Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

वरुणयंत्र सादरीकरणाचा कृषी मंत्रालयात प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
Thursday, May 13, 2010 AT 12:15 AM (IST)

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली - कृत्रिम पाऊस पाडण्याचे सोपे साधन म्हणून चर्चेत असलेल्या वरुणयंत्राच्या सादरीकरणाचा प्रयोग आज केंद्रीय कृषी मंत्रालयात झाला. या यंत्राचे निर्माते डॉ. राजा मराठे यांनी हे यंत्र आणि त्याबद्दलची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हेही या सादरीकरणाला उपस्थित होते. सुमारे दीड तास हे सादरीकरण चालले.

वरुणयंत्राबाबत महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. त्यामुळेच कृषी मंत्रालयाने त्याची दखल घेऊन आज हे सादरीकरण आयोजित केले होते. सादरीकरणाला पवार यांच्यासह कृषी सचिव पी. के. बसू, अतिरिक्त सचिव व्ही. वेंकटाचलम यांच्यासह मंत्रालयातील इतरही काही प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सादरीकरणानंतर बोलताना डॉ. मराठे यांनी समाधान व्यक्त केले. सादरीकरण सर्व अधिकाऱ्यांनी पाहिले आणि वेळोवेळी प्रश्‍नही विचारल्याचे त्यांनी सांगितले. कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत विकसित केलेल्या या नव्या पद्धतीवर मंत्रालयात विचार केला जाईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणत्याही शास्त्रीय शोधात तंत्रज्ञान प्रथम निर्माण होते. त्याच्या वापर व प्रयोगातून शास्त्र व शास्त्रीय नियम विकसित होतात. त्यानुसारच आपण हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. आता त्याच्या उपयोगातून शास्त्रीय नियम तयार होतील, असे आपण या अधिकाऱ्यांना सांगितले, अशी माहितीही डॉ. मराठे यांनी दिली. "सकाळ' व "ऍग्रोवन'मध्ये या प्रयोगाला प्रसिद्धी मिळाल्यामुळे आपल्याला जवळपास दीड हजार लोकांनी दूरध्वनी करून या यंत्रात व प्रयोगात रस दाखविला, असेही मराठे यांनी आवर्जून सांगितले.
प्रतिक्रिया
On 5/13/2010 7:26 PM Sahasrabudhe V.V. Nagpur said:
श्री. मराठेसाहेब नमस्कार, आपण एकप्रकारे होम करून पाऊस पाडण्याचा प्रयोग केला आहे. हेचकाम आपण वीज निर्मिती केंद्रात चिमणी मध्ये ढगाळ वातावरण असताना मीठ टाकून कमी खर्चात आणि जास्त प्रमाणात करू शकतो असे मला वाटते. हा प्रयोग सरकारी मदत घेऊन करावा लागेल. कितपत जमेल याबद्दल शंका आहे. आपण सर्व प्रयोगकर्ते चित्पावन ब्राम्हण आहात याचे मला कौतुक वाटते .
On 5/13/2010 6:20 PM Ek Van Premi said:
Idiot idea ! Stop this nonsense !! By this way, nobody will plant trees and people will cut the trees and forests. This is the evil way of playing with nature. Dr. Marathe is insulting those who are dying to save forests and planting trees. Is Dr. Marathe after name and fame ..if so then he should go to film industry or Cricket, he will get it in less time with lots of other benefit. Whole world is suffering from Global Warming.Please for God sake stop this nonsense.
On 13/05/2010 16:59 adisunn said:
टीप भर मीठ आणि जलन, कसाकाय ५०० मीटर पेक्ष्या आकाशात असलेल्या ढगांना पोहोचते?
On 5/13/2010 4:23 PM nitin said:
वेधशाळेच्या अंदाजावर अवलंबून राहू नका म्हणजे मिळवली .
On 5/13/2010 11:54 AM sopan said:
या पुढे सादरीकरण करताना ढगाळ वातावरण पाहून पावूस पडतो का ते तपासून पाहावे लागेल. I am curious about this experiment. Hope Skal will give us the news of positive results in coming monsoon.
On 5/13/2010 7:56 AM nana jadhav said:
आता गावोगावी या यंत्राची सामग्री केंद्र सरकारने द्यावी आणि प्रशिक्षण पण द्यावे
On 5/13/2010 3:56 AM c p lahoti said:
नमस्कार ,डॉक्टर मराठे यांनी तयार केलेले यंत्र नाविन्यपूर्ण आहे त्या बद्दल जास्तीतजास्त माहिती होणे साठी छापील माहिती पत्रक उपलब्ध होणे गरजेचे आहे त्या साठी सरकार कडून मदत व्हावी कमी खर्चात होणारे काम असलेमुळे तालुका ,ग्रामपंचायत यांचे माध्यमातून प्रयोग करणे शक्य होऊ शकेल असे मला वाटते डॉक्टर मराठे यांचे अभिनंदन .


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: