतो जेणेकरून अस्मिता जगेल.. स्वाभिमान वाढेल...तेही इंग्रजी भाषेतून ..लिहून ..झकास..काम झाले...स्वामी विवेकानंदांनी सांगितल्या प्रमाणे आपण आपल्या देशाची ची ची थोडी तरी सेवा करू शकतो ...केवळ परदेशी एन आर आय राहुंन खडे फोडण्यात दोष देण्यात अर्थ नाही... काहीतरी... थोडे तरी... योगदान करू यात ..
On 27/04/2010 18:43 D.R.Pendse said:
It was an inspiring article. Congratulations on your meticulous effort. D.R.Pendse, Mumbai 400018.
On 4/27/2010 2:29 PM Mrs. Shamal Vaidya said:
पराग सर खरच हे खूप चांगले कार्य केलेत तुम्ही तुम्हाला आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा, या तुमच्या उत्स्पुर्थ कार्यासिधी मुले नवीन पिढी ला इतिहासाचा सखोल अभ्यास करता येईल, आणि जाणून पण घेता येईल, तुमच्या या अथक परिश्रमाला सादर दंडवत.
On 4/27/2010 8:41 AM Hemant said:
खूपच छान!! मला हे पुस्तक मराठीतून वाचायला आवडेल !! २८ एप्रिल ला हे पुस्तक बघायला आणि विकत मिळेल का?
On 4/26/2010 3:26 PM Shriniwas S Pownikar said:
तात्या टोपे अज्ञातवासात असताना मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुल्तापी किंवा मुल्ताई नावाच्या गावातील तापी नदीच्या उगमस्थानी असलेल्या राम मंदिरात वास्तव्यास होते. हे राम मंदिर देशमुख घराण्याच्या मालकीचे हेमाड पंथी बांधणीचे आहे. भगवंतराव अप्पाजी देशमुख व त्यांचे कुटुंबीय तात्या तोपेंबरोबर इंग्रजांविरुद्ध लढाईत होते. देशमुख घराणे माझे आजोळ. देशमुख यांचे सध्याचे वंशज विश्वाक्सेन देशमुख ०९४२५६२३९५४ आहेत. या काळात तात्या टोपे राम मंदिरात उत्तम कीर्तन करीत असत.
On 4/26/2010 1:23 PM Tushar said:
परागचा आभारी आहे.
On 4/26/2010 1:22 PM Prasanna said:
सरकार, सरकार कोण हे सरकार .तात्या टोपे आणि त्यांच्यासारख्या अनेक विभुती पुढे हे सरकार अतिशय क्षुल्लक क: पदार्थ आहे.मत पेटीतून हे सरकार उलथून लावण्याचा अधिकार तुम्हाला आहे.गरज आहे मतदान करण्याची आणि हवे ते सरकार निवडून आणण्याची.९० ते १०० टक्के मतदान व्हायला हवे.
On 4/26/2010 12:25 PM vikas said:
वेरी वेरी गुड थान्क्स अ लोट फोर गीवेन इन्फ़ोर्मतिओन
On 4/26/2010 11:48 AM Sandip said:
इंग्रजांनी एवढे दिवस राज्य केले ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त गांधी आणि नेहरू ह्याचं स्वार्थी राजकारण.......!!! हे दोघेपण ब्रिटीशांचे मोहरे होते... ह्यांनी देश विकला ब्रीतीशाना.!! जय हिंदुराष्ट्र.!! जय नथुराम..........!! प्लीज हि कॉमेंट पोस्त करा...!!
On 4/26/2010 11:23 AM mayur said:
thank u sir ,we know tatya tope but u give a some stories about tatya so we really thankful .
On 4/26/2010 10:53 AM laxman said:
हे सर्व योद्धे असूनही इंग्रजांनी पुढे दीडशे वर्षे राज्य केले. याला कारणीभूत कोण? का इंग्रजांना हाकलून देणे जमले नाही.? का भारत अजून मागे आहे. जपान बेचीराक होऊन सुधा तो एक आता मजबूत आणि आर्थिक समृद्धी असलेला देश आहे. याला एकाच उपाय आहे, तो म्हणजे सर्व सार्वजनिक सुट्ट्या रद्द करणे. त्या मुले अश्या पराग तोपेंचा परिश्रमाला काहीच अर्थ नाही. हा फक्त वेळेचा दुरुपयोग आहे. इतिहास स पेक्षा वर्त्मान्काला कडे जास्त लक्ष द्या वे.
On 4/26/2010 9:37 AM dnyanesh_bangalore said:
To Parag Tope - हा संशोधित इतिहास 'पाठ्य पुस्तक निर्मिती महामंडळास' द्या म्हणजे ते आजवर शिकविल्या जाणाऱ्या इतिहासात दुरुस्ती करून खरा इतिहास मुलांना शिकवतील .. आम्ही तर शाळेत 'तात्या टोपेंना शिवपुरीत फाशी देण्यात आली' हा चुकीचा इतिहास शिकलो पण निदान पुढची पिढी तरी खरा इतिहास शिकेल .. please put some of your findings(as references) on-line so that we can edit the wikipedia pages...congrats once again ..
On 4/26/2010 9:10 AM जनरल डायर... said:
आताच्या टोपे पिढी चा फोटो खूप छान आहे.. आय लवड इट... जनरल डायर...
On 4/26/2010 1:26 AM vijay pawar said:
amit u r right
On 25/04/2010 23:13 Ravindra Niphadkar said:
मी हे पुस्तक वाचले आहे. लेखकाने खूप मेहनत घेतलेली जाणवत आहे. अनेक नकाशे ग्राफ्स या पुस्तकात आहेत. या पुस्तकातील संदर्भ ग्रंथाची यादी ७२ पाने आहे. तसेच अनेक अप्रकाशित उर्दू पत्रे भाषांतर केलेली आहेत. प्रत्येक प्रसंगाची कारण मीमांसा केलेली आहे व त्याचा संदर्भ क्रमांक दिलेला आहे. लेखकाने खरा इतिहास लोकांसमोर मांडण्याचा चांगला प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद. पुस्तक खूपच वाचनीय आहे.
On 4/25/2010 10:43 PM rohit said:
yes agree with amit .....khara itihas kadhi samor yein kay mahit..
On 4/25/2010 8:44 PM Shashank Deshmukh said:
हि पराग, अभिनंदन !!!!
On 25/04/2010 18:51 Manohar V. Rakhe said:
श्री. पराग टोपे यांचे हार्दिक अभिनंदन. असंच इतिहास संशोधन यापुढेही करत रहाण्यास आपणांस अमाप उत्साह आणि तितकीच शक्ती मिळो ही प्रभूचरणी प्रार्थना.
On 4/25/2010 6:50 PM Amit said:
इतिहास हा नेहमीच विजयी लोक लिहित असतात. १८५७ चा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा इंग्रजांनीच लिहिला आहे. त्यामुळे हे स्वाभाविकच आहे. १९४७ च्या संग्रामानंतर देखील तो इतिहास 'कॉन्ग्रेस्सानेच' लिहिला आहे. त्यातही हे स्वातंत्र्य नेहरू गांधी यांच्यामुळेच मिळाला असे लिहिले गेले आहे. पण तसे घडलेले नाही.. अनेक लोकांनी त्यात सहभाग केलेला आहे. पण तो तेवढा नमूद केलेला नाही.. तो इतिहास देखल कॉंग्रेसच्या बाजूने लिहिला आहे!
On 4/25/2010 4:40 PM parag mokashi said:
पराग टोपे यांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. खूप मोठे कार्य त्यांनी सिद्धीस नेले आहे. एक नवा (आणि खरा khura) असा इतिहास समोर आणला आहे. दुर्दैव असे कि सत्य उजेडात यायला १५० वर्षे लागली. आता लवकरात लवकर हा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा हिस सरकार ला विनंती आहे. इतके मोठे कार्य पार पडल्या बद्दल सरकारने तत्परता दाखवून त्यांचा यथोचित सन्मान करावा ashi apeksha . Parag Mokashi Bahrain.
On 4/25/2010 1:42 PM sudhir pisal said:
पराग टोपे , आपले मन पूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन सुद्धा. इश्वर चरणी हीच विनंती कि आपले हातून असेच छान कार्य होत राहो आणि त्या साठी आपल्याला आयुष्याची उंची आणि रुंधी लाभो .
On 25/04/2010 11:31 AM Raju said:
Shri Parag Tope yanch sanshodhan prakalpa prasansha patra aahech. Etihas ha sanshodhanvarch lihila jato. Parag yaani milavlelys purava-adharit navin nishkarsh kadhun Marathi mansala kautukaspad (PROUD) kele aahe. Etihasavar rajyakartyachi chhap (Engraj) padene swabhavik aahe karan - fusharki marne aani mothepana meeravne - he rajkarnache anga aahe.
On 4/25/2010 11:12 AM balkurshna kakade said:
खरेच खूप छान आहे कुणीतरी हे करीत आहे आज आपल्याला सनावळ्या शिकवण्यापेक्षा थोराची माहिती दिली पाहिजे आणि इतिहास प्रेमी मंडळीनी इकत्र येऊन इक ग्रूप तयार करून व निधी गोळा करून खरा इतिहास जगासमोर आणला पाहिजे व या साठी सकाळ ने प्रोत्सातन देऊन इक मंच उभा करून द्यावा खरेच खूप उपकार होतील नवीन पिढीवर धन्यवाद
On 4/25/2010 10:52 AM Vijaya Shahane said:
खूप छान लेख आहे.
On 4/25/2010 10:35 AM vp said:
and m not trying to ridicule India here... but its not always a good practice to point your fingers to fellow nationals making livelihood abroad. There are always some things one must consider, like one I just mentioned below, so earnestly requesting people to watch out their words. :) Can't we be simply proud about what this guy is doing?
On 4/25/2010 10:27 AM vp said:
Do not live in a country that does not allow you; self respect, honor, means of living, a family, kith and kin, friends, well wishers, ways of education and self-development. Quit such country. It is not fit for living.
On 4/25/2010 9:19 AM विक्रम नरेंद्र वालावलकर. said:
धन्यवाद. त्यांच्या संशोधनाबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आणि सकाळ नेही अगदी सविस्तर वृत्त छापले आहे. परंतु खंत एवढीच की ज्या स्वदेश हित रक्षणासाठी तात्यांना वीरमरण आलं, त्या देशातच कंपनी काढून पराग टोपे यांनी चरितार्थ चालवला असता तर बरे झाले असते. शिक्षण झाल्यावर भारतात येऊन त्यांनी आपल्या शक्ती-बुद्धी-संपदेचा उपयोग हिंदुस्थानला पुढे नेण्यात केला असता तर...
On 4/25/2010 9:18 AM विक्रम नरेंद्र वालावलकर. said:
धन्यवाद. त्यांच्या संशोधनाबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आणि सकाळ नेही अगदी सविस्तर वृत्त छापले आहे. परंतु खंत एवढीच की ज्या स्वदेश हित रक्षणासाठी तात्यांना वीरमरण आलं, त्या देशातच कंपनी काढून पराग टोपे यांनी चरितार्थ चालवला असता तर बरे झाले असते. शिक्षण झाल्यावर भारतात येऊन त्यांनी आपल्या शक्ती-बुद्धी-संपदेचा उपयोग हिंदुस्थानला पुढे नेण्यात केला असता तर...
On 4/25/2010 8:49 AM Pramod Mangrulkar said:
श्री पराग टोपे यांनी एक नवीन दृष्टीकोन दिला आहे.
On 25-04-2010 07:34:03 vithalbarve said:
हे पुस्तक येत आहे फार आनंदाची गोष्ट आहे.मी साधारण ५७ वर्षापूर्वी शाळेत शिकलो होतो कि झाशीची राणी तसेच तात्या टोपे १८५७ युद्धात धारातीर्थी पडले नाना भट नेपाळस निघून गेले पण यातील कोणीही फिरंग्यांच्या हातात सापडले नव्हते टोपे यांनी आता पहिल्या बाजीराव पेशव्यावर लिहावे जे सर्वोत्तम भारतीय सेनापती होते
On 25/04/2010 05:05 Shri said:
"Those who forget history of their own, can’t create history" म्हणूनच आपण आपल्या इतिहासाचा अभ्यास केलाच पाहिजे. श्री. पराग टोपे यांचे खास अभिनंदन.
On 4/25/2010 3:59 AM sudhir dalvi, Melbourne said:
खूपच important discovery आहे. Unfortunately ती फक्त पुस्तक रुपात राहिली तर masses पर्यंत पोहोचणार नाही. या पुढे दोन गोष्टी घडायला हव्यात. एक- शाळेत शिकवला जाणारा इतिहास बदलला पाहिजे. दोन- या पुस्तकावर बसेद एखादा छान मराठी सिनेमा काढायला हवा. माझ्या मते, श्री पराग टोपे यांनी खूप मेहनत घेऊन हि discovery केली आहे. त्या मुले उगाच त्यांच्या कामा बद्दल शंका उपस्थित करू नयेत. Let us believe what he has put forward till someobe disproves it.
On 4/24/2010 11:52 PM dipak said:
why but i don't know i feel history is like big lie we don't even know who made attacks on mumbai rail in this 20 century , how one can claim about history what these people doing in the name of gandhiji, shivajimaharaj, everything is dought full sorry if someones feeling get hurted but i do not trust history we should concentrate on present and encourage the real heros we see right now who r fighting against poorty, illiteracy ,people like baba aamte he is real hero
On 4/24/2010 11:48 PM rohit,yeola(dist-nasik) said:
chan lekh ahe ....yeola hi तात्यांची janbhumi ......samast yeolekarana tumccha abhiman ahe ....आणि parag topena shubhecha .....ata tari sarkar chukiucha इतिहास vaglel हि apeksha
On 24/04/2010 21:20 parag tope said:
हे पुस्तक जगातील सर्व भारतीयांच्या पुढील पिढीला अर्पण केले आहे ज्यांचा भारतीय इतिहासा बद्दल वस्तुनिष्ठ व स्वयंप्रेरित द्रिष्टीकोन असला पाहिजे.  आम्ही या पुस्तकाचे २८ एप्रिल २०१० रोजी ६:०० वाजता भारत संशोधक इतिहास मंडळ येथे (भारत नाट्य मंदिरा जवळील हाल मध्ये) विमोचन करीत आहोत.  आपण सर्व तिथे भेटलात तर तो मी माझा सन्मान समजेन.पराग टोपे paragtope at gmail dot com www.tatyatope.com (Delhi launch on May 10)
On 24/04/2010 20:51 Babare.Dubai . said:
अतिशय उत्तम लेख..पण इतिहास संशोधकांनी या पुस्तकाची पूर्ण तपासणी करावी..कारण एखादी व्यक्ती (गैरसमज नको) अमेरिकेतून आली आणि तज्ञ नसताना काही तर्क केले तर ते १०० % खरेच असतील असे नाही. सगळ्यात महत्वाचे पुढच्या पिढीला खरा इतिहास कळला पाहिजे...जाऊ द्यात असा तसा तर तो कळतच नाहीये सध्या..!
On 24/04/2010 19:48 महेश सोळुंके लंडन said:
मी बरेच दिवसांपासून विचार करीत होतो की ... आज जो इतिहास आपणास शाळेत शिकविला जातो आणि actual इतिहासात बरेच अंतर आणि तफावत दिसते. जी की पुढे चालून ते पूर्ण सत्याचे रूप घेते. मला आपला हा लेख वाचताना खूप आनंद होत होता infact.... समाधान मिळत होते की संशोधनाच्या मार्गावर वाटचाल करणारे आणि सत्याची शोध घेण्यासाठी लागणारी मेहनत करणारे आजही आहेत . येणाऱ्या पिढ्या आपले नेहमी आभारी राहतील यात मला थोडी हि शंका नाही धन्यवाद :)
On 4/24/2010 7:32 PM ppb said:
तू,महाला शतशः धन्यवाद , मराठे शिवाजी माराजान्ह्च्या नंतर ३०० वर्षे संपूर्ण देश साठी लढत राहिले परंतु आज मराठी माणसाला स्वताच्या कर्तृत्व चा विसरा पडला आहे . दिल्ली चे पाय चटण्या मध्ये धन्यता मानणारे लोक आपान असा संपूर्ण उत्तर भारता मध्ये प्रचार होतो आहे . हा देश जगायचं तर महारष्ट्र जगाला पाहिजे . पेशवे, शिंदे, टोपे, बळवंत, फडके, टिळक, आगरकर, आंबेडकर असे हजारो महापुरुष हेच आपले अस्तित्व आहे .
On 24/04/2010 18:56 बाळा नाडकर्णी said:
माहिती उत्तम आहे. १८५७ चे युद्ध त्यावेळेपर्यंत जगातील सर्वात व्यापक युद्ध होते. असे युद्ध नियोजित करण्याची दूरदृष्टी असलेले नेते भारताला लाभले होते. त्याप्रमाणे युद्धाची कार्यवाही (execution) झाली देखील. खरा इतिहास इंग्रजांनी दाबून ठेवला. कारण त्यांना भारतीयांनी शिकून आत्मनिर्भर होणे पसंत नव्हते. १९४७ साली फक्त गोरे इंग्रज जाऊन काळे इंग्रज आले. या पार्श्वभूमीवर श्री पराग टोपे यांचे करावे तेव्हढे कौतुक थोडेच आहे.
On 24/04/2010 18:38 Davendu Kulkarni said:
लेख उत्तम आहे, पण या निमित्ताने मराठी लोकांमध्येच स्वत:च्याच इतिहासाविषयी किती अज्ञान, अनास्था आणि दुही आहे हेही प्रतिक्रिया वाचून समजले. छत्रपती संभाजी महाराजांविषयी वेडेवाकडे बरळणारे आणि बाजीराव आणि इतर पेशव्यान्विषयी गरळ ओकणारे या दोन्हीही बाजू शतमूर्ख आहेत. आपण आपल्याच लोकांविषयी आकस ठेऊन वाट्टेलती दुषणे त्यांना देतो, असे असेल तर तुम्ही इतरांकडून राज्य करून घेण्याच्या लायकीचे आहात हे नक्की. मग इतर प्रांतीय लोक साधे 'शिवाजी महाराज' न म्हणता शिवाजी म्हणतात आणि आम्ही ते लाचारासारखे ऐकून घेतो.
On 4/24/2010 5:53 PM पराग जगताप said:
अभिनंदन. आपल्या इतिहासाचे आपणच संशोधन करण्याची नक्कीच गरज आहे. इंग्रजांनी त्यांना सोयीस्कर असाच इतिहास लिहिला. आर्यांचे आगमन हे असेच एक कपोलकल्पित तयार केले. त्यामुळे स्वदेशी इतिहास संशोधनाची गरज आहे. शुभेच्छा.
On 4/24/2010 5:51 PM Janardan Mali, Mumbai said:
स्वातंत्र्यानंतर कॉग्रेस पारतंत्र्यात राहून निबर बनलेल्या मराठी मनांना प्रज्ज्वलित करणारी ही माहिती आहे.. जगाच्या इतिहासात १८५७ चे स्वातंत्र्य समर अजरामर केलेले तात्या टोपे यांना त्रिवार वंदन.
On 24/04/2010 5:42 PM Mukund Deshpande said:
मी श्री टोपे यांचे हार्दिक अभिनंदन करतो. मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास आणि भारत एकसंध राहण्याकरिता मराठी माणसांचे योगदान अशा संशोधनामुळे भारतीय इतिहासात नोंदले जात आहे. श्री टोपे यांनी मराठ्यांची इतिहास संशोधन परंपरा देखील जागृत ठेवली ही अजून एक महत्वाची अभिनंदनाची बाब.
On 4/24/2010 5:35 PM jayant said:
वेरी गुड पल लेत मी क्नोव मैल इ द ऑफ पराग टोपे ठंस jayant
On 4/24/2010 5:28 PM anant manohar said:
उत्तम. आम्ही शाळेत असताना तात्या टोपे बद्दल सत्तावनचा सेनानी पुस्तक शिकले होते आपले पुस्तक वाचण्याची इच्छा आहे. मराठी अनुवाद केव्हा प्रसिद्ध होणार? अशी खरी माहिती प्रसिद्ध झालीच पाहिजे. इंग्रजांनी आपल्या इतिहासाची तोडमोड केली आणि नवीन राजकारणी पण तेच चालू ठेवत आहेत.
On 4/24/2010 5:26 PM सुजाण नागरिक said:
श्रीयुत पराग टोपे ह्याना साक्षात दंडवत, ह्या युगात अथक परिश्रमाने अशी माहिती संकलीत करून प्रसिद्ध केल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. आपले सरकार व मोजके सामाजिक कार्यकर्ते हे आपलाच जाज्वल्य इतिहास कशा पद्धतीने (चुकीच्या) आपल्याच भावी पिढीच्या गळी उतरवीतात हे नि:स्दिग्धपणे आपण सिद्ध केलत. एका चुकीचा परिणाम हा पुढील कित्येक पिढ्यांना किती व कशा पद्धतीने भोगावा लागतो ह्याचा विचार ह्या मंडळीना कधीही नसतो, वयक्तिक व तात्पुरत्या स्वार्थाकरीता ही लोक थोर व्यक्तींच्या नावाचा (संभाजी) वाट्टेलतसा वापर कर


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: