Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'सरकारची संवेदनाच संपली आहे'
सकाळ वृत्तसेवा
Sunday, May 23, 2010 AT 12:15 AM (IST)
पुणे - ""सरकारची संवेदनाच संपून गेली आहे. स्वतःच्या अधिकाऱ्यांचे संरक्षण करू न शकणारे हे सरकार महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचे काय संरक्षण करणार,'' असा सवाल शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला.

श्रमिक गोजमगुंडे यांनी काढलेल्या किल्ल्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन आणि "दुर्ग झेप' या पुस्तकाचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, गजानन बाबर, शिवसेनेच्या प्रवक्‍त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, तसेच फत्तेचंद रांका, कृष्णकुमार गोयल, शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना वाडेकर, श्‍याम देशपांडे, प्रशांत बधे, गणेश सातपुते, अभिजित पानसे, उमेश चांदगुडे, व्ही. व्ही. मूर्ती या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ""आपण नुसते शिवशाही हवी, असे म्हणतो. शिवरायांचा जयजयकार करतो, पण खरी शिवशाही काय आहे? गेल्या काही काळात पुण्यात बॉंबस्फोट होत आहेत. महिलांवर अत्याचार सुरूच आहेत. अशा वेळी रांझ्याच्या पाटलाप्रमाणे जागच्या जागी न्याय करणाऱ्या शिवशाहीची आठवण होते. पण सध्या आरोपी मिळाले तर मिळतात, खटले चालतात आणि पुढे काहीच होत नाही. अफझल गुरू, अजमल कसाब यासारख्यांना अजूनही शिक्षा होत नाही. शिक्षा लटकते आणि गुन्हेगार मोकाट, असा भारत हा जगाच्या पाठीवरील एकमेव देश असेल. फाशीच्या शिक्षेसाठी बसस्टॉपसारखी लाइन लागली आहे, त्यात कसाबचा नंबर कधी लागणार?''

ठाकरे म्हणाले, ""पुण्यातील वनअधिकारी विलास बर्डेकर यांचे आपल्याच देशात अपहरण झाले. त्याला आठ दिवस उलटून गेले, तरी सरकार शांतच आहे. सरकारची संवेदनाच संपून गेली आहे. स्वतःच्या अधिकाऱ्यांचे रक्षण करू न शकणारे सरकार या किल्ल्यांचे संरक्षण काय करणार?''

शिवसेनेची दुर्गप्रेमी शाखा
शिवसेनेची दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहक शाखा स्थापन करण्याची घोषणा या वेळी ठाकरे यांनी केली. ते म्हणाले, ""जगभरात बारीकसारीक गोष्टींचेही इतके मार्केटिंग होते. महाराष्ट्रात तर अलिबाबाची गुहा फिकी पडेल, असे वैभव आहे. सरकार फक्त या वैभवाचे संवर्धन करण्याच्या घोषणा करते, पण त्यासाठी निधी कोठे आहे? अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक, रायगडावर शिवरायांच्या पुतळ्यास मेघडंबरी यांचे काय झाले? शिवशाहीत मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांनी दिल्ली हादरून जात असे, आज मात्र या वैभवाच्या खाणाखुणा जपण्यासाठी दिल्लीची परवानगी लागते, ही लाजिरवाणी बाब आहे.''

प्रतिक्रिया
On 31-07-2010 18:00:33 aajgar said:
राजकारण हे लोकांनी करायचे आसे फ्हाका नेते मंडळी किती काम करणार. खरेच जर ऐतिहासिक जोपासना करायची असेल तर लोकांनी पुढाकार घ्यावा. नाही तिथे वर्गणी देऊ नका आणि समाज कार्य साठी दान करा. सरकार हे शेवटी सरकार आहे खूप आपेझ्हा करू नका इतिहास बघा आणि आपल्याला जे थोडे आविश्य मिळाले आहे ते मार्गी लावा
On 24/05/2010 2:41 a.m. milind said:
सरकारची कशाला सर्व जनतेची संवेदना संपली आहे
On 5/23/2010 10:18 PM Sharvari said:
There are many Kasab in Maharashatra like many gangstars, builders, leaders, Directors of Patsanstha.
On 5/23/2010 6:57 PM durdaivi maharashtriy said:
या सगळ्या राजकारणी लोकांच्या पक्षांनी स्वत:जवळचे मार्ग काढून यातून नव निर्माणाचे प्रयत्न केले पाहिजेत. पक्षांच्याजवळ जो अमाप धनसंचय आहे त्याचा उपयोग फक्त निवडणुकीसाठी न करता देश हितासाठी करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. पक्ष पुढे आले तर लोकांचा सहभाग मिळेलच. आणि सत्ताही मिळेल. सगळ्याच गोष्टी सरकार करील अशी अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही.कारण मंत्री आणि सरकारी लोक हे केवळ "अर्थाचे" धनी कामाचे नव्हे हे आमचे दुर्दैव आहे.
On 23/05/2010 17:53 Ganpoo said:
मी सहमत आहे लेखकाशी .....
On 5/23/2010 5:39 AM raju said:
व साहेब चांगला विषय मांडला आहे आम्ही बरोबर आहोत. सिंहगडापासून सुरुवात करू या


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: