Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

श्रीलंकेच्या 38 जणांना केरळमध्ये अटक
-
Monday, May 10, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: snn,   ltte,   police,   crime,   tiruanantpuram,   national

सकाळ न्यूज नेटवर्क
तिरुअनंतपुरम - केरळमधील कोल्लम जिल्ह्यात श्रीलंकेच्या 38 नागरिकांना पोलिसांनी अटक केली. यात पाच महिला व पाच बालकांचा समावेश आहे. या सर्वांचा "लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलम' (एलटीटीई) या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे काय, हे पडताळून पाहिले जात आहे. यासाठी पोलिसांनी इंटरपोलची मदत घेतली आहे.

कॉंग्रेसचे युवा नेते आणि सरचिटणीस राहुल गांधी यांचा सोमवारी (ता. 10) कोल्लम दौरा आहे. या पार्श्‍वभूमीवर अटक करण्यात आलेल्या या श्रीलंकेतील नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे. कोल्लम परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुप्तचर संघटनेचे सहसंचालक बालकृष्णन यांनी "रॉ' आणि अन्य गुप्तचर संस्थांशी चर्चा केली.

अटक करण्यात आलेल्या श्रीलंकेच्या नागरिकांकडे वाहतुकीची कोणतीही कागदपत्रे आढळलेली नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी शिवा आणि तेन्नीसॉन या दोन तमिळींनादेखील अटक केली आहे. तमिळनाडूतील मानवी तस्करी करणाऱ्या टोळीकडून या श्रीलंकेच्या नागरिकांना जहाजाने ऑस्ट्रेलिया, कॅनडा व बहारीन या देशांत पाठविले जाणार होते. त्यांना कोल्लम येथून कोचीला पाठविण्याची तयारी सुरू होती. यासाठी त्यांनी संबंधित टोळीला प्रत्येकी पन्नास हजार ते एक लाख रुपये दिल्याचे समजते.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: