Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

राष्ट्रवादीच्या बंडखोरांना कॉंग्रेसच्या पायघड्या
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, April 28, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: ncp,   congress,   politics,   mumbai,   maharashtra
मधू कांबळे - सकाळ वृत्तसेवा
मुंबई - दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते फोडून आपल्या तंबूत आणण्याची आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात बंडखोरी केलेल्या काही आजी-माजी आमदारांनाच आपल्या छावणीत आणण्याचे कॉंग्रेसचे प्रयत्न सुरू असल्याने राष्ट्रवादीचे काही नेते दुखावले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही, कॉंग्रेसचे काही मासे आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे भविष्यात पक्ष फोडाफोडीवरून दोन्ही कॉंग्रेसमध्ये वेगळाच संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्ह्यातील बोईसर येथे 24 एप्रिलला कॉंग्रेसच्या मेळाव्यात शिवसेनेचे माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख उदयबंधू पाटील यांच्यासह अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने दुसऱ्या दिवशी 25 एप्रिलला महाड येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचा जाहीर पक्षप्रवेश घडवून आणला. शिवसेनेचे कोकणातील दुसरे एक नेते आणि माजी मंत्री रवींद्र माने यांनीही राष्ट्रवादीची वाट धरली आहे. कॉंग्रेसने मात्र आता, कोकणातीलच काही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना आपल्या तंबूत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच 26 मार्चला विधान परिषदेच्या एका जागेसाठी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक झाली. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार व अर्थमंत्री सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे यांच्याविरोधात माजी आमदार माणिकराव जगताप यांनी बंडखोरी केल्याने ही निवडणूक गाजली. या निवडणुकीत जगताप पराभूत झाले; परंतु निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या जगताप यांना कॉंग्रेसने आपल्या छावणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केल्यामुळे कोकणातील राष्ट्रवादीचे नेते दुखावले आहेत. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आणखी एक माजी आमदार गोटीराम पवार कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. पवार यांनी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार किसन कथोरे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते व केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात कॉंग्रेसमधून बंडखोरी करून रिंगणात उतरलेले व नंतर भाजपमध्ये जाऊन विधानसभेवर निवडून आलेले नाना पटोले हेही कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा आहे.

एकंदरीत लोकसभा, विधानसभा व विधान परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्यांना कॉंग्रेसमध्ये येण्यासाठी लाल गालीचा टाकला जात आहे. साहजिकच त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नाराजी पसरली आहे. कॉंग्रेस अशा प्रकारे आमच्या विरोधकांनाच प्रवेश देणार असेल, तर आम्ही त्यांना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी कॉंग्रेसला दिला आहे. त्यामुळे भविष्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये संघर्षाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे.

मुख्यमंत्र्यांबरोबरील खडाजंगीमागील गूढ
राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांना विश्‍वासात न घेता, मतदारसंघातील त्यांचे विरोधक व शिवसेनेचे माजी आमदार शंभूराजे देसाई यांच्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हजेरी लावली होती. त्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले होते. त्यावरून मुख्यमंत्री विरुद्ध राष्ट्रवादीचे मंत्री अशी तलवारबाजी झाली होती.
प्रतिक्रिया
On 10/08/2011 05:31 AM spashtabhashi said:
लोकशाहीला भूशाणावाह आहे.ही आयाराम गयाराम मंडळी देशाचा काय उध्दार करणार? आणि जे मुंबईत तेच देल्हीत! जगात महासत्ता होण्याची महत्वाकांक्षा दिवास्वप्न होणार. भारतातले राजकारणीच भारताचे शत्रू.चीन म्हणतो भारतात आम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही.भारताचा भ्रष्ट्राचाराच भारताला खद्यात घालील.
On 17/11/2010 08:54 AM Hemant Baramati said:
अजितदादा हीच अपेक्षा आहे महाराष्ट्राला अभिनंदन दादा
On 17/11/2010 08:52 AM Hemant Baramati said:
अजितदादा हीच अपेक्षा आहे महाराष्ट्राला अभिनंदन दादा
On 12/11/2010 04:25 PM great said:
फारच छान ! दोन्ही कॉंग्रेस मध्ये अशीच हमरी तुमरी होऊन त्यांची वाट लागो हि सदिच्छा !!
On 9/4/2010 9:22 PM Sharad sawant said:
राजकीय पक्षाची संख्या कमी केली पाहिजे.............नवीन राजकीय पक्षांना परवानगी दिली नाही पाहिजे.........
On 6/10/2010 8:22 AM उर्मिला अशोक शहा said:
फोडाफोडीचे राजकारण हा कॉंग्रेस द्वई चा स्थायी भाव.याचा अर्थ निवडून आणण्याची पात्रता नाही पण घोडेबाजारात खरेदी करण्याचे सामर्थ्य आहे. पैसा येतो कोठून हे सर्वश्रुत सत्तेची समीकरणे नाणे नाचवून जुळवता येतात ऐनवेळी होत्याचे नव्हते करता येते. प्रामाणिकपणाची अपेक्षा लोकांनी केव्हाच सोडली निदान समर्पित सेवा अपेक्षित जेणे करून गरिबांचे कल्याण साधता येईल पण सध्या स्व कल्याणाचे कारस्थान शिजवायचे त्यामुळे पुराणाचे वांगी पुराणात. लोकसेवक अर्थहीन अर्थात अर्थपूर्ण ज्याला पैश्याचे गणित जमले तो पास आठवी पर्यंत
On 5/29/2010 6:24 AM ghanshyam ambokar said:
राजकारणात किवा समाजकारणात कार्य करताना मतांतरे होत असतात ह्यालाच लोकशाही म्हणतात. पण तेवढेच खरे कि, स्वार्थासाठी केलेल्या दलबदलू लोकांना जनताच त्यांची जागा दाखवितात. लोकांनीही मते देताना उमेदवाराची जात प्रांत धर्म पाहून मते देणे टाळावे.
On 4/28/2010 11:41 AM Swanand said:
२ वेळा पक्ष बदलानार्यांना कायद्यानुसार अपात्र ठरवायची तरतूद हवी. लोकांनीही जात व व्यक्ती पाहून मत देणे टाळावे त्यापेक्षा पक्षावर आधारित मतदान करावे.
On 4/28/2010 11:15 AM lahu said:
दलबदलू लोकांचा जनतेने निवूदुकीत हिसका दाखवावा मग तो कुठल्याही पक्षाचा असेना का.
On 4/28/2010 10:24 AM Indrayani Thorat said:
राजकारणामध्ये इतकी झपाट्याने अधोगती होत आहे की आता आणखी खाली जायला जागा आहे का असा प्रश्न पडतो.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: