इंग्लंडने नेले पाकला उपांत्य फेरीत
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, May 12, 2010 AT 12:37 AM (IST)
सेंट ल्युसिया - इंग्लंडने ट्वेंटी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील "सुपर एट'मध्ये सलग तिसरा विजय मिळविताना न्यूझीलंडचे आव्हान संपुष्टात आणले. त्यांनी न्यूझीलंडवर पूर्णतः वर्चस्व राखत तीन गडी राखून विजय मिळविला. त्यांच्या या विजयामुळे पाकिस्तानचा उपांत्य फेरीत प्रवेश झाला.
टीम ब्रेस्ननसह इंग्लंडच्या सर्वच गोलंदाजांनी प्रभावी मारा करत न्यूझीलंडला 6 बाद 149 धावांवर रोखले. त्यानंतर इंग्लंडने 19.1 षटकांत 7 बाद 153 धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडची मधली फळी काहीशी कोलमडली होती; परंतु त्यांनी पाच चेंडू बाकी असतानाच विजय मिळवत न्यूझीलंडचे आव्हान संपुष्टात आणले. ब्रेस्ननने महत्त्वाच्या क्षणी 11 चेंडूंत 23 धावांचा तडाखा दिला.
न्यूझीलंडला उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी या सामन्यात विजय नोंदविणे अनिवार्य होते; परंतु समतोल संघ असलेल्या इंग्लंडने त्यांच्यावर सहज विजय मिळवत पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.
इंग्लंडच्या सलामीवीरांनी पुन्हा एकदा आक्रमक सुरवात केली. क्रेग किस्वेट्टरने पहिल्याच षटकात षटकार व चौकार मारला, तर मायकेल लम्बने बॉंडच्या एका षटकात 15 धावा वसूल केल्या. पॉवर प्लेच्या षटकात इंग्लंडने 1 बाद 57 अशी सुरवात केली होती. फिरकी सुरू झाल्यावर मात्र इंग्लंडचा डाव घसरला. स्टायरिस व व्हिटोरीसमोर त्यांची अवस्था 9 षटकांत 4 बाद 66 अशी झाली होती. मात्र, पुन्हा एकदा इऑन मॉर्गन मदतीस धावून आला. त्याला चांगली साथही लाभू लागली. त्यातच फिरकीची षटके संपल्यामुळे न्यूझीलंडसमोरील प्रश्न बिकट झाले. मध्यमगती गोलंदाजीचा फायदा घेत मॉर्गन व ल्युक राईटने 38 चेंडूंत 52 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ब्रेस्ननच्या आक्रमक फलंदाजीमुळे न्यूझीलंडचा पराभव निश्चित झाला. इंग्लंडकडून सर्वाधिक 40 धावा करणाऱ्या इऑन मॉर्गनने 34 चेंडूंत चार चौकार आणि एक षटकार मारला, तर लम्बने 21 चेंडूंतील 32 धावांत चार वेळा चेंडू सीमापार धाडला, तर एक षटकार ठोकला.
त्याआधी ब्रेस्ननच्या अचूक गोलंदाजीमुळे न्यूझीलंडला धावगती उंचावताच आली नाही. पहिल्या षटकात एकच धाव दिलेल्या ब्रेस्ननने अखेरच्या षटकात सातच धावा दिल्या. न्यूझीलंडला संपूर्ण डावात धावगती उंचावणे जमलेच नाही. अगदी फिरकीसमोरही त्यांना स्वीप्स सोडल्यास अन्य काही साधत नव्हते. इंग्लंडचे क्षेत्ररक्षणही लक्षवेधक होते. ब्रेंडन मॅकलम, रॉस टेलर व स्कॉट स्टायरिसने काही प्रमाणात धावगतीस वेग दिला; पण त्यापेक्षा तो जास्त अपेक्षित होता. मॅकलमने 32 चेंडूंत चार चौकारांसह 33 धावा केल्या, तर रॉस टेलरने 33 चेंडूंत 44 धावा फटकविल्या. त्यात त्याने दोन षटकार मारले. स्टायरिसने 19 चेंडूंत तीन चौकार व एक षटकारासह 31 धावांची खेळी केली.
धावफलक
न्यूझीलंड
ब्रेंडन मॅकलम झे. लम्ब गो. स्वान 33
जेसी रायडर त्रि. गो. ब्रेस्नन 9
आरोन रेडमॉंड झे. ब्रॉड गो. स्वान 16
रॉस टेलर झे. ब्रेस्नन गो. साइडबॉटम 44
स्कॉट स्टायरिस झे. राइट गो. ब्रॉड 31
गॅरेथ हॉपकिन्स त्रि. गो. ब्रॉड 1
नॅथन मॅकलम नाबाद 3
डॅनियल व्हिटोरी नाबाद 4
अवांतर 8
एकूण, 20 षटकांत
6 बाद 149
बाद क्रम ः 1-30, 2-59, 3-65, 4-127, 5-133, 6-141
गोलंदाजी
टीम ब्रेसनन
4-0-20-1
रायन साईडबॉटम
4-0-35-1
स्टुअर्ट ब्रॉड
4-0-33-2
ग्रॅमी स्वान
4-0-31-2
मायकेल यार्डी
4-0-25-0
इंग्लंड
क्रेग किस्वेट्टर झे. नॅथन मॅकलम गो. मिल्स 15
मायकेल लम्ब पायचीत गो. व्हिटोरी 32
रवी बोपारा झे. टेलर गो. स्टायरिस 9
पॉल कॉलिंगवूड झे. ब्रेंडन मॅकलम गो. स्टायरिस 3
इऑन मॉर्गन झे. व्हिटोरी गो. बॉंड 40
ल्यूक राइट झे. मिल्स गो. बॉंड 24
टीम ब्रेस्नन नाबाद 23
मायकेल यार्डी झे. बटलर गो. नॅथन मॅकलम 0
ग्रॅमी स्वान नाबाद 1
अवांतर 6
ेएकूण - 19.1 षटकांत
7 बाद 153
बाद क्रम ः 1-24, 2-60, 3-60, 4-66, 5-118, 6-142, 7-146
गोलंदाजी
नॅथन मॅकलम
4-0-37-1
शेन बॉंड
4-0-29-2
केल मिल्स
3.1-0-32-1
डॅनियल व्हिटोरी
4-0-24-1
स्कॉट स्टायरिस
3-0-16-2
इयान बटलर
1-0-10-0