Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

गोव्यात पाशेकोंचा घरावर पोलिसांचा छापा
वृत्तसंस्था
Friday, June 11, 2010 AT 05:43 PM (IST)

मडगाव - माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्या घरावर आज (शुक्रवार) पोलिसांनी छापा टाकून संगणक जप्त केला आहे. पाशेकोंचा अटकपूर्व जामीन अर्ज कालच जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला होता.

नादिया दोरादो मृत्यूप्रकरणी मिकी मुख्य संशयित असून, महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याचा दावा पोलिसांनी संबंधित सुनावणीवेळी न्यायालयात केला होता. आणखी काही पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांनी घरावर छापा टाकून संगणक जप्त केल्याचे समजते.

दरम्यान, याप्रकरणी आवाज उठविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या बायलांचो एकवटच्या अध्यक्ष आवडा व्हिएगश यांना अज्ञाताने धमकावल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे, तर नादियाची आई सोनिया यांनीही अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली आहे.
 
Follow
Us on
Twitter


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: