Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

आशियाई परिषदेचीही क्रीडा मंत्रालयावर टीका
वृत्तसंस्था
Saturday, May 29, 2010 AT 12:00 AM (IST)
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीपाठोपाठ (आयओसी) आशियाई ऑलिंपिक परिषदेनेही (ओसीए) क्रीडा मंत्रालयावर टीका केली आहे. क्रीडा संस्थांच्या स्वायतत्तेमध्ये हस्तक्षेप करू नये, असा इशाराच "ओसीए'ने दिला.

भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सरचिटणीस रणधीरसिंग हेच "ओसीए'चेसुद्धा चिटणीस आहेत. त्यांच्यावर क्रीडा मंत्रालयाने वैयक्तिक टीका केली आहे. "ओसीए'चे महासंचालक हुसेन अल्‌-मुसल्लम यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री एम. एस. गील यांना एक पत्र लिहिले आहे. रणधीर यांच्यावरील टीकेचा निषेध करून ते म्हणाले की, राष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या स्वायत्तता आणि कार्यपद्धतीमधील कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप "ओसीए'ला मान्य नाही. आमच्या घटनेनुसार यामुळे गंभीर कारवाई होऊ शकते.

रणधीर यांना अल-मुसल्लम यांनी पाठिंबा दिला. त्यांनी सांगितले की, रणधीर यांचे ज्ञान, समंजसपणा आणि ऑलिंपिक चळवळीवरील निष्ठा आदर्शवत आहे. ऑलिंपिक चळवळीच्या विविध शाखांमध्ये त्यांनी उत्तम संतुलन राखण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. आशियामधील विविध देशांच्या ऑलिंपिक संघटना, "ओसीए' आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटना यांच्यामध्ये त्यांनी नेहमीच समन्वयाची भूमिका बजावली आहे.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: