Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पुण्यातील वाहतूक निर्बंधांबाबत सूचना पाठवा
सकाळ वृत्तसेवा
Saturday, June 05, 2010 AT 05:54 PM (IST)
Tags: traffic,   police,   suggesions,   pune

पुणे - शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठी चतुःश्रृंगी परिसरातील ओम सुपर मार्केट ते दिप बंगला चौकाजवळील एचडीएफसी बॅंकेच्या रस्त्यावर नो पार्किंग करण्यात आले आहे. या रस्त्यावर आनंद बंगला ते विघ्नहर्ता अपार्टमेंटच्या गेटपर्यंतच्या रस्त्यावर तसेच एचडीएफसी बॅंक ते शांतीनिवास बंगल्याच्या गेटपर्यंतच्या रस्त्यावर 80 मीटर अंतरात नो पार्किंग करण्यात आले आहे.

याशिवाय कामगार पुतळा चौकाकडून वेलस्ली पुलामार्गे शाहीर अमर शेख चौकाकडे जाण्यासाठी एकेरी वाहतूक करण्याचा आणि उलट दिशेने सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्याचा वाहतूक पोलिस शाखेचा विचार आहे.

रूग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलिस वाहने अशा अत्यावश्‍यक सेवांसाठी मात्र हे निर्बंध लागू नाहीत.

1 जून ते 15 जून या कालावधीत प्रायोगिक तत्वावर हे निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांना येत्या 14 जूनपर्यंत या संदर्भातील सूचना पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, साधु वासवानी रस्ता, पुणे 411 001. या पत्त्यावर लेखी स्वरूपात कळवता येतील.
प्रतिक्रिया
On 12/08/2011 11:26 PM Appa said:
जंगली महाराज व फर्गुसन रोड एकेरी करून पोलिसांनी भरधाव जाणाऱ्या चार चाकी असलेल्याची सोय केली व शांत असलेले गल्ली बोळ गाड्यांनी भरून गेले.शालेय विद्यार्थी सामान्य नागरिक यांचे नुकसान केले.सरकार नेमके कोणासाठी काम करत आहे.हेच समजत नाही.आता सर्व शहर एकेरी करा म्हणजे सामान्य माणूस बाहेरच पडू शकणार नाही व दारू पिऊन भरधाव गाडी चालवणाऱ्याच्या गाडी खाली चिरडणार नाही.आता या एकेरी रस्त्यांची जबरदस्तीला साथ देणाऱ्या नगरसेवकांना धडा शिकवण्याची वेळ जवळ आली आहे.त्यांनाहि जनता एकेरी रस्त्यांने घरी पाठवणार
On 6/7/2010 10:29 AM संजय, कॅनडा said:
संपूर्ण पुणेच नो एन्ट्री करा ना आणि मग फेरीवाले,भाजीवाले(इतर काही करता आले नाही तरी भाजीविक्री नक्की जमते फारच popular झालाय वाटते हा धंदा) हातगाडीवाले ह्या सर्वाना मुक्तपणे धंदा करू द्यात हि खरी 'मुक्त बाजारपेठ' !! बरे झाले इकडे आलोय
On 5/06/2010 11:59 PM Khavchat said:
आता मात्र हे अति होते आहे...!! पुणेकरांना वाहतुकीचे पालन करायला लावायचे म्हणजे काय..?? उदयाला स्वच्छ पाणी आणि शुद्ध हवा पण द्याल आणि मग पुणेकर शेफारले तर..?? उगीच चांगल्या सवयी नका लावू आम्हाला. नाहीतरी पुणे मुंबई असे एकत्रच आम्हाला संबोधतात मग बकालपणा बाबतीत तरी आम्ही पुणेकरांनी का मुंबई च्या मागे राहायचे ?
On 6/5/2010 11:12 PM dilip said:
sarva प्रथम गाडी वर लाल पिवळे दिवे लावून दिशा भूल करणाऱ्या धन दान्द्ग्याना शिक्षा करा . किती व्ही आय पी ना लाल पिवळे दिवे लावायची परवानगी आहे याची सूची इंटर नेत च्या द्वारे जाहीर करा .
On 6/5/2010 11:07 PM Mi Puneri said:
PCMC च्या बाणेर किंवा "डांगे चौकापासून" ब्रेमेन चौक-विद्यापीठ मार्गे शिवाजीनगर किंवा चतुर्श्रुंगी-कोथरूडच्या दिशेने सध्याची बहुचर्चित "पुणे मेट्रो" होण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे या भागातील वाहतूक कमी होईल. याच भागात सध्या वस्तीही वेगाने होत असून अपघातही वाढले आहे. हे भाग रेल्वेपासून लांब असल्याने "Mass Rapid Transit" चा एकमेव उपाय म्हणजे मेट्रो. उगीच चिंचवड-शिवाजीनगर हा अव्यवहार्य मार्ग बांधू नये.
On 6/5/2010 8:21 PM शिवराम गोपाळ वैद्य said:
पुण्यात रहदारीचे नियम पाळून वाहन चालवणारे मूर्ख ठरत आहेत. वाहतूक नियंत्रित करणे हे काम पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे. आणि ते साहजिकच आहे. जोपर्यंत प्रत्येक वाहनधारक स्वतःच्या मनाने निर्बंध घालून घेणार नाही तोपर्यंत हे नियंत्रण येणे अशक्य आहे. तसेच पुण्याच्या अनेक चौकातील सिग्नलचे टाईमिंग खूप कमी आहे ते वाढवण्याची गरज आहे. कमी वेलामुळे वाहतूक तुंबून राहते. हमरस्त्यावर चौकात सिग्नल जास्त वेळ हिरवा असेल तर वाहने लवकर जाऊन वाहतूक सुरळीत होईल असे वाटते. नियम तोडणार्या चालकावर कडक कारवाई करावी.
On 6/5/2010 8:04 PM One Studip Comman Man said:
काय सांगाव आता सामान्य माणूस काहीच बोलू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही. ज.म> रोड साठी किती सूचना दिल्या आणि किती फोल्लोव केल्या पालिके नि आणि पोळीचे दिपार्त्मेंत नि? एक दिवस एखादा स्टुपिड कॉमन मन जागेल आणि काय करेल ते सांगता येत नाही?
On 6/5/2010 7:10 PM sanjivanee tophkhane said:
सर्वात प्रथम नियम मोडणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करा.चिरीमिरी घेऊन सोडून देणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा. चुकीचे ओवरटेक करणारे बेफाम दुचाकीवले यांना शिस्त लावा.पुणेकर वाहतुकीचे नियम न पाळणारे म्हणून प्रसिद्ध झाले आहेत.
On 6/5/2010 6:56 PM d.r.bahulekar said:
No parking pati var 100 miter,50 miter aase lihile asate. vahan dharakani apalya barobar mojanyacha tape gheun jayala pahije kay? kothe parking karave yachya suspasht khuna kelya tar vahan dharakancha khup paisa vachel. parantu mag varkamai kashi hoil? bicharya vahan dharakana wali nahi.
On 6/5/2010 6:44 PM Suhas said:
आपण जो पर्यंत व्यावहारिक द्र्यष्ट्या अभ्यास करून उपाय अमलात आणत नाही तो पर्यंत पुण्या ची वहातुक सुरळीत होणार नाही. ह्या गोष्टी साठी सामान्य जनते ने देखील पुण्यावर प्रेम दाखवत सर्व नियम पाळले पाहिजेत. शालेय अभ्यासक्रमात वहातुक नियम व ते कशे पाळले पाहिजेत ह्याचा समावेश असावा. अगदी रस्ता ओलांडताना दोन्ही बाजू कडे पाहण्या पासून ते दुचाकी व चार चाकी कशी चालवावी इथ पर्यंत सर्व काही सर्वाना माहित असावे.
On 6/5/2010 6:17 PM MP said:
traffic light jawal, "No turn on Red" he sign lawa,mnje tumche khaooPolice 200ft.war ubhe rahun konala jabardasti pakdun piase ukalanar nahi...tasech thikthikani eightsided STOP sign lawa,,,,mukhya mnje aapan sarwani wahtukiche niyam palawet...
On 6/5/2010 6:04 PM sachin said:
पे पार्किंग असेल तर असे नियम कोण काढत नाही.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: