ओरिसात पोलिसाची माओवाद्यांकडून हत्या
सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, May 17, 2010 AT 12:00 AM (IST)
भुवनेश्वर - माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या ओरिसातील मलकांगिरी जिल्ह्यात रविवारी काही माओवाद्यांनी एका पोलिसाची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात सुरक्षाव्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे.
रामचंद्र राव असे मृत पोलिसाचे नाव आहे. जिल्ह्यातील कलिमेला पोलिस ठाण्यात ते कार्यरत होते. आठवडे बाजारात ते देखरेखीसाठी उपस्थित होते. या वेळी साध्या वेशात आलेल्या तीन माओवाद्यांनी त्यांच्यावर अतिशय जवळून गोळ्या झाडल्या, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.