Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

"श्‍यामची आई' 20 हजार मुलांपर्यंत!
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 02, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: shyamchi aai,   book,   pune


 
दत्ता पुराणिक
 
 
 
 
पुणे - साने गुरुजींचे विचार आणि "श्‍यामची आई' पुस्तक घरोघरी पोचविण्याचा संकल्प सोडणारे ज्येष्ठ नागरिक दत्ता पुराणिक यांनी नुकताच 20 हजार पुस्तके मुलांपर्यंत पोचविण्याचा टप्पा पूर्ण केला. या पुस्तकाच्या माध्यमातून नव्या पिढीवर संस्कार व्हावेत, यासाठी वयाच्या ऐंशीव्या वर्षीही कार्यरत राहणाऱ्या पुराणिक यांचा आणखी पाच वर्षे हा उपक्रम राबविण्याचा मानस आहे.

साने गुरुजींच्या विचारांनी भारावून जाऊन "श्‍यामची आई' हे पुस्तक घरोघरी पोचविण्याचा त्यांचा दिनक्रम आजही सुरू आहे. शनिवार पेठेतील भावे वाड्यात असणारे त्यांचे घर अक्षरशः साने गुरुजीमय झाले आहे. पुराणिक हे मूळचे अंमळनेरचे. साने गुरुजी त्यांच्या शाळेसमोरून चालत जाताना दररोज त्यांची विचारपूस करीत असत, अशी आठवण ते आजही सांगतात. इंग्रजांच्या जाचामुळे साने गुरुजी काही काळ भूमिगत राहिले होते, त्या वेळी त्यांची सेवा करण्याची संधीही पुराणिकांना मिळाली होती. सन 1950 मध्ये गुरुजींनी अंमळनेर सोडताच पुराणिक यांनीही पुण्याचा रस्ता धरला.

गुरुजींच्या कार्याचा वसा समाजापर्यंत पोचविण्याची गरज आहे; तसेच मुलांवर संस्कार करण्याची ताकद असणाऱ्या "श्‍यामची आई'चा प्रसार करण्याच्या विचारातून 1994 मध्ये पुणे विद्यार्थी गृहातून या पुस्तकाच्या प्रती विकत घेतल्या. त्या घरोघरी विकण्यास त्यांनी सुरवात केली. दररोज सकाळी 8 ते 12 आणि दुपारी 4 ते 8 या वेळेत ते विक्रीसाठी बाहेर पडतात. गरजू मुलांना अत्यल्प किमतीत ते पुस्तके देतात. एकाही पुस्तकाची विक्री न झाल्यास ते दुपारी जेवत नाहीत. बालनाट्याचे दिग्दर्शक अशी त्यांची वेगळी ओळखही आहे. त्यांच्या "संगम रंगभूमी'च्या माध्यमातून त्यांनी अनेक बालनाट्येही बसविलेली आहेत. "श्‍यामची आई' पुस्तकावर कथाकथनाचा कार्यक्रमही ते करतात.

या प्रवासाबाबत माहिती देताना ते म्हणाले, ""साने गुरुजींच्या विचारांमध्ये संस्कारांची जबरदस्त ताकद जाणवते. आज पालकांना मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. त्यामुळेच व्यसने आणि नको त्या गोष्टींच्या आहारी जाण्याकडे कल वाढतो आहे. मुलांवर चांगले संस्कार घडावेत, यासाठी हा उपक्रम आहे. वीस हजार पुस्तकांतून वीस मुले जरी सुधारली तरी मला समाधान मिळेल.''

पुराणिक यांचा उपक्रम
20 हजार पुस्तकांची विक्री
पाच हजार इंग्रजी पुस्तके अमेरिकेत
25 हजार माहिती पत्रकांचे वाटप
साडेपाच हजार सीडींची विक्री

प्रतिक्रिया
On 6/2/2010 7:35 PM rohit said:
बाळ नितीन तू दुसर्यांना दोष देण्या पेक्षा तू फुले आणि आंबेडकरांचा प्रचार करायला शिक तुला माझा माझ्या मित्रांचा पूर्ण पाठींबा असेल. आणि एक लक्षात असुदेत दुसर्याने मारलेली रेष छोटी करण्याला तुझी ताकद वाया नको घालवू स्वतः ची दुसरी रेष त्या रेषेपेक्षा मोठी कर, बघ तुझी रेष मोठी होती कि नाही ते.
On 6/2/2010 6:02 PM SHREERAM SABNIS said:
जैश्रीराम दादा अलीअस दत्ताजी इकडे उस सुचित्रा कडे अमेरीकातेला आलो असताना तुमच अर्तीकॅल वाचून खूप आनंद झाला आणि तुम्ही करत असलेल्या कामाची जाणीव परदेशात राहणाऱ्या मुलाना करून देता आली आत्ता मी माझ्या नाती करता पण तुमच्या कडून सीडी आणि पुस्तक आणले आहे .आपल्या पुढील संकल्प करता हार्दिक शुभेच्या आणि या कामात माझा खारीचा वाटता नक्की उचलण्याचे अश्वाषण देतो . धन्यवाद !
On 6/2/2010 6:00 PM nitin said:
साने गुरुजी ह्यांच्या पुस्तकाचे हक्क दत्ता पुराणिक ह्यांचा का मिळाले? एकाद्या कांबळे गायकवाड आठवले ह्यांना का नाही मिळाले..........ह्यांना ब्राम्हन्या वाद म्हणतात....पुराणिक आजोबा पुस्तकाच्या विक्रीचे पैसे किती मिळाले ते सांगा जनतेला.......
On 6/2/2010 1:45 PM pradnya said:
पुराणिक आजोबा आमच्या पुण्याची शान आहेत
On 6/2/2010 1:11 PM Shyamli said:
मी हे पुस्तक पाचवीत असताना वाचला होता आणि नंतर दहावी झल्यावर. माझ्या व्यक्तिमत्वावर नक्कीच त्याचा प्रभाव पडला. आजकालच्या नुक्लेअर फमिली मद्धे मुलांना नक्कीच हे पुस्तक फ्याद्याचे ठरेल - नात्यांचे मोल समजायला! पुस्तक घरोघरी पोचविण्याचा संकल्प नक्कीच कौतुकास्पद आहे!
On 02/06/2010 12:23 anand said:
You can meet Mr. Puranik at Vijay Talkies near staircase.
On 02/06/2010 10:28 हेरंब फडके, पुणे said:
हे पुस्तक मी २ दा वाचले आहे. एकदम छान आहे..कधी कधी रडायला पण येते....
On 6/2/2010 2:21 AM ketan said:
पुराणिक आजोबांना कुठे संपर्क करायचा हे कळेल का? म्हणजे वाचक ह्यात भाग घेऊ शकतील


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: