कुडले गोळीबारप्रकरणी आणखी दोघांना अटक
-
Friday, May 14, 2010 AT 12:00 AM (IST)
पुणे - सचिन लक्ष्मण कुडलेवर गोळीबार करून त्याचा खून केल्याच्या आरोपावरून आणखी दोन जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. या गुन्ह्यात सुमारे 25 आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती निरीक्षक सुरेश केकाणे यांनी दिली. तानाजी नलावडे (वय 21, रा. पौड) व संतोष ऊर्फ दादू कांबळे (वय 23, रा. हनुमाननगर, दत्तवाडी) यांना अटक झाली आहे. कांबळेवर खुनाचा व खुनाच्या प्रयत्नाचा प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. नलावडेवरही काही गुन्हे दाखल आहेत. कुडलेवर हल्ला करताना नऊ मोटारसायकलींचा वापर झाला होता. त्यापैकी एका मोटारसायकलवर हे दोघे जण होते. त्यांच्याकडे हत्यारे होती. यापूर्वी 13 जणांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी पौडमध्ये जाऊन पोलिसांनी कारवाई केली, असे श्री. केकाणे यांनी सांगितले. ते पुढील तपास करीत आहेत. शनिवारी मध्यरात्री (9 मे) नीलायम चित्रपटगृहाजवळ सचिन कुडलेवर गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला होता.