महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा परीक्षेला गैरहजर!
-
Tuesday, May 25, 2010 AT 04:45 PM (IST)
रांची - वेस्ट इंडिजमध्ये नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेमुळे भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला पुन्हा एकदा पदवी परीक्षेला बसता आलेले नाही. सलग दुसऱ्यांदा धोनी पदवी परीक्षेसाठी गैरहजर राहिला आहे.
धोनीने येथील सेंट झेवियर महाविद्यालयात "ऑफिस मॅनेजमेंट ऍण्ड सेक्रेटरियल प्रॅक्टिस' या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. परीक्षेलाच गैरहजर राहिल्यामुळे धोनीवर पुन्हा एकदा नापासाचा शिक्का बसणार आहे. गेल्यावर्षीही ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेमुळे धोनीला परीक्षेला बसता आले नव्हते.