Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

अकरावी, बारावी वर्गांच्या मान्यतेसाठी अर्ज मागविले
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 10, 2010 AT 12:00 AM (IST)

मुंबई - राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना जोडून अकरावी व बारावीचे वर्ग त्याच ठिकाणी सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने अर्ज मागविले आहेत. नवीन वर्गांना कायम विनाअनुदान तत्त्वावर मान्यता दिली जाणार आहे.

अकरावीसाठी कायम विनाअनुदानित तत्त्वावर आणखी वर्ग उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने इंग्रजी शाळांकडून अर्ज मागविले आहेत. संस्थेची दहावीपर्यंतची शाळा ज्या ठिकाणी सुरू आहे, त्याच ठिकाणी अकरावी-बारावीचे वर्ग सुरू करावे लागतील. संस्थेला मान्यता मिळविण्यासाठी बऱ्याच गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे. आवश्‍यक कागदपत्रांसह शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे हे अर्ज करावेत, असे अवर सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी काढलेल्या शासननिर्णयात नमूद करण्यात आले आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: