Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पावसात कोकण रेल्वे धावणार वेगाने
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 09, 2010 AT 11:45 PM (IST)
मुंबई - कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचा वेग दर वर्षी मंदावतो; मात्र या वर्षी 30 कोटी रुपये खर्च करून रेल्वेच्या मार्गावर पावसाळी सुरक्षेच्या कडेकोट उपाययोजना करण्यात आल्याने हा मार्ग अधिक सुरक्षित झाला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे डोंगर-दऱ्या ओलांडून ताशी 90 किलोमीटर वेगाने धावणार आहे. कोकण रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांनी यंदा पावसाळ्यात गाड्यांचा वेग वाढविण्यास परवानगी दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या आजवर पावसाळ्यात ताशी 75 किलोमीटर वेगाने चालविण्याचीच परवानगी होती. दरड कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणी रॉक बोल्टिंग, बोगद्यात जाण्यासाठी पर्यायी मार्ग, संरक्षक भिंती, आपत्कालीन स्थितीत घटनास्थळावर पोचण्यासाठी रस्ते मार्ग तयार करण्यात आले आहेत.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: