Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

साईनाचे दुसरे सुपर सिरीज विजेतेपद
वृत्तसंस्था
Sunday, June 20, 2010 AT 11:55 AM (IST)

सिंगापूर - भारताची अव्वल खेळाडू साईना नेहवालने सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावून पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या वीस वर्षांच्या या खेळाडूने दुसऱ्यांदा "सुपर सिरीज' स्पर्धा जिंकली आहे. तिने रविवारी ही कामगिरी करताना अंतिम सामन्यात तैवानच्या झु यिंग हिच्यावर 21-18, 21-15 असा सरळ विजय नोंदविला.

या स्पर्धेत प्रथम मानांकन असलेल्या साईनाने अवघ्या 33 मिनिटांत विजय मिळविला. सिंगापूर इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात साईनाने निर्धारपूर्वक खेळ करताना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. तिचे हे दुसरे "सुपर सिरीज' विजेतेपद आहे. गेल्या वर्षी जूनमध्येच तिने इंडोनेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. या वेळी इतर सर्व भारतीय खेळाडूंचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आल्यानंतर सर्वांचे लक्ष साईनाकडे होते.
या यशामुळे आनंदित झालेली साईना म्हणाली, ""माझ्या मार्गात चीनच्या दोन सर्वोत्कृष्ट खेळाडू असल्याने अंतिम फेरीपर्यंत मजल जाईल, असे मला वाटले नव्हते; परंतु मी आत्मविश्‍वासपूर्वक खेळ केला आणि हे यश मिळविले.'' साईनाने गेल्याच आठवड्यात भारतीय ग्रांप्री स्पर्धा जिंकली होती. ""भारतीय ग्रांप्री स्पर्धेतील विजेतेपदामुळे माझा आत्मविश्‍वास वाढला. त्यामुळे मी अधिक चांगला खेळ करू शकले,'' असेही ती म्हणाली.

आजच्या अंतिम सामन्याची सुरवात चुरशीची झाली होती. एक वेळ साईना 8-14 अशी पिछाडीवर पडली होती; परंतु तिने जोरदार खेळ करीत 18-18 अशी बरोबरी साधली. तिने स्मॅशेसचा सुरेख खेळ केला. तिने सात गुण स्मॅशेसवर मिळविले आणि पहिल्या गेममध्ये बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये साईनाने नेटजवळून अधिक सरस खेळ करून विजय साकारला.

""सामन्याच्या सुरवातीला मी थोडी निराश झाले होते; परंतु रॅलीजवर भर देत मी खेळ केला आणि जसाजसा सामना पुढे सरकत गेला, तसतसा माझा आत्मविश्‍वास वाढला,'' असे सांगून साईना म्हणाली, ""पहिल्या गेममध्ये मी पिछाडीवर पडले होते, तेव्हा मी सर्वोत्कृष्ट खेळ करण्याचा निर्धार केला आणि त्यात मला यश आले.''

साईनाची प्रतिस्पर्धी झु यिंग ही पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत दाखल झाली होती. तिने काही चांगल्या खेळाडूंना पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. साईनालाही तिने थोडे अस्थिर केले होते. तिने काही फसवे फटके मारल्याने साईना अडचणीत आली होती. साईनाने तिच्या खेळाचा अभ्यास करून जिद्दीने खेळ करीत बाजी मारली.  

Follow
Us on
Twitter

प्रतिक्रिया
On 6/21/2010 11:18 AM Abs said:
Congrats Saina ... well done सानिया मिर्झा चे कौतुक आता पुरे.... पाकिस्तानात म्हणे 'सानिया भाभी' नावाचा गुटखा निघाला आहे.
On 6/21/2010 10:14 AM Kedar said:
मनपूर्वक अभिनंदन....आता जाहिरातींच्या मागे लागून career वाया नको जाऊ देऊ...ALL the best for common wealth game....
On 6/21/2010 12:33 AM makya said:
Saina Congratulations !!! We are pround of u
On 6/21/2010 12:28 AM PRAVIN said:
वेल DONE
On 20/06/2010 11:19 PM rakesh patil said:
congrats ......सायना खूप खूप अभिनंदन एक ,,,,, Request ... चुकून कधी त्या नटवी सानिया सारखी होऊ नकोस ,.आणि DO - NOT - MARRY -PAKISTANI नाहीतर लोकांचा विश्वास उडेल
On 20/06/2010 11:09 PM rakesh patil said:
बर झाल सानिया मिर्झाच लग्न झाल नाहीतर अजून तिने आपल्या देशाच नाव Badminton क्षेत्रात खराब करून टाकल असत .. बघ सानिया आमची सायना कशी खेळते ती ...... congrats सायना माझ्याकडून तुला हार्दिक अभिनंदन .................
On 6/20/2010 9:14 PM sonu said:
खकुप ढआन
On 6/20/2010 9:06 PM milind said:
well done saina we are proud of you.
On 6/20/2010 8:46 PM vikas said:
Congrats Saina!!! We really Proud of you!! सायना नेहवाल जिंदा बाद , सानिया मिर्झा मुर्दाबाद.
On 6/20/2010 6:21 PM जयदेव said:
'अभिनंदन' साईना!!
On 6/20/2010 4:43 PM Abhijeet Desai said:
Very Good Saina,keep it up & wish you all the best for your future.Hoping to see u as top seeded player in world badminton.
On 6/20/2010 4:20 PM kanadev said:
हि खरी विजेती आणि भारताची शान पण हिला कधी प्रसद्धि जास्त मिळत नाही कारण कि हि फक्त खेळण्यात लक्ष देते आणि याचा विरुद्ध ती नटवी सान्या मिर्झा बघा खेळ कमी आणि बाकी काम जास्त. (लहरी राजा ............ मणी हार)
On 6/20/2010 4:07 PM pravin said:
well done साईना
On 6/20/2010 3:44 PM onkar said:
हा फरक आहे साईना आणि सानिया यांचा मधला...! साईना हार्दिक अभिनंदन...
On 6/20/2010 3:36 PM nikhiln said:
ग्रेट. अभिनंदन. या मुलीमध्ये खरच talent आहे. क्रिकेट आणि सानिया मिर्झा चा कौतुक कमी करून हिच्याकडे लक्ष द्यावं
On 6/20/2010 2:59 PM sudhu said:
साईना,u r great & all indians are proud of you. Only request donot marry with any pakistani.
On 20-06-2010 14:44:40 Dr. Santy83 said:
abhinandan
On 6/20/2010 2:25 PM ek shubhechchhuk singapurkar said:
अप्रतीम ! स्वकमाई ने यश मिळवायला साईना ने श्री पुल्लेला गोपिचाम्दाम्कडून शिकवणी घेतली आहे. जाहिराती करून , अंग प्रदर्शन करून हिला सुद्धा कोटी च्या कोटी रुपये मिळवता आले असते. पण शेवटी गुरूची विद्या तारते हेच सिद्ध झाले. आता ऑलिम्पिक हेच लक्ष्य! खूप खूप शुभेच्छा.
On 6/20/2010 2:22 PM Rahul said:
हार्दिक अभिनंदन
On 6/20/2010 2:01 PM SHIVRAM VAIDYA said:
साईना, आम्हा भारतीयाना तुझ्याबद्दल अभिमान वाटतो, हार्दिक अभिनंदन आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा !!!
On 6/20/2010 1:49 PM sid said:
congrats सायना...we r proud of u.....
On 6/20/2010 12:23 PM Anil Shantaram Gudhekar said:
'अभिनंदन' अशीच प्रगती करून देशाचे नाव उज्ज्वाल करावे.
On 6/20/2010 12:12 PM gopu said:
छान.............


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: