अकोल्याकडे जाणारी बस उलटून २८ प्रवासी जखमी
सकाळ वृत्तसेवा
Monday, May 03, 2010 AT 11:48 PM (IST)
धुळे - शहरालगतच्या पारोळा चौफुलीजवळ महामार्गावर वळण घेताना डाव्या बाजूने खासगी लक्झरी बस उलटून आज पहाटे झालेल्या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुरत (गुजरात) येथून अकोल्याकडे जाण्यासाठी खासगी लक्झरी बसने (आरजे 15/पीए 1000) प्रवासी काल रात्री आठच्या सुमारास निघाले. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास बस शहरालगतच्या मुंबई- आग्रा महामार्गावरून पारोळा रोडकडे जात असताना चौफुलीजवळ वळण घेताना ती उलटली. जखमींची नावे अशी : प्रशांत शांताराम पवार (वय 32, रा. बोदवड, जि. जळगाव), दीपक किसनराव चांदुरपगार (36, रा. नासोना, ता. चांदूर, जि. अमरावती), गिरीराज नारायण गुरखा (10, रा. अकोला), आनंद राधेश्याम जागीद (25, रा. पुसद, जि. यवतमाळ), पवित्रासिंग पूर्णसिंग पंजाबी (48, रा. भुसावळ), विद्या बाबूराव हिवराळे (32, रा. बाळापूर, जि. अकोला), आत्माराम सीताराम वाडेकर (45), अश्विनी लक्ष्मण ढोले (38, दोघे रा. शिराळा-अंधारे, पातूर), निशा कैलास आंबोरे (20, रा. कबरा, ता. मेहकर, जि. बुलडाणा), मीना संतोष आंबोरे (20), किरण तुलसीदास शेषवाल (44, रा. अकोट, जि. अकोला), मनोहर राजाराम शिंदे (40, रा. पानगव्हाण, कारंजा), महंमद सादिक महंमद साबीर (26, रा. अचलपूर, जि. बुलडाणा), संतोष दगडू आंबोरे (25, रा. हिरव खुर्द, ता. मेहकर), विनोदकुमार मोहनलाल लबाना (30, रा. डोंगरपुरा), प्रतीक हांडे (5), पूजा अनिल चांडक (12), राधिका अनिल चांडक (9), आयेशा कैसर शेख कय्यूम (12, सर्व रा. सुरत), महंमद जुनेद शेख गुलाम शेख (43, रा. मोताळा, जि. बुलडाणा), हाजी अब्दुल सत्तार हाजी अहमद गफ्फार (47, रा. पिंपळगाव, जि. बुलडाणा), हाजी अब्दूल रज्जाक शेख (55, रा. लिंबायत, सुरत), शेख गनी शेख सादिक (15, रा. नांदुरा, बुलडाणा), गणेश उत्तम वसारटे (13, रा. देऊळगावराजा, जि. बुलडाणा), योगेश देवराम चंदने (23, रा. वडेगाव, जि. अकोला), शेख युसूफ शेख कुरेशी (34, रा. आर्वी, जि. यवतमाळ). या अपघातात बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. अन्य खिडक्यांच्या काचा फुटल्याने प्रवाशांना दुखापती झाल्या. पोलिसांनी पंचनामा केल्यावर क्रेनच्या सहाय्याने उलटलेली बस सरळ करण्यात आली.
प्रवाशांची धावपळ
पहाटे साडेतीनच्या सुमारास अपघात झाल्याने जखमींना जिल्हा रुग्णालयात नेण्यास अडचणी येत होत्या. रात्रीची वेळ असल्याने अनेकांनी आरडाओरड केली. बहुसंख्य प्रवासी झोपेत असल्याने अपघात नेमका कसा झाला, काय झाले तेही अनेकांना उमजले नाही. आझादनगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तोपर्यंत महामार्गावरील अन्य वाहनचालकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमीवर उपचार सुरू असून, त्यातील तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात दुपारी अपघाताची नोंद झाली. निरीक्षक प्रल्हाद घाटे, सहाय्यक निरीक्षक मधुकर सोनवणे, वाडिले, उपनिरीक्षक ए. आर. डाके तपास करीत आहेत.