Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

लिटल चॅम्पचा "आठवा स्वर'
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 02, 2010 AT 12:00 AM (IST)
मुंबई - लिटल चॅम्पनी अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. सारेगमपचे हे पर्व संपल्यानंतरही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही, यातील काही लिटल चॅम्प आपल्या आवाजाची मोहिनी रसिकांवर घालण्यासाठी पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांचा "आठवा स्वर' हा अल्बम येणार आहे. 7 जून रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात या अल्बमचे प्रकाशन होणार आहे.

मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, अवंती पटेल, शमिका भिडे आणि शाल्मली सुखटणकर यांनी गायलेली गाणी या अल्मबमध्ये आहेत. लहान मुलांचा सांगीतिक उपक्रमाद्वारे विकास करणाऱ्या कलांगण संस्थेच्या वर्षा भावे आणि गेली 85 वर्षे संगीत वाद्यांच्या पिढीजात व्यवसायात असलेले हरिभाऊ विश्‍वनाथ कंपनीचे मालक उदय दिवाणे हे दोघेही "सारेगमप... लिटल चॅम्प' स्पर्धा सुरू झाल्यापासून या मुलांशी जोडले गेले आहेत. वर्षा भावे यांनी या स्पर्धेत समुपदेशकाची जबाबदारी पार पाडली होती; तर उदय दिवाणे यांचे या मुलांशी वेगळेच भावबंध निर्माण झाले. त्यामुळे त्यांनी या मुलांच्या प्रेमाखातर "आठवा स्वर' अल्बम काढला आहे. यामध्ये एकूण तेरा गाणी असून त्याला स्वरसाज वर्षा भावे यांनी चढविला आहे.

"आठवा स्वर' साठी नवीन गाणी निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये कविवर्य बा. भ. बोरकर, कविवर्य मंगेश पाडगावकर, ऋषिकेश परांजपे, अनुराधा नेरूळकर, वैभव जोशी, प्रसाद कुलकर्णी, शैलजा चारेगावकर, स्पृहा जोशी आणि वर्षा भावे यांच्या गाण्यांचा समावेश आहे. याबाबत उदय दिवाणे म्हणाले, ""सारेगमप सुरू असताना या मुलांना घेऊन एखादा अल्बम काढावा असे मला वाटले. त्यामुळे मी हा अल्बम काढला; मात्र या मुलांनी गायलेली गाणी पुन्हा घ्यायची नाहीत, असे निश्‍चित केले. कारण ही मुले जुनी आणि लोकप्रिय ठरलेली गाणी इतकी छान गातात म्हटल्यानंतर नवीन गाणीदेखील ती तितकीच चांगली गातील याची खात्री आम्हाला होती. त्यामुळे नवीन गाणी घेऊन अल्बम काढला आहे. गण-गवळण, अभंग, गारूड, बंदिश आणि शेवटचे एक गाणे माय मराठीचे आहे. ते सर्वांनी मिळून गायलेले आहे. त्याबरोबरच आठ सोलो गाणी, चार ड्युएट अशी तेरा गाणी आहेत.''
प्रतिक्रिया
On 7/23/2010 7:34 PM sumit badhan said:
aathva avar is the really nice album.spesially mugdhas song is a nice song.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: