जळगावात दिवसा सव्वालाखाची चोरी
सकाळ वृत्तसेवा
Sunday, June 13, 2010 AT 07:56 PM (IST)
जळगाव - शहरातील संत कंवरराम नगर पोलिस चौकीजवळ दिवसा घरफोडी होऊन रोख रक्कमेसह सव्वालाखांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना आज दुपारी घडली. जिल्हापेठ पोलिसात रात्री गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. अशोकुकमार एक राजपाल (रा.प्लॉट नंबर चार, सिंधी कॉलनी परिसर) यांच्या घराचा दरवाजाचा कडी कोयंडा अज्ञात चोरट्याने तोडून दहा हजार रोख व सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला.. ही बाब अशोककुमार यांचा मुलगा गुलशन याच्या लक्षात आली. त्यांनी याची माहिती वडिलांना दिली. अशोककुमार यांनी जिल्हापेठ पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून श्वान गौरीस बोलविले. गौरीने मंडोरे भवनापर्यंत मार्ग दाखविला.