Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

कसाबविरोधात यापुढेही उज्ज्वल निकमच
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 09, 2010 AT 12:30 AM (IST)

मुंबई - मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातील प्रमुख आरोपी दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब याला विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर या शिक्षेविरुद्ध होणारे अपील लक्षात घेता, उच्च न्यायालयातही तपास यंत्रणांची बाजू सक्षमपणे लावून धरण्याकरिता उज्ज्वल निकम यांना पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव मुंबई पोलिसांनी तयार केला आहे. हा प्रस्ताव गृह, तसेच विधी व न्याय विभागांकडे येत्या दोन दिवसांत पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई हल्ल्याच्या खटल्यात विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एल. टहलियानी यांनी दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब याला फाशीची शिक्षा ठोठावली; तर सहआरोपी फहीम अन्सारी व सबाउद्दीन कुरेशी यांना त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे गोळा करता न आल्याने निर्दोष मुक्त केले. कसाबच्या फाशीवर उच्च न्यायालयात शिक्‍कामोर्तब केले जाणार आहे. त्यासाठी विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची सर्व कागदपत्रे उच्च न्यायालयात पाठविली जाणार आहेत. याशिवाय झालेल्या शिक्षेविरुद्ध कसाबला उच्च न्यायालयात अपील करता येणार आहे. उच्च न्यायालयात कसाबची बाजू मांडण्यासाठी आज सरकारने दोन वकिलांची नेमणूकही केली आहे. या प्रकरणात सरकारची बाजू लावून धरण्यासाठी पुन्हा सरकारी वकील नेमावा लागणार आहे. या खटल्यासाठी नवीन सरकारी वकील दिल्यास या संपूर्ण प्रकरणातील खाचखळगे नव्या सरकारी वकिलांना समजावून सांगावे लागतील. त्यामुळे या प्रकरणात न्याय मिळण्यास पुन्हा विलंब होऊ शकेल. त्यामुळेच या खटल्यात तपास यंत्रणांची बाजू भक्कमपणे लावून धरणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना पुन्हा उच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडण्याची संधी मिळावी, असा प्रस्ताव मुंबई पोलिसांनी तयार केला आहे. उच्च न्यायालयात फाशीविरुद्ध होणारे कसाबचे अपील फेटाळून, त्याची फाशी कायम राहावी; तसेच विशेष न्यायालयाने निर्दोष सोडलेल्या फहीम व सबाउद्दीन यांना निर्दोष सोडल्याच्या निर्णयाविरुद्ध पुन्हा युक्तिवाद करता यावा याकरिता उज्ज्वल निकम यांनीच पुन्हा सरकारची बाजू मांडावी, असा पोलिसांचा आग्रह आहे.
प्रतिक्रिया
On 23/11/2010 08:48 AM vaibhavi said:
निकम साहेब आपण हुशार आहत,आपली वकिली बाण्याने चालेली कासाब्ची तपासणीही उत्तम आहे पण एवढा वेळ का घालवत आहात? कोण कुठला हा फाटू कसब त्याच्या जिभेचे चोजले आपल्या देशात पुरवले जात आहेत,त्याची नाटक सगळी आपण पलेअसे बंद करायला लावा आणि त्याला मरणा यातना काय असतात हे पोलिसांना दाखवला सांगा. मग कळेल कि आपण कसे लोकांना मारले ते.
On 09-06-2010 12:16:33 सचिन said:
अड. निकम आपण तर खूपच छान आहात. पण लोकशाहिचा पैसा का वाया जात आहे? आपल्याकडे चित्रफीत आहे मग हा वेळ का लागत आहे. इतक्या लोकांना मारून तरी पण तो कसाब मोकळाच. हि कोर्टात काय जातो, गुनाह काबुल करतो आणि परत मागे फिरतो, खाण्या-पिण्या वरून नाटक काय करतो. भारत सरकारला हे काही समजत नाही का? इतक्या लोकांना मारून अजून मिजास काय करतो, काय झाले आहे भारताला, निरागस लोकांचा जीव घेऊन त्याचा परत त्याच राज्यात मन वर काढून बोलतो काय, नाटक करतो काय, हे मान्य नाही.
On 6/9/2010 11:29 AM YOgesh said:
निकम सर हे आपले काम बरोबर करता त्याचा सर्वांनाच अभिमान आहे......
On 6/9/2010 10:30 AM अतुल जोशी said:
पुन्हा पुन्हा हा खेळ कशासाठी?...एवढी दया त्याला का दाखवली जाते? गोळीबार करताना त्याने एवढा विचार केला होता का? विशेष न्यायालय तरी का स्थापन केले मग? अमेरिकेने कसे सद्दाम हुसेन ला जाहीरपणे फासावर लटकावले मग?आपलीच व्यवस्था एवढी ढिसाळ का?
On 6/9/2010 10:19 AM Aparna said:
सगळे "निकम" great च असतात... लागे राहो निकम साहेब हम तुम्हारे साथ है .........
On 6/9/2010 9:58 AM कर भरणारा said:
उज्वल निकम याना बेस्ट ऑफ लक ! पण आता हाय कोर्टात पण एक वर्ष लागणार काय? किती दुर्दैवी आहे आपली system ?
On 09/06/2010 08:28 Suunil said:
कासाबच्या बजूने सरकारने दोन वकील दिलेत.पण श्री. उज्वल निकम "सौ के बराबर एक आहेत." निकमसाहेब त्याला लवकर फासावर चढवा म्हणजे त्याच्यावर होणारा सरकारचा पर्यायाने जनतेचा पैसा वाचेल.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: