Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मेरी कोम उपांत्यपूर्व फेरीत
पीटीआय
Wednesday, May 26, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: mery kom,   boxing,   sports
नवी दिल्ली - जगज्जेत्या एम. सी. मेरी कोम हिने महिलांच्या पाचव्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. ही स्पर्धा अस्ताना (कझाकस्तान) येथे सुरू आहे. चार वेळा जगज्जेतेपद पटकावणाऱ्या मेरी कोम हिने 46 किलो गटातील लढतीत फिलिपिन्सच्या जोसी गॅबेयुको हिच्यावर 8-1 अशी मात केली. गतवेळेस गुवाहाटीत झालेल्या या स्पर्धेत मेरी कोमला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले होते. मेरी कोम म्हणाली, ""ही लढत एवढी अवघड नव्हती. मला चांगला "ड्रॉ' मिळाला आहे. मात्र, कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखून चालणार नाही. अर्थात, मला माझ्यावर पूर्ण विश्‍वास आहे.'' भारताच्या व्हेनल ड्युआतीने 48 किलो गटाच्या लढतीत किरगिजिस्तानच्या राहातोवा नाझिरा हिच्यावर 9-0 अशी सहज मात केली. ड्युआतीच्या आक्रमकतेसमोर नाझिरा टिकाव धरू शकली नाही. ड्युआतीनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: