Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मान्सून केरळमध्ये दाखल
पीटीआय
Monday, May 31, 2010 AT 04:03 PM (IST)
Tags: monsoon,   rain,   kerala,   imd,   new delhi,   national
नवी दिल्ली - नैऋत्य मोसमी पाऊस केरळात दाखल झाल्याचे हवामान विभागाने आज सांगितले. मान्सूनच्या आगमनाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या वर्षी दुष्काळसदृश्‍य परिस्थितीचा सामना करावा लागल्याने संपूर्ण देश मान्सूनकडे डोळे लावून बसला होता.

""नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून उद्यापर्यंत तो कर्नाटकच्या सागरी किनारपट्टीला व्यापून टाकेल,'' असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक अजित त्यागी यांनी सांगितले.

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या वादळामुळे पश्‍चिम किनारपट्टीवर आणि अंतर्गत भागात पोहोचण्यास मान्सूनला वेळ लागेल. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने हा उशीर होऊ शकतो. चक्रीवादळ तयार झाल्यास गुजरातची किनारपट्टी आणि पाकिस्तानच्या कराची बंदराला ते धडकण्याची शक्‍यता आहे,'' असेही त्यागी यांनी सांगितले.

हवामान विभागाने गेल्याच महिन्यात या वर्षी मान्सूनचे प्रमाण सामान्य राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
प्रतिक्रिया
On 5/31/2010 9:09 PM prashant said:
आत्ता भारनियमन कमी होईल अशी अशा करूया
On 5/31/2010 5:45 PM narayan said:
अतिशय आनंदाची बातमी..................................
On 5/31/2010 5:46 PM megha said:
हे वरुण देवा आपले स्वागत असो !!!
On 5/31/2010 5:32 PM nams said:
आला पुण्यात सुद्धा आला पाऊस..अंदाज खरा ठरला
On 5/31/2010 5:00 PM Puneri said:
आसे अंदाज छापण्याचे कष्ट घेऊ नका. आज पर्यंत हवामान खात्याचा एक सुधा अंदाज खरा ठरला नाही.
On 5/31/2010 4:57 PM ganesh said:
पुण्याला कधी येणार ते सांगा...
On 31/05/2010 16:47 majesheer punekar said:
पाउस पडेल, ९० टक्के पाणी वाया जाइल आम्ही कधीही पाण्याचे नियोजन करणार नाही.
On 5/31/2010 4:43 PM Milind said:
आपले स्वागत असो !!!
On 5/31/2010 4:26 PM समाज सुधारक said:
अतिशय आनंदाची बातमी. ये ये रे पावसा.................
On 31/05/2010 16:22 Bhaskarreddy said:
प्रत्येक वेळेस यांचे अंदाज चुकीचे असतात. देव करो या वेळेस चुकू नये मंजे झाले.
On 5/31/2010 4:16 PM Indian said:
हे वरुण देवा.... बिनधास्त कोसळ, भिजवून टाक आम्हाला आणि मिटवून टाक ह्या धरणीची तृष्णा....१ वर्ष झाले, खूप धोका झाला गेल्यावेळी, यंदा असे करू नकोस.....विनंती करतो....


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: