मुंबईत मॉन्सून दहा जूनपर्यंत शक्य
पीटीआय
Saturday, June 05, 2010 AT 12:00 AM (IST)
नवी दिल्ली - "फेट' वादळामुळे मॉन्सूनची गती मंदावली आहे. येत्या आठवड्यात तो गतिमान होण्याची शक्यता असून, मुंबईत तो 10 जूनपर्यंत पोचेल, असा हवामानशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. केरळमध्ये या वर्षी 31 मे रोजी मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले. मात्र, फेट वादळामुळे त्याची अरबी समुद्रातील वाटचाल विस्कळित झाली. आता कराचीत सहा जूनला मॉन्सूनचा पाऊस पडेल आणि त्यानंतर लगेचच तो दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाकडे सरकेल. नऊ व दहा जूनला मॉन्सून पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक (आयएमडी) अजित त्यागी यांनी आज वर्तविला.