Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

जयहिंद, एसएसव्हीपीएस, आर. सी. पटेलला यश
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 15, 2010 AT 12:15 AM (IST)

धुळे - राज्याच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे वैद्यकीय व अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्व परीक्षेत (एमएचटीसीईटी) शिरपूर येथील दि शिरपूर एज्युकेशन संस्थेच्या आर. सी. पटेल कनिष्ठ महाविद्यालयातील जगदीश किताराम पावरा (179 गुण) हा राज्यात अनुसूचित जमाती संवर्गात द्वितीय, तर विभागात प्रथम आला. धुळे शहरातील "एसएसव्हीपीएस' संस्थेच्या डॉ. पा. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयातील रजत सुनील पसारी हा "पीसीएम' ग्रुपमध्ये 200 पैकी 190 गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम आला. एमएचटीसीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला.

रजतचा सत्कार
'एसएसव्हीपीएस' संस्थेच्या डॉ. पा. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयात जिल्ह्यात प्रथम आलेल्या बारावीच्या रजत सुनील पसारीचा प्राचार्य डॉ. एस. एन. नंदन यांच्या हस्ते सत्कार झाला. संस्थाचालक डॉ. भाईदास पाटील, कुणाल पाटील, सुभाष देवरे, उत्कर्ष रवंदळे, डॉ. एस. टी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एम. डी. पाटील, प्रा. सी. जे. सनेर आदींनी रजतच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. रजत हा शहरातील प्रसिद्ध गजानन मेडिकलचे संचालक सुनील पसारी यांचा मुलगा आहे.

जयहिंदची परंपरा कायम
जयहिंद शैक्षणिक संस्थेच्या ऍड. झेड. बी. पाटील महाविद्यालयातील 37 आणि जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील 113, अशा एकूण 150 विद्यार्थ्यांनी यश मिळविले. जयहिंद शैक्षणिक संस्थेच्या "जयहिंद पॅटर्न'मुळे हे यश लाभल्याची प्रतिक्रिया यशस्वी विद्यार्थ्यांनी दिली. त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण साळुंखे, उपाध्यक्ष अजित मोरे, संचालक तथा "उमवि'चे माजी कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे, प्राचार्य डॉ. पी. एच. पवार, प्राचार्य डी. एम. सोनवणे, उपप्राचार्य एम. एन. पाटील आदींच्या उपस्थितीत झाला. उपप्राचार्य, प्राध्यापकांसह यशस्वी विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते. जयहिंद संस्थेने या परीक्षेत यशाची परंपरा कायम राखली असून गरीब विद्यार्थ्यांना बांधिलकीतून मोफत सुविधा दिल्याने, जयहिंद पॅटर्नला यश मिळाल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया संस्थाचालकांनी दिली. उपस्थित मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. यावेळी मान्यवर व यशस्वी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. जयहिंद कनिष्ठ महाविद्यालयातील 90 विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेसाठी तर 43 विद्यार्थी वैद्यकीय शाखेसाठी पात्र ठरले. अभियांत्रिकी शाखेसाठी शंभर पेक्षा जास्त गुण मिळविणारे 72 विद्यार्थी, तर वैद्यकीयसाठी 32 विद्यार्थी आहेत.

शिरपूरची यशाकडे धाव
शिरपूर - दि शिरपूर एज्युकेशन संस्थेने उज्ज्वल यशाची परंपरा अबाधित राखली. संस्थेचे एकूण 47 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. संस्थेच्या येथील आर. सी. पटेल कनिष्ठ महाविद्यालयातील अक्षय अग्रवाल "पीसीएम' ग्रुपमध्ये 189 गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम, तर अनुसूचित जमाती संवर्गात याच महाविद्यालयातील जगदीश किताराम पावरा (179) राज्यात द्वितीय, तर विभागात प्रथम आला. आर. सी. पटेल कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण 29 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले.
शिरपूर एज्युकेशन संस्थेने एमएचटीसीईटी परीक्षेसाठी तीन वर्षांपासून विशेष मार्गदर्शन वर्ग सुरू केले. त्यातून विद्यार्थ्यांना चांगले अध्यापन मिळाले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून पाचशेवर प्रश्‍नसंच सोडवून घेतले. त्यामुळेच संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले, असे संस्थेचे कार्याध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी सांगितले.

गुणवंतांचा सत्कार
शिरपूर एज्युकेशन संस्थेच्याच येथील एच. आर. पटेल कन्या कनिष्ठ महाविद्यालयातील 18 विद्यार्थिनींनी सीईटी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविले. त्यांना प्राचार्या एम. एस. अग्रवाल, पर्यवेक्षक के. आर. जोशी, प्रा. ए. ए. पाटील, प्रा. मनीषा पटेल, प्रा. झेड. आर. मन्सुरी, प्रा. एल. आर. पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले. परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसह त्यांचे मार्गदर्शक, प्राचार्य व शिक्षकांचा विशेष सत्कार आज सकाळी संस्थेच्या प्रांगणात कार्याध्यक्ष राजगोपाल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवृत्त नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक एस. एन. पाटील, प्राचार्य पी. व्ही. पाटील, प्राचार्या एम. एस. अग्रवाल यांच्या हस्ते झाला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, संचालक ऍड. सी. बी. अग्रवाल, योगेश भंडारी, प्रभाकर चव्हाण, श्रेणिक जैन, प्रसन्न जैन, गणेश पोतदार यांनी समाधान व्यक्‍त केले. प्राचार्य पी. व्ही. पाटील, पर्यवेक्षक एच. आर. पाटील, प्रा. आर. आर. पाटील, प्रा. एम. पी. माहेश्‍वरी, प्रा. एन. बी. पाटील, प्रा. एम. बी. गोड, प्रा. आर. पी. पाटील, प्रा. डी. एस. पाटील, प्रा. आर. बी. बागूल, प्रा. आर. बी. सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.

परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी
एमएचटीसीईटी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी (कंसात गुण) असे -
शिरपूर - आकाश दीपक गुजराथी (167), कौशल सुहास जैन (152), विष्णू प्रकाश नंदराळे (152), तुषार राजेश गुजराथी (138), प्रणव किशोर बाविस्कर (151), चेतन राजेंद्र जाधव (146), ऋषिकेश भटूसा सूर्यवंशी (139), सर्वेश शरद अग्रवाल (138), वैशाली भीमराव वाडिले (131), कमल राधेश्‍याम मिहानी (128), हितेश दिलीप सोनवणे (124), जयेश सुभाष मोरे (122), सृष्टी चंद्रकांत कुलकर्णी (119), विवेक धरमचंद जैन (117), महेश ज्ञानेश्‍वर माळी (116), मनीष गुलाबराव ठाकरे (116), हर्षदा संजय बागूल (115), पुष्पा जगदीश पहलानी, प्रशांत साहेबराव महाजन (111), तुषार अनंतराव पाटील (111), पलक राजेंद्र अग्रवाल (111), कैलास अशोक पाटील (109), पूजा भरत गुजराथी (106), निखिल रंजन भावसार (102), अंकित द्वारकाप्रसाद अग्रवाल (101), सचिन सुभाष ईशी (101), स्वराज दत्तू बागूल (100), करिष्मा सुनील पाटील (139), नेहा दत्तात्रय पाटील (143), देवयानी ज्ञानेश्‍वरी निंबाळकर (138), अपर्णा मधुकर देवरे (135), वैष्णवी नरहरी साका (131), कविता सनेर (131).

जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, धुळे - अभियांत्रिकी शाखेत रोहणसिंग महेंद्रसिंग गिरासे (184) विद्यालयात प्रथम, तर विमल अशोककुमार वटवाणी (179) द्वितीय. वैद्यकीय शाखेसाठी सना सय्यद (167) प्रथम तर झुबेर युनूस खान (165) द्वितीय.

ऍड. झेड. बी. पाटील महाविद्यालय, धुळे - शंतनू नवगाळे (पीसीबी 192, पीसीएम 163), सागर पाटील (189), स्वप्नील जैन (189), वैभव चौधरी (185), अथर्व बोरकर (184), अजित माळी (182), निखिल शिंदे (182), स्वप्नील संकलेचा (179), रोहन उर्ध्वरेशे (179), धनंजय पाटील (179), अश्‍विनी बोरसे (178), सागर चव्हाण (178), जागृती खिंवसरा (176), नेहा पिंजारी (176), सुदीप जैन (176), संकेत चोरडिया (175), शुभम पाटील (173), गौरव शिंदे (173), प्रणव शाह (173), दीपक पवार (172), तेजस राजपूत (171), लोकेश सोलंकी (170), जयश्री महाजन (170), भाग्यश्री राठोड (168, व्हीजेएनटी रॅंक 4), आराधना शाह (168), कल्याणी सूर्यवंशी (168), पूजा विंचूरकर (168), सुरेश सोंजे (167), संदेश बाविस्कर (166), तुषार सचदेव (156), गुंजन अहिरराव (163), यशश्री देसले (162), चैताली पाटील (161), अमित पाटील (171), वंदना शर्मा (161), सौरभ शाह (160), यशराज मोरे (160).


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: