Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'शोपियॉं'प्रकरणी काश्‍मिरात 'बंद'
यूएनआय
Monday, May 31, 2010 AT 12:15 AM (IST)
श्रीनगर - निलोफर आणि असिया या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दक्षिण काश्‍मिरातील शोपियॉं भागात आज "हुरियत कॉन्फरन्स'ने कडकडीत बंद पाळला. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी हा गुन्हा केल्याचा आरोप स्थानिक जनतेचा आहे.

"बंद'मुळे शोपियॉं भागात सुरक्षा दल आणि पोलिसांचा तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. या काळात जमावाने केलेल्या हल्ल्यात आज एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. "बंद'मुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता. पोलिसांनी "हुरियत'च्या काही नेत्यांना अटक केली असून, काही जणांना घरात बंदी करण्यात आले आहे. दरम्यान, या दोन अल्पवयीन मुलींच्या हत्येप्रकरणी सरकारने पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समितीची नेमणूक केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालानंतर सरकारने चार पोलिसांना निलंबित केले होते. त्यानंतर हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविले होते.

"हुरियत'च्या नेते नजरकैदेत
"हुरियत कॉन्फरन्स'चे अध्यक्ष मिरवाईझ मौलवी उमर फारुख आणि हुरियतच्या प्रवक्‍त्याला आज त्यांच्या राहत्या घरी स्थानबद्ध केले. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा एका भाग म्हणून त्यांना घराबाहेर निघण्यास बंदी घालण्यात आली आहे. "हुरियत'च्या प्रवक्‍त्याने सांगितले, की सुरक्षा दल आणि पोलिसांनी मिरवाईझ यांच्या घराभोवती कडे केले असून, पुढील आदेश मिळेपर्यंत घर न सोडण्याचा आदेश त्याला देण्यात आला आहे.
प्रतिक्रिया
On 08/11/2010 05:38 PM sameer bhave said:
इंग्रजांनी भारतीय राज्ये नष्ट करताना जी पद्धत वापरली तीच या काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांसाठी वापरली पाहिजे. पेशव्यांना मूळ राज्यापासून दूर वाराणसी येथे ठेवले. ब्रह्मदेशाचा(तेव्हाचा अखंड भारत) राजा थिबा रत्नागिरीत तसेच सातारकर छत्रपती उत्तर प्रदेशात ठेवले होते. स्थानिक संपर्क नसल्याने या राजांकडून व त्यांच्या प्रजेकडून बंडाचा धोका उरला नाही. आपणही काश्मीरसह भारत एक मानतो ना? मग या सर्व पाकिस्तानवादी व फुटीरतावादी नेत्यांना केरळ, तामिळनाडू, कर्नाटक येथे स्थानबद्ध करून ठेवा.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: