Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

हार्डवेअर आणि नेटवर्किंगमधून नोकरीच्या संधी!
प्रा. सुभाष शहाणे
Tuesday, June 08, 2010 AT 12:00 AM (IST)

सध्या कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग क्षेत्रात असंख्य रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. हे एक रोजगाराभिमुख व्यापक क्षेत्र बनले आहे.

कॉम्प्युटरचे कुतूहल लहान मुलांपासून वयस्कर मंडळीपर्यंत सर्वांनाच आहे. आज-काल कॉम्प्युटर, लॅपटॉप, नोटबुक वगैरेचा वापर घरोघर सुरू झाला आहे. त्यामुळे कॉम्प्युटर चालविण्याचे प्रशिक्षण, विविध कॉम्प्युटरचे कोर्सेस, एमएससीआयटी वगैरे कोर्सेस असंख्य लोक करताना दिसतात. कॉम्प्युटरची दुरुस्ती, सर्व्हिस कॉन्ट्रॅक्‍ट, इंटरनेट कॅफे, कॉम्प्युटर असेम्ब्ली, कॉम्प्युटर मेंटेनन्स, तसेच हार्डवेअर व नेटवर्किंग इ. गोष्टींना भारी डिमांड आलेला आहे. या क्षेत्राला मंदीची चाहूलही लागलेली नाही.

शहरापासून अगदी लहान खेडेगावांपर्यंत कॉम्प्युटर पोहोचलाआहे. कॉम्प्युटरचा वापर इंटरनेट, बॅंकिंग टेक्‍नॉलॉजी - सीबीएस प्रणाली, ऍनिमेशन, ग्राफिक्‍स - डीटीपी, ऍटोकॅड, अकाऊंटिंग, ई-लर्निंग, डिझाइनिंग, रिसर्च, ऑपरेशन्स, इत्यादीमध्ये संगणकीकरण झालेले आहे. आज विविध कारखान्यांमधून,. बॅंका, विमा कंपन्या, आयटी कंपन्या, लहान-मोठी ऑफिसेस, लघुउद्योग, सरकारी व निमसरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे वगैरेमध्ये मोठ्या प्रमाणावर संगणकीकरण झालेले आहे. बऱ्याच कंपन्या, बॅंका, विमा कंपन्यांमधून हार्डवेअर व नेटवर्किंगचे काम; तसेच सर्व्हिस कॉन्ट्रॅक्‍ट बाहेरील एखाद्या कन्सल्टंट, व्यक्ती किंवा संस्थांकडे सोपविले जाते. (out sourcing).दरमहा मेंटेनन्सची कामे दिली जातात किंवा हार्डवेअर व नेटवर्किंगचा डिप्लोमाधारक उमेदवारांची नेमणूक केली जाते.
हार्डवेअर आणि नेटवर्किंगच्या क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी सध्या निर्माण झालेल्या आहेत.

प्रचंड स्मरणशक्ती, माहिती विश्‍लेषण, तत्परता, अचूकता, माहिती साठविण्याची क्षमता यामुळे कॉम्प्युटर ही एक काळाची गरज बनली आहे. सध्या मनुष्य कॉम्प्युटरशिवाय कामाची कल्पनाच करू शकत नाही. असाही अंदाज आहे की सन 2020 पर्यंत माणसाने प्राप्त केलेल्या गेल्या 5 हजार वर्षातील सगळे ज्ञान इंटरनेटरवर उपलब्ध असेल. आगामी काळात बहुसंख्य लोक इंटरनेटच्या साह्यानेच व कॉम्प्युटरवरूनच आपली दैनंदिन कामे करतील. कॉम्प्युटर, लॅपटॉपचा तसेच नेटबुकचा नुसताच वापर वाढलेला नाही तर कॉम्प्युटर खरेदीचे प्रमाणही वाढलेले आहे. कॉम्प्युटरच्या किंमतीही कमी होऊ लागलेल्या आहेत.

सध्या कॉम्प्युटर हार्डवेअर व नेटवर्किंग इंजिनिअरिंग सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर, असेब्ली, विक्री, दुरुस्ती, या क्षेत्रांत एक स्मार्ट व नवीन करिअरचा उगम झालेला दिसत आहे. "जिथे कमी तिथे आम्ही' या उक्तीप्रमाणे बेरोजगार उमेदवारांनी नोकरीसाठी व स्वयंरोजगारासाठी या हार्डवेअर व नेटवर्किंगच्या उगवत्या करिअरकडे अवश्‍य वळावे.

कॉम्प्युटरमध्ये दोन भाग असतात. एक हार्डवेअर व दुसरा सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे वेगवेगळे पार्टस विशिष्ट पद्धतीने वायरच्या साह्याने एकमेकांना जोडणे होय. यालाच "असेंब्लिंग' असेही म्हणतात. यामध्ये कॉम्प्युटरच्या विविध पार्टसची माहिती, जोडणी, कॉम्प्युटर दुरुस्ती, मेंटेनन्स, कॉम्प्युटर पार्टस जोडणी करून कॉम्प्युटर तयार करणे इत्यादी गोष्टी या हार्डवेअरमध्ये येतात.
नेटवर्किंग म्हणजे दोन किंवा जास्त कॉम्प्युटर एकमेकांना जोडणे होय. नेटवर्किंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे उदा. Computer, Printer, Scanner, Internet, Database, CD-Rom, Mouse, Motherboard, Key-board, हार्ड डिस्क व इतर साधनांचा समावेश होतो. तसेच इंटरनेट हे देखील फारच मोठे नेटवर्क आहे.

नेटवर्किंगचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : लॅन (LAN), वॅन (WAN), इंटरनेट, वायरलेस, सिक्‍युरिटी, विंडोज, सर्व्हर 2003, क्‍लायंट सर्व्हर, बॅक अप व रिस्टोअर वगैरे. वरील प्रकार हे नेटवर्क जोडण्याच्या पद्धतीनुसार पडतात. याला आपण टोपोलॉजी म्हणतो.

टोपोलॉजी पुढील प्रकारचे असतात - Star, Ring, Mesh, Bus, Hybrid
LAN (Local Area Network) हे एखाद्या बिल्डिंग किंवा एका ऑफिसात करता येते. WAN (Wide Area Network) हे जगभरातील कॉम्प्युटर इंटरनेटद्वारे जोडली जातात.
MAN (Metroppolitan Area Network) हे एका शहरातील कॉम्प्युटरना जोडण्यासाठी केले जाते. Client Server Network मध्ये एका कॉम्प्युटरला सर्व्हर बनवला जातो व इतर कॉम्प्युटर्स त्याला जोडले जातात, याला Client असे म्हणतात. Peer to Peer Networkध्ये प्रत्येक संगणक हा स्वतंत्रपणे कार्य करतो तसेच यामध्ये सर्व्हर ही संकल्पना नसते.

आज देशात कॉम्प्युटर्सची विक्रमी मागणी व विक्री वाढली आहे. भारतातील प्रमुख तंत्रज्ञान संस्था आयडीसीने रिपोर्ट केल्याप्रमाणे असे समजते, की या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत 14.4 लाख डेस्कटॉप कॉम्प्युटरची विक्री झाली आहे तसेच एकूण 22 लाख कॉम्प्युटर्सची विक्रमी विक्री झाली आहे. यामध्ये एचपी, डेल, एसर, कॉम्पॅक कंपन्या आघाडीवर आहेत.

यामुळे हार्डवेअर व नेटवर्किंग कोर्सेसला फारच मागणी आहे. यामध्ये व्यवसाय व नोकरीच्या अनेकविध संधी निर्माण झाल्या आहेत. उमेदवारांनी "जिथे कमी तिथे आम्ही' याप्रमाणे हार्डवेअर - नेटवर्किंग क्षेत्राकडे वळण्यास काहीच हरकत नाही. चांगल्या प्रथितयश ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यावा. त्या शिक्षण संस्थेचा ब्रॅण्ड, अनुभव, प्लेसमेन्ट ट्रॅक, अद्ययावत कॉम्प्युटर लॅब, त्या संस्थेचा अभ्यासक्रम, उच्चशिक्षित व अनुभवी फॅकल्टी, प्लेसमेन्ट ट्रॅक आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेन्ट प्रोग्राम वगैरे सोयी-सुविधा पाहूनच प्रवेश घ्यावा.

हार्डवेअर - नेटवर्किंगमध्ये सिसको सर्टिफाईड नेटवर्क असोसिएट (CCNA), सिसको सिक्‍युअर मिक्‍स फायरवॉल ऍडव्हॉन्स एक्‍झाम (CEPFA), चेक पॉइंट सर्टिफाईटड सिक्‍युरिटी ऍडव्हॉन्स एक्‍झाम (CCSA), मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेशन (MCSA), रेड हॅट सिक्‍युरिटी, सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेशन तसेच जेटकिंग हार्डवेअर ऍण्ड नेटवर्किंग प्रोफेशनल प्रीमियम (JCHNP Premium)  हा कोर्स जेट किंग इन्स्टिट्यूट शिवाजीनगर, जे.एम. रोड, पुणे येथे उपलब्ध आहे. वरील कोर्सेसला बॅंका, रेल्वे, विमा कंपन्या, विमान सेवा बीपीओज, केपीओज, तसेच इंडस्ट्रीजमध्ये भरपूर मागणी आहे.

MCP/ MCSA/ MCSE/ CCNA/ RH-133/ MSCE, LINUX हे सर्व कोर्सेस आयटीतील गरजा ओळखून तयार केलेले आहेत. याची परीक्षा ऑनलाईन देता येते. आज-काल केवळ बारावी, पदवीधर, पोस्ट ग्रॅज्युएट होऊन काहीच फायदा होत नाही तर त्याबरोबर आपण हार्डवेअर - नेटवर्किंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला तर नोकरीच्या - व्यवसायाच्या संधी चालून येतात. आज जवळ-जवळ सर्वच क्षेत्रांत संगणकीकरण झाले आहे. त्यामुळे कॉम्प्युटरमधील तज्ज्ञास फारच डिमांड आली आहे. विद्यार्थ्यांनी FY/ SY/ TY B.Com/ B.A/ B.Sc ल बरोबरच हार्डवेअर - नेटवर्किंगचा नोकरीभिमुख -व्यावसायाभिमुख मार्ग स्वीकारावा व लाभान्वित व्हावे.
प्रतिक्रिया
On 18/10/2011 12:06 PM ANIL MALI said:
जेक कॉम्पुटर मध्ये अभ्यासक्रम सगळ्यात उत्तम प्रकारे शिकवला जातो . म्हणून सांगतो जेक कॉम्पुटर मिरज मध्ये या आणि आपल्या जीवनाचे सार्थक करा . वेअर
On 22/09/2011 11:58 AM juber said:
amhala konawar tika karayachi nahi shikavnara kay shikvato yapeksha mahatavache aahe aapan kay shikato paise bharata tar sanpurn shikun ghay
On 20/09/2011 01:22 PM parashram bhadake said:
aare.....jetking......madhe kay bagtay Jec computer miraj madhe yeun bagha tumachi life ghadel.....
On 09/09/2011 06:32 PM Vinod said:
काहीच करूनका फक्त घरी बसा Jetking मध्ये Admistion घेण्यापेक्षा. ओ.के.
On 7/13/2011 7:00 PM keshav gawande said:
जेटकिंग च्या STUDANTS ना RAm पण बसविता येत नाही आता बोला ................. सगळा बाजार मांडला आहेआय आय एच टी ला थड faculties पण नाहीयेत ,tyanche dar आठवड्याला faculty change hotat,.. fees completion chi evadhi ghai kartat ki vicharu naka...
On 7/13/2011 4:22 PM KESHAV GAWANDE said:
मी केशव गावंडे कॉम्पुटर मध्ये आहे. व मला कॉम्पुटर काहीच येत nव्ह्ते मी सर्व Interne वर शिकलो. farmating सांगा माझा मेल आयडीवर पाठवा ओक सर .....
On 16/04/2011 12:39 PM Kiran said:
Hardware shekaiche asel tar ibs computers ratnagirila ja
On 28-02-2011 14:11:25 avinash said:
मला hardwer ची माहिती हवी कुपया दय
On 10/6/2010 3:24 PM atul pardeshi said:
कशाची संधी ...... आज काल शाळेतली मुले सुद्धा घरीच कॉम्पुटर रेपैर करतात . इंटरनेट वर सर्च केले कि सगळे information भेटते ...... कोर्से करून कोण पैसे घालवणार . ..... तो पण जेटकिंग सारखा
On 8/18/2010 12:08 PM maddy said:
जेटकिंग एकदम भंगार आहे थेते कोणीच शिकू नये मला चांगला अनुभव आहे
On 6/12/2010 3:07 PM Punekar said:
आय आय एच टी ला थड faculties पण नाहीयेत ,tyanche dar आठवड्याला faculty change hotat,.. fees completion chi evadhi ghai kartat ki vicharu naka...
On 6/9/2010 11:40 AM Jagdish said:
जेटकिंग पेक्षा पुण्यात खूप चांगले शिकवणारे आणि माफक फी घेणारे institute आहेत. for e.g. YCMOU/ Kohinoor Technical Institute/ CMS Institute / IIHT Institute / Seed Infotech etc. माझ्या अनुभवा प्रमाणे MCSE साठी IIHT institute and Seed Infotech best आहे. CCNA and Red Hat Linux साठी DSK Inotech best आहे. Sun and Solaris साठी Accel Frontline best आहे.
On 6/9/2010 11:21 AM Nashikkar said:
मंदीची चाहूल लागण्याचा प्रश्न कुठे आधीच पगार कमी आहे ३ ते ५ हजार छोट्या शहरात आणि ५ ते १५ हजार मोठ्या शहरात. जेटकिंग सारख्या instistute चे पैसे वसूल करण्यासाठी २ ते ३ वर्षे लागतात त्यापेक्षा व्यवसाय चांगला.
On 6/8/2010 4:07 PM nilesh sonwane said:
shahane asal tar software kade ja bharpur paisa aahe, chukun hi hardware kade jau naka, Good luck
On 6/8/2010 3:11 PM santosh said:
जेटकिंग च्या STUDANTS ना RAm पण बसविता येत नाही आता बोला ................. सगळा बाजार मांडला आहे
On 6/8/2010 10:48 AM mahesh said:
काय ते शिकवतात जेटकिंग वाले.... फक्त पैसा उकळण्याचे कामे आहेत... जेटकिंग चे नाव आहे त्यामुळे बरेच जण फसले जातात... नाव मोठे लक्षण खोटे हि म्हण त्यांच्यासाठी लागू नक्कीच पडेल ... अशा जाहिराती देऊन उगाच फसवणूक करू नका ...VAM


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: