Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

कॉंग्रेसपुढे गुडघे टेकून कबूलही केले!
सकाळ वृत्तसेवा
Sunday, June 13, 2010 AT 12:30 AM (IST)

मुंबई - ज्या कॉंग्रेसने सर्वसामान्य जनतेला हैराण केले, महाराष्ट्राची सतत पीछेहाट केली, त्याच कॉंग्रेसपुढे अखेर तुम्ही गुडघे टेकलेत आणि ते जाहीर कबूलही केले. स्वतः शेण खायचे आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा हेच तुमचे उद्योग आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सणसणीत टोला लगावला. शिवसेनेच्या नावाने बकबक करण्यापेक्षा स्वतःची लाज वाचवा, असा सल्लाही उद्धव यांनी राज यांना दिला आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत राज ठाकरे उघडे पडले आहेत, अशी टीका करीत ज्या अबू आझमींना मारण्याचे नाटक तुम्ही केलेत, त्याच आझमींच्या कळपात आपण सामील झालात. हा कळप तुम्हाला लखलाभ असो. मराठी माणसांशी गद्दारी करून कॉंग्रेसशी हातमिळवणी का केलीत, याचा जाब तुम्हाला जनतेसमोर द्यावा लागेल, असे खडे बोलही उद्धव यांनी सुनावले. यापुढे कॉंग्रेसविरोधात गळा काढण्याचे नाटक राज ठाकरे यांनी करू नये. ज्या पद्धतीने ते कॉंग्रेसच्या घोडेबाजारात सामील झाले व पुन्हा कॉंग्रेसला का विकले गेलो याचे समर्थन केले हे सारेच चित्र किळसवाणे असल्याचा हल्ला उद्धव यांनी चढवला.

एक ना एक दिवस...
मनसेच्या भूमिकेविरोधात सुज्ञ जनतेने जाहीरपणे व इंटरनेटवर राज यांची छी-थू केली आहे. तुम्ही असे का वागलात? हा प्रश्‍न शिवसेनेचा नव्हे, तर सर्वसामान्य जनतेने विचारला असून त्याचे उत्तर जनतेला देण्याऐवजी शिवसेनेने काय केले याचा पाढा वाचणाऱ्या राज यांनी जनतेच्या प्रश्‍नांना बगल दिली आहे. मनसेची "धनसे' झाली ही टीकाही जनतेनेच केली आहे. निलंबित आमदारांना पुन्हा विधानसभेत दाखल करण्यासाठी तुम्ही कॉंग्रेसशी हातमिळवणी केलीत; मात्र ज्या कॉंग्रेसने सर्वसामान्य जनतेला हैराण केले, त्यांच्यासमोरच तुम्ही गुडघे टेकलेत, अशा शब्दांत राज यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे. ज्या मराठी माणसांसाठी लढत असल्याची बतावणी तुम्ही करता त्यांच्याशी गद्दारी करून कॉंग्रेससोबत का गेलात, याचे एक ना एक दिवस जनतेला उत्तर द्यावेच लागेल, असेही उद्धव यांनी म्हटले आहे.
 
Follow
Us on
Twitter
प्रतिक्रिया
On 28/12/2011 06:58 AM Aparichit said:
राज ठाकरे हा निव्वळ रिकामटेकडा माणूस (?) आहे . अंगापेक्षा ह्याचा भोंगाच मोठा
On 04/12/2011 02:58 PM vijay patil said:
राज , अत्यंत चाणाक्ष आहेत. काळाची गरज व काळाची पावले कशी पडताहेत हे ओळखण्याची क्षमता त्यांच्यात आहे. काही निर्णय गरज म्हणून घेण्यात काही गैर नाही.
On 21/09/2011 01:15 PM vishvas patil said:
भावानो भांडत बसू नका
On 01/07/2011 05:25 PM kanchan ubhe said:
शिवसेना आणि मनसे दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. शिवसेना राष्ट्रवादी पुढे गुडघे टेकत आणि मनसे कॉंग्रेसपुढे गुडघे टेकत
On 10-06-2011 09:50 PM संजय said:
काय म्हणावे ह्याला? एकमेकांवर चिखलफेक करून स्वत: काय मिळवताहेत हे (पैश्यान्व्यातिरिक्त) आणि मराठी माणसाला काय देत आहेत माहित नाही. मराठी माणसाला वालीच नाही राहिलाय. तशी सर्व भारताचीच अवस्था तशीच झाली आहे म्हणा! देव सगळ्यांचे भले करो. एक मात्र नक्की महाराजांचे नाव घेण्याची एकाचीही लायकी नाही.
On 29/04/2011 09:34 AM amar said:
शिवराम वैद्य - तुम्ही मराठीच आहात ना ? अहो चार आमदारांना लोकांनी काय मूर्ख म्हणून निवडून दिले आहे काय ?
On 29/04/2011 08:11 AM amar said:
बंडखोर कॉंग्रेसी चंद्रशेखर (तरुण तुर्क विख्यात बिहारी) यांना पाठिंब्याला बहुमत मिळत नव्हते. तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी मध्यस्थीसाठी दिल्लीत महाराष्ट्र भवनात मुक्काम ठेवला होता. चंद्रशेखर यांना महाराष्ट्र भवनात बोलावून दोघांनी मुंबईतील शिवसेनाप्रमुखांशी दुरध्वनीद्वारे वाटाघाटी करुन शिवसेना खासदाऱांचा पाठींबा मिळवल्यावर चंद्रशेखर पंतप्रधान होऊ शकले. तेव्हांच मनोहर जोशी लोकसभेचे स्पीकर, सुरेश प्रभु केंद्रीय मंत्री होऊ शकले, हा घोडेबाजारी इतिहास शिवसेना विसरू शकत नाही.
On 4/28/2011 2:52 AM swapnil baddap said:
राज ठाकरे आमचे मत तुम्हाला राज साहेब तुमचा निर्णय योग्य आहे .
On 4/28/2011 2:52 AM swapnil baddap said:
राज ठाकरे आमचे मत तुम्हाला राज साहेब तुमचा निर्णय योग्य आहे .
On 07/04/2011 11:48 AM Atul said:
I HATE POLITICIAN AND POLITICS
On 04/03/2011 10:55 AM kapse sharad said:
raj ठाकरे kahi दिवसात आंध्र मध्ये चिरंजीवी यांनी जसा पक्ष कॉंग्रेस मध्ये विलीन केला तसे करायला मागे पुढे बघणार नाहीत
On 28/02/2011 10:12 PM amit said:
राज ठाकरेंनी सरळ कॉंग्रेस मध्ये जावे
On 10/02/2011 12:24 AM Mahendra said:
लोकहो, भारत हा रिकामटेकड्या राजकारणी, सरकारी अधिकारी यांचा देश झालेला आहे. हे लोक पैसा खाऊन आपले जीवन सुखाने जगात आहेत आणि तुम्ही मुर्खासारखे त्यांच्या मागे धावत आहात. त्यापेक्षा काहीतरी IT चा कोर्स करा आणि परदेशात जा. वयस्क असाल तर आपल्या मुलांना कोर्स द्या आणि परदेशात पाठवा. या गाढव नेत्यांचा विचार करण्यात एक मिनिट ही दवडू नका. मी हे लिहिण्यात वेळ घालवला ह्याचीही लाज वाटते.
On 09/02/2011 09:35 PM VITTHAL said:
राज तुम्ही मराठी माणसाचा विश्स्वस्घात करू नाही शिव सेने ला उत्तर द्या
On 08/01/2011 06:23 PM Gopi Bandi said:
हा करत नाही ,तो करत नाही ,अरे स्वत: तुम्ही खाडी करणार हे सांगा ,राजकीय सर्व व्यक्ती बरोबर नाहीत हे खोटे आहे,प्रत्येक पक्षात कोणी तरी चांगला असतोच त्याचे अनुकरण करा व मोते व्हा .भारताचे सत्यानाश एकमेकांवर चीकाल्फेक करून काम न करण्याच्या वृतीने केला आहे,तेव्हा राजकीय पक्षांना माहिती अधिकारात आणून स्वत पक्षाने काय काय केले हे विचारायाले हवे ,समान सर्व पक्षांनी एकत्र येऊन विरोधी पक्षावर दाभाव थकवा लागतो,विरोधक भांडतात तेव्हा सरकार चे काम बरोबर चालले आहे ते ताचेच चालेल .
On 05/12/2010 03:36 PM bhartiya nagrik said:
I DON'T LIKE SHIVSENA AND MNS
On 25/11/2010 10:52 AM Sanjay said:
संजूबाबा निरागस आहे हे बाल ठाकरे यांनी का सांगितले? त्यातलाच हा प्रकार. सर्व ठाकरे कोलांट्या उडी मारण्यात हुशार आहेत .
On 20-11-2010 04:51 PM ramraje said:
आपळ्या ला काय करायचं . राज आणि उद्धव ,कोन्ग्रेस आणि भाजप ,सेकुलर आणि कुमुनिस्त सर्वे सारखेच .मित्रानो , सगळ्या पार्ट्या समान आहेत .
On 19/11/2010 04:24 PM Anant Deshmukh,Akola said:
हे दोघे भाऊ एका घरात एका पक्षात राहू शकले नाही ते काय महाराष्ट्राचे आणि मराठी जनतेचे भला करू शकतील. इक्मेकाना दोष देण्या पेक्षा महाराष्ट्र प्रगतीपथावर कसा जाणार याचा विचार करा. शिवाजी माराजांची तुलना जनतेनी आणि ठाकरे परिवाराने करू नये.
On 18/11/2010 03:54 PM Don said:
शिवसेना आणि मनसे दोघेही एकाच माळेचे मणी आहेत.
On 16/11/2010 08:51 AM pratap said:
अरे Dr Meher घराबाहेरचे जग भाग्क आणि मग कॉमेंट कर. घरात बसून जग काळात नाही. Shivram Vaidya बरोबर आहे.
On 12/11/2010 02:09 AM Ajinkya Thakare said:
it's all about politics........... we people need entertenment only which comming from all the way
On 10-11-2010 03:17 ?.??. Priyamwada V said:
My friend's father write this for both the parties :) Kase lok na...lihita pan yet nahi nit... jara ghara baher yeun zopadiit raha.. nangar chalava .. ek divas nahi tar nehamich. BAba Amte hyanche karya bagha. Ani mag bagha tumhi kaay karata. Shivaji maharajanbaddal tumhi lihile te barobar ahe. 100/100 mark history subject madhe. Khush ?
On 10/11/2010 02:15 AM dhundiraj gawade said:
अरे उद्धवा फोटो काढत बस ना गपचूप ....
On 09/11/2010 10:03 AM vivek said:
दुसरा कुठलाच कार्यकर्ता लायकीचा नवता का.या नंतर कृपया घराणेशाही बद्दल तुम्ही तरी बोलू नका.
On 05/11/2010 05:52 PM ENGR.DR.VIJAYKUMAR D WANI ATLANTA U.S said:
राज ठाकरे व उद्धव ठाकरे एक खोलीत जाऊन एक मेकांना जोड्याने मारा? जनतेने तुमचे नाटके चांगली अनुभवली आहेत. जनतेची मानसिक स्थिती ची परीक्ष्या पाहू नका.जी हिंद जय मेरा भारत महान.
On 31/10/2010 08:23 AM Vilas Shinde said:
राजकारणामध्ये सर्वसामान्य लोकांचा बळी जात आहे कृपाकरून राजकारण कमी करा आणि लोकांच्या हिताचे बघा हि विनंती
On 29/10/2010 04:05 AM ganesh bhor said:
महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला जागा करण्याचा काम राज ठाकरेने केला आहे.राज ठाकरे जिंदाबाद.
On 29/10/2010 01:40 AM OMKAR said:
jar SHIVSENECHA karyadhuska raj yana kele aste tar ata vidhansabhevar bhagava asta ajun vel geleli nahi raj ani udhav yani ektra yave raj saheb karatat te barobar ahe sarv matadarani MNS la mat dya hi vinanti karto ......jai maharashtra jai mns
On 24/10/2010 04:24 PM sandip sonwane said:
राज ठाकरे हे स्वार्थी आहेत
On 24/10/2010 01:23 PM Pralhad said:
उद्धव, आता तेजस आणि रश्मीचे राजकीय लौन्चींग कधी करणार ते सांगा.
On 24/10/2010 11:16 AM jangam Bhau said:
राज ने शिव्शेनेत असताना बरेच काही करण्या सारखे होते तर त्या वेळेश का नाहे केले शिवसेनेला दोष देण्याचा राज ला काही अधिकार नाही साहेबांच उत्तर अधिकारी अपोआप झाला असता अवधी घाई करण्याची गरज न्हवती साहेबांच्या अडून अजून फार शिकण्य सारखे होते - उद्धव हे फार हुशार आहे दोघांचे का जमत नाही हे साहेबांनी पहिले असते सेवती साहेबांचे सर दोघानाही येणार नाहे हे लक्षात ठेवा
On 10/18/2010 6:00 AM B.K.Ahire said:
ठाकरे बंधू चा वाद म्हणजे एकमेकांना संपविण्याचा प्रयत्न .शिवसेनेत आज ही आमच्या सारखे लोक जे टिकून आहेत ते आमचे आमदार कर्यक्षम आहेत म्हणून..हे असेच चालू राहिले तर आघाडी सरकार शिवाय पर्याय नाही.
On 01/10/2010 01:38 AM Aditi said:
Raj Thakrehi etar politicians sarkhach aahe, tyachykadun kahi changale honyachi apeksha karu naye. Gharatlyviruddh bhandan karane he tar marathi mansache main kam asate, Raj ne kahi vegale kele nahi.
On 9/14/2010 4:09 PM RUPAM said:
राज ठाकरे झिंदाबाद जय महाराष्ट्र
On 8/24/2010 9:05 PM Amit said:
कोहिनूर मिल ची जागा किती madhe vikli? त्यातला Kiti paisa jantechya कामा साठी वापरला? Evdha paisa ala kothun? IPL jhale, CWG jhale? Apan sagle jan he sagla visarloch na? Aaj Raj साहेबांनी स्वत्चाता मोहीम घेतली, ती आधी का नाही चालू केली? निवडणूक आली कि आठवला का?
On 8/20/2010 4:27 AM arun said:
अरेरे राज ! येवढा कसा निर्लज्ज आहेस रे ! त्या पेक्षा सरळ कॉंग्रेस मध्ये का जात नाहीस ?
On 09-08-2010 18:38:40 santosh suresh sawant said:
राज ठाकरे यांचे बरोबर आहे शिवशेनेने राज यांना अधक्ष केले असते तर आज महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता असती अजून वेळ गेलेली नाही राज यांना पाठींबा द्या जगाच्या नकाशात महाराष्ट्र दिसायचा असेल तर मनसे (राज) ची सत्ता यायलाच पाहिजे यासाठी माझ्या बंधू -बघिनिणु फक्त मनसे ला पाठींबा द्या .................. जय महाराष्ट्र
On 8/6/2010 9:27 AM EK PUNEKAR said:
राज साहेबांच्या या निर्णयावर आम्ही बरोबर आहोत जय महाराष्ट्र
On 7/31/2010 11:36 AM sunil said:
जय राज ठाकरे
On 7/29/2010 5:11 PM shrinath kaoile said:
jay maharashtra
On 7/23/2010 4:06 PM mote patil said:
राज साहेबांनी जो निर्णय घेतला त्याला आमचा पूर्ण पाठिबा आहे
On 7/19/2010 5:02 AM vikas said:
ek hi hira hai jo sab ko mar k ji raha hai RAJ THAKRE
On 7/13/2010 10:16 AM vikrant said:
konachya khandyavar konache oze
On 7/9/2010 2:19 PM chandrakant said:
हि शिव सेनेची वैचारिक दिवाळखोरी आहे राज पक्षात असताना त्यांची कदर नैत केली मग आता कशाला शिमगा करताय त्यंच्या नावाने. जन्मभर दुसर्यावर आरोप केलेत घराणेशहीचे आणि स्वत काय केला ते पहा जरा.
On 7/8/2010 7:18 PM Pratap Nalawade said:
बंडखोर कॉंग्रेसी चंद्रशेखर (तरुण तुर्क विख्यात बिहारी) यांना पाठिंब्याला बहुमत मिळत नव्हते. तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी मध्यस्थीसाठी दिल्लीत महाराष्ट्र भवनात मुक्काम ठेवला होता. चंद्रशेखर यांना महाराष्ट्र भवनात बोलावून दोघांनी मुंबईतील शिवसेनाप्रमुखांशी दुरध्वनीद्वारे वाटाघाटी करुन शिवसेना खासदाऱांचा पाठींबा मिळवल्यावर चंद्रशेखर पंतप्रधान होऊ शकले. तेव्हांच मनोहर जोशी लोकसभेचे स्पीकर, सुरेश प्रभु केंद्रीय मंत्री होऊ शकले, हा घोडेबाजारी इतिहास शिवसेना विसरू शकत नाही.
On 7/7/2010 12:43 PM Mohan Kamthe said:
अरेरे काय हे मराठी माणसांचे दुर्दैव? छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळापासून खरे युद्ध मराठा विरुद्ध मराठा असेच चाललेले आहे आणि तेच तुम्ही पुढे चालवत आहात. जरा विचार करा आणि एक व्हा मग कोणाची हिम्मत आहे तुम्हाला टक्कर देण्याची.
On 05/07/2010 02:35 doke mahendra said:
this is a only politik issue right now
On 6/27/2010 11:28 AM sameer desai said:
भारता मध्ये कुठलाही राजकीय पक्षाला जनतेशी घेणे देणे नाही ,या सगळ्यांचा एकच नेम असतो कि गडगंज पैसा कमवायचा ,आणि जनतेला वेढे बनवायचे.यांचाकडे अब्जोवधी रुपये आहेत.यांना कुठल्याही जाती धर्माशी काही घेणे देणे नाही ,यांचा धर्म फक्त पैसा आहे .व यांचे काम फक्त हिंदू मुस्लीम मध्ये भानगडी लावणे आणि स्वतःघरात बसून टीवी वर मझा पाहणे,आज भारता मध्ये गरीब हा आणखी गरीब होत चालला आहे आणि अमीर हा आणखी अमीर होत चालला आहे .
On 6/15/2010 8:14 AM shyam said:
राज ने जो निर्णय घेतला तो योग्यच आहे. हा शेवटी त्याच्या पक्षाचा निर्णय आहे. मराठी माणसाच्या बाबतीत आता जी चांगली परिस्थिती निर्माण होतेय त्याला कारण मनसे आहे शिवसेना नव्हे. मराठी माणसाला आता पर्यंत भावनेच्या राजकारणाच्या बळीचा बकरा करण्यात शिवसेनेचा मोटा वाट आहे. कारण मराठी माणसाने स्वताचा विकास करण्याची स्वप्ने मनसेने दाखवली. राज इस एक चांगला निर्णय घेणारा नेता आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.
On 6/14/2010 6:34 PM vir said:
dhansena,lavkar sampushtat yenyachya margavar ahe. swarthi dhanajirao
On 6/14/2010 1:37 PM Mohan said:
शिवाजी महाराजांचे दाखले कृपा करून देऊ नयेत,त्यांनी अनेक राजकीय तडजोडी केल्या,पण गाभा कधीच हरवू दिला नाही.स्वताच्या फायद्यासाठी जनतेला वाऱ्यावर कधीच सोडले नाही.उलट जनतेला परकियांच्या तावडीतून सोडवण्यासाठी स्वताच्या जीवावर उदार होऊन अनेक राजकीय खेळी केल्या(पन्हाळगड,लाल महल,आग्रा भेट,अफजलखान वध,असे अनेक अमर्यादित धाडसी प्रसंग);इथे उलटेच आहे!जनतेचा विश्वास सम्पादन करून ऐनवेळी साथ सोडली.राज यांची भूमिका दुसर्यांना पटवून देण्यासाठी जीवाचा आटापिटा करतोय आम्ही,आणि आज यांनी असे कृत्य करून गोची केली आमची
On 6/13/2010 4:01 PM pallavi jadhav said:
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंनी जे मुद्दे उपस्थित केले आहे त्याचा पहिले खुलासा करावा व सर्व सामान्य मराठी जनतेला मूर्ख समजू नये व आपण राजकारणातून निवृत्ती घ्यावी हि आपणास कळकळीची विनंती
On 6/13/2010 3:05 PM MARATHI MAHARASTRA said:
आधी परप्रांतीय महाराष्ट्रातून कमी करा नंतर काय घोळ करायचा तो करा. हि राजकारण खेळायची वेळ नाही. भानावर या मराठीचा, महाराष्ट्राचा विचार करा जो फक्त मराठी आणि फक्त मराठीचाच विचार करेल त्याच्या पाठीशी सर्व महाराष्ट्र आहे.
On 6/13/2010 2:23 PM Antu Barva said:
दोघे भाऊ जी चीखाल्फाके परस्परांवर करतात ते बघून वाटते महाराष्ट्राला कॉंग्रेस शिव्या दुसरा कोणी वाली नाही. शिवसेना आणि मनसे एकमेकांचे पाय ओढण्य्त कधी सरकार बनवू शकणार नाही आणि मराठी माणसाला नाय्य्या कधी मिळणार नाही कायम मराठी माणसाला गाजराची पुंगी धाखावली जाते.. आणखी ५ वर्षानंतर कोणता पक्ष राहील ते सागता येत नाही.
On 6/13/2010 1:44 PM सागर कुलकर्णी said:
डावखरेंच्या विरोधातील उमेदवार मागे घेऊन मदत करण्यासाठी किती थैल्यांचा व्यवहार केला? असा सवाल राज ठाकरेने केलाय. डावखरेंनी मातोश्रीवर बाळासाहेबांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. बाळासाहेबांवर त्यांच्या उभ्या आयुष्यात पैसे घेतल्याचा आरोप आजपर्यंत कोणी केला नाही. पण बाळासाहेबांमुळेच ज्याची ओळख महाराष्ट्राला झाली त्या राजनीच हा आरोप केलाय. एकेकाळी बाळासाहेबांना दैवत मानणारा राज ठाकरे आज विदेशी काँग्रेसला मतदान करतोय. यातून राज ठाकरेचा राजकीय अस्तच जवळ आल्याचे दिसते. मराठी जनताच राजला योग्य तो धडा शिकवेल.
On 6/13/2010 1:11 PM mukund shejwal said:
राज साहेबांनी जो निर्णय घेतला त्याला आमचा पूर्ण पाठिबा आहे उद्धव यांनी राजकारणातून निवृत्ती घेऊन फोटोग्राफी ह्या विषयात एखादी संस्था काढावी व सामंना हा पेपर बंद करावा कारण तो आत्ता शिवसैनिक पण वाचत नाही
On 6/13/2010 1:03 PM sudhakar said:
शिवसेनेल समर्थन द्यावे अशी उद्धाव्ची इच्छा होती का ? मणसे हा राष्ट्रावादिसारखा पक्ष नाहीये वेगळा पक्ष काढायचा आणि जुन्या पक्षाला समर्थन द्यायचे,शिवसेनेनेसुधा राष्ट्रवादीशी pune महानगरपालिकेत समझोता केला होता ना ते विसरून गेले का हे हे लोक.
On 6/13/2010 12:49 PM सचिन पाटील said:
विधान परीषद निवडणूकीत आपल्या ४ आमदारांचे निलंबन रद्द व्हावे,यासाठी राज ठाकरेनी कोंग्रेस-राष्ट्रवादी सोबत जो आर्थिक घोडेबाजार केला,तो बघून मनसेला साथ देणारया माझ्या सारख्याच असंख्य मराठी युवा वर्गाची मान आज शरमेने खाली झुकली आहे.माझ्या आई-वडीलांसमोर मला आता मान ताठ करून बोलायला लाज वाटत आहे.इतक्या खालच्या पातळीवरचे गैरधंदे च जर तुम्हाला करायचे होते,तर शिवसेनेतून फुटून मनसेची स्थापना तरी कशाला केली...? ते न करता सरळ कोंग्रेस किंवा राष्ट्र्वादीत सरळ सामील व्हायचे होते ना.....?
On 6/13/2010 12:42 PM Mumbaikar said:
माझ्या माहिती प्रमाणे, शिवसेनेने श्री सतीश प्रधान सोडता, कोणाही कट्टर शिव-सैनिकाला राज्यसभेचे टीकेत दिले न्हवते , ते जर राजकारण असेल, सोय असेल तर ही पण सोय आहे. टीप: संजय रूट हे शिव-सैनिक नाहीत... ते सामना मुले खासदार झाले.
On 6/13/2010 12:13 PM sopan said:
राज ठाकरे चा बरोबर आहे त्यानी तो त्या चार आमदारांसाठी घेतलेला निर्णय आहे.
On 6/13/2010 12:11 PM sturdy linux said:
मनसे आमदारांचे निलंबन रद्द झाल्यावर तरी ते काय तीर मारणार कोणास ठाऊक ??? हे आमदार निलंबित झाली तेही स्वताच्या मुर्खपणामुळे . विधानसभेत कुस्ती केल्यावर ह्यांना काय हारतुरे मिळणार होते का ? रेम्याडोक्यांना निवडून दिल्यावर असेच होणार .
On 13/06/2010 11:57 kulkarni said:
लोकहो... तुम्ही सरकार पिक्चर पहिला आहे का? त्यात सरकार ला अटक केल्यावर अभिषेक ची जी अवस्था होते ना तीच ह्या utddav ची होणार आहे. आज हा वडिलांच्या जीवावर भुंकतो आहे पण बाळासाहेबांच्या नंतर साला मांजर पण ह्याच्या उरावर बसेल.
On 13/06/2010 11:51 abhijit said:
मला नाही वाटत पत्र उद्धव ने लिहिला असेल नक्कीच कोणा कडून तरी छापून घेतलाय
On 13/06/2010 11:47 kulkarni said:
उद्धव ठाकरे जे काय बोलले आहेत ते एकदम बरोबर आहे. मला शिवसेनेशी काही देणेघेणे नाही पण राज साहेबांनी खूप मोठी चूक केली आहे आणि ती त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये नक्कीच भोगावी लागेल.
On 6/13/2010 11:38 AM वसंतसेना said:
पूर्वी शिवसेनेला, वसंतसेना (वसंतदादा पाटील) म्हणून संबोधले जायचे. आज तीच वसंतसेना मनसे च्या नावाने खडे फोडत आहे.
On 13/06/2010 10:42 Ganesh said:
बरोबर आहे कधीतरी कुठेतरी तह करावाच लागतो महाराजांनीसुद्धा तह केला होता अरे त्या मतदार संघातील लोकांचा विचार करा केवढ्या विश्वासाने त्यांनी या लोकाना निवडून दिले त्यांची कामे मार्गी लागुद्यात त्यासाठीच राजनी समझोता केला यात चुकीचे काय आहे? शिवराम वैद्य यांचे आजचे विचार पटले नाहीत
On 6/13/2010 10:32 AM मनसे said:
मराठी माणसांशी गद्दारी करून कॉंग्रेसशी हातमिळवणी का केलीत?? काँग्रेसवाले मराठी नाहीत का? आणि १३ आमदार मनसे चे आहेत, त्यांनी कोणाला मतदान करायचे ते राज ठरवतील. मनसे ने कोणाला पाठींबा द्यायचा हा ठरवायचं अधिकार उद्धव ठाकरे ना कोणी दिला ? आत्ता कॉंग्रेस च्या नावाने ओरडणाऱ्या शिवसेनेला कॉंग्रेस नेच जन्म दिला आहे. शिवसेना हे कॉंग्रेस चे पिल्लू होते, आणि त्या बदल्यात आणीबाणी मध्ये शिवसेने ने कॉंग्रेस ला पाठींबा दिला होता हे पण उघड सत्य आहे.
On 6/13/2010 10:29 AM VShriniwas said:
राजकीय व्यवहारात तडजोडी ह्या नित्य नियामाच्याच, खुद्द शिवाजी महाराजांनी सुद्धा तडजोड म्हणजे तह केलेले आहेत. आणि अखेर शिवसेनेचा जन्म सुद्धा कॉंग्रेस च्या पाठींब्या वरच झालेला आहे. आणि तो फक्त मुंबई वर वर्चस्व गाज्विण्यासाठीच, पूर्ण महाराष्ट्रावर न्हवे. अख्खा महाराष्ट्र ओळखते शिवसेनेत किती गुंड भरलेले आहेत. हेही तितकेच खरे कि सर्वच पक्षात गुंड आहेत. आजच राष्ट्रवादीचा नगरसेवकाने सुपारी घेतल्याची बातमी आहे.
On 6/13/2010 10:26 AM sagar said:
मनसे बदलली .. हो माझे समर्थन होते मनसेला कारण त्याचा मोडेन पण वाकणार नाही हा बाणा बघून .... पण आता नाही
On 6/13/2010 10:22 AM सचिन-दुबई said:
मराठी माणसांशी गद्दारी करून कॉंग्रेसशी हातमिळवणी का केलीत?? काँग्रेसवाले मराठी नाहीत का? आणि १३ आमदार मनसे चे आहेत, त्यांनी कोणाला मतदान करायचे ते राज ठरवतील. मनसे ने कोणाला पाठींबा द्यायचा हा ठरवायचं अधिकार उद्धव ठाकरे ना कोणी दिला ? आत्ता कॉंग्रेस च्या नावाने ओरडणाऱ्या शिवसेनेला कॉंग्रेस नेच जन्म दिला आहे. शिवसेना हे कॉंग्रेस चे पिल्लू होते, आणि त्या बदल्यात आणीबाणी मध्ये शिवसेने ने कॉंग्रेस ला पाठींबा दिला होता हे पण उघड सत्य आहे.
On 6/13/2010 9:06 AM अजित said:
जे काही राज साहेबांनी केले ते बरोबर आहे जन्रेच्या हिता साठी जर अस करायचं असेल तर काही चुकीचे नाही. नाहीतरी उद्धव साहेब काय करतायत दुसर्यावर टीका करण्यापेक्षा आपल्यात झाकून बघा तुमच्या पक्षात काय दोष आहे ते पहिले राज साहेबांवर टीका करणे सोडा ते जे काही करतील हे बरोबरच असेल जय महाराष्ट्र.
On 6/13/2010 9:05 AM jaan..... said:
ये राज आणि उद्धव तुमी नुसता मारामारी करत बसा आणि कॉंग्रेस आपल काम करत असतो जो पक्ष दुसर्यांना बोट दाक्वतो दुसर्यांना वाईट मनत असतो ना. तो त्या गोष्टी त्याचा मध्ये पण असतात. पण बागा कॉंग्रेस केंवाही कोणाला वाईट मनत नाही ते हाती सारखे चालत राहतात आणि कुत्रे भूकणारे भुकत असतात .......
On 6/13/2010 7:23 AM Shrinivas said:
अजिबात नाही. मला ह्यात काहीच स्वार्थ वाटत नाही. राजसाहेब जे काही करतील ते योग्यच करतील. मराठी माणसाबद्दल फक्त राजसाहेब हाच एक उत्तम पर्याय आहेत. ४ आमदारांचे निलंबन रद्द झाले कि मग बघा मनसे ची आक्रमकता. १३ पैकी ९ आमदारांनी विधान सभा जनहितासाठी डोक्यावर घेतली. त्यात जर वसंतभाऊ गीते, रमेश वांजळे, शिशिर शिंदे आणि राम कदमांची भर पडली तर बघा कामे कशी मार्गी लागतात ते. राज साहेबांवर नाशिककरांचा आजही विश्वास आहे. अतूट आणि अबाधित.
On 6/13/2010 7:05 AM Pankaj said:
उद्धवा अजब तुझे.. तुम्ही इतर वेळी शेण खाता ते चालता, राज नि जे प्रश्न तुम्हाला विचारले आहेत त्याची तुम्ही उत्तर द्या असे प्रेस रेलेअसे देऊ नका. मिडिया समोर यायला तुम्ही अजून का घाबरत आहात?राज नि जे कबूल केला ते obvious होत.शिवसेना ची मत फुटली आहेत तू कशी फुटली ह्याचा विचार करा, हे म्हणजे लागला आहे डोक्याला आणि उपचार चालू आहेत गुढग्याला.उद्धव अजून नित विचार कर रे बाबा.आत्मपरीक्षण करा अजून,तुम्ही कमी पडला आहात election मध्ये, सगळी कडे राडा संस्कृती चालत नाही,काही वेळा डोकं पण वापरावा.
On 6/13/2010 6:24 AM समीक्षक said:
शिवराम वैद्य...ह्या वेळेस तुमचे विचार पटले नाहीत...कारण राजकारण हा सौदाच आहे...दिल्ली पासून गल्ली पर्यंत, आज काल कोणीही समाज सेवा करण्या साठी राजकारण करीत नाही...आणि ४ पाऊले पुढे जाण्या साठी दोन पाऊले मागे आले तर काय हरकत आहे... राज ठाकरेंना अटक करू म्हणणाऱ्या कॉंग्रेसला support मागायला लाज वाटली नाही तर मग म न से support द्यायला लाज का वाटावी? मला तर वाटते ह्या support मूळे काँग्रेसने शरमेनी मन खाली घातली पाहिजे. मला हे कळत नाही कि सगळे नियम म न से लाच का?
On 6/13/2010 6:22 AM ams said:
तुम्ही स्वताचे घर सावरू शत नाही भावाशीच दुशामानी तुम्ही काय महाराष्ट्र एकवटनार खरच तुमच्या सारख्या नेत्यांमुळे हे कॉंग्रेस वाले बाजी मारताहेत जरा आक्कल असेल तर ती दाखवा
On 13/06/2010 03:22 dangle d.m. Pune said:
राज ठाकरे लबाड कोल्हा आहे
On 6/13/2010 3:03 AM RP said:
शिवेसेनेचा १ आमदार निवडून आणायचा कि स्वताचे ४ आमदार वाचव्यचे? अबू आझमी च्या मुला विरुद्ध जर मनसे ने उमेदवार दिला असता तर शिव सेनेचा उमेदवार निवूडून आला असता का? शिवसेनेचे नेव्मिचे झाले आहे...स्वताचे अपयश लपवण्यासाठी मनसे च्या नवे बोमाबोम करायची .
On 13-06-2010 02:18:53 deepak said:
राज ने आता घरी बसून..बांधकाम व्यवसाय बघावा... राजकारण सोडून द्यावे..
On 6/13/2010 2:08 AM Raghvendra said:
राज ठाकरे च्या एका हि प्रश्नाचे उद्धव ठाकरेंनी ने उत्तर दिले नाही... हे पत्र हि बालासाहेबान कडून लिहून घेतले आहे दिसते ..
On 6/13/2010 1:40 AM Dr Meher said:
हे सर्व जाणून बुजून सुरु आहे.राजला बदनाम करण्यासाठी.हे सर्व शिवसेनेची (किवसेना) मूर्ख लोक आहेत .अकलेचा भाग यांच्या डोक्यात नाही.
On 6/13/2010 1:25 AM aantarnaad said:
राज ठाकरे यांनी व्यवहार केला हे म्हणणं ठीक आहे, म्हणून त्यांना टाकून बोलायची आवश्यकता नाही. शेवटी मराठी माणसाला पूर्णपणे शिवसेनेसकट सगळेच पक्ष गृहीत धरून चालले होते. मराठी माणसाचा स्वाभिमान राज ठाकरे यांनीच चेतवला यात काही वाद नाही!! आणि हेच ते गेली जवळपास वीस वर्ष करत आले आहेत. कानामागून आलेल्यांनी आणि त्यांच्या पुरस्कर्त्यांनी जीभ रेटण्या ऐवजी स्वतःचे अवलोकन करणेच इष्ट.
On 6/13/2010 1:04 AM amit said:
अगदी बरोबर आहे उद्धवसाहेब! जनतेच्या प्रश्नांना बगल देऊन शिवसेनेवर टीका करणे हि यांची सवयच आहे.
On 6/13/2010 12:44 AM SHIVRAM VAIDYA said:
राज ठाकरे यांनी हा निर्र्णय फक्त आणि फक्त स्वार्थासाठीच घेतलेला आहे. त्याना मराठी माणसा शीच नव्हे तर कशाशीच काहीही देणे घेणे नाही. वैयक्तिक महत्वाकांक्षेला त्यांनी वाजवीपेक्षा जास्त महत्व दिले. चार आमदारांचे निलंबन रद्द व्हावे यासाठीच त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर सरळ सरळ सौदा केलेला आहे. त्यात ना काही तत्व आहे, ना काही निष्ठा, ना काही स्वाभिमान आहे, ना काही लज्जा. हा फक्त व्यवहार आहे. राज ठाकरे यांचा निषेध करावा असे वाटत नाही पण त्यांनीच ती वेळ आणली आहे जनतेवर.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: