Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'पेड न्यूज'संदर्भात शुक्रवारी सुनावणी
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Wednesday, June 09, 2010 AT 12:30 AM (IST)
नवी दिल्ली - मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात "पेड न्यूज'संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीवर निवडणूक आयोग ता. 11 रोजी सुनावणी करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने चव्हाण यांना या संदर्भात नोटीस बजावली असून, सुनावणीच्या वेळी त्यांनी स्वतः अथवा त्यांच्या वकिलांनी उपस्थित राहावे, असे त्यात म्हटले आहे.

गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी "पेड न्यूज'चा प्रकार मोठ्या प्रमाणावर घडला होता. या संदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. चव्हाण यांनी निवडणुकीच्या काळात केवळ 11 हजार रुपये जाहिरातींसाठी खर्च केल्याचे दाखविले होते.
प्रतिक्रिया
On 09-06-2010 19:48:18 Chaitanya Sawale said:
सुनावणी अशीच joparyant Chavan Mukhymantri aahet toparyant chaalooch raahnaar.
On 6/9/2010 9:13 AM Nana said:
दिल्ली मध्ये कॉंग्रेस आमदाराला ३ वर्षे खुनाच्या घुण्याबद्दल शिक्ष्या झालेली बातमी का देत नाही. बीजेपी ची कशी देता असेल तर?


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: