Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

युतीच्या भांडणात कॉंग्रेस हात धुवून घेणार
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 24, 2010 AT 12:30 AM (IST)

मुंबई - औरंगाबाद महानगपालिकेतील शिवसेना व भाजपमधील भांडणात कॉंग्रेसने हात धुवून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेना व भाजपमध्ये माऱ्यामाऱ्या सुरू झाल्या आहेत, अशा परिस्थितीत शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सरकारला असलेल्या विशेष अधिकाराचा वापर करून औरंगाबाद महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे स्थानिक नेते व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपने युती करून निवडणुका लढविल्या व बहुमताच्या जवळपास जागा जिंकल्या. अपक्षांच्या मदतीने युतीने महापालिकेची सत्ता हस्तगत केली. मुख्यमंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही कॉंग्रेसला मात्र निवडणुकीत सपाटून मार खावा लागला. आता युतीतच हमरीतुमरी सुरू झाल्याने कॉंग्रेसने त्याचा फायदा उठविण्याचे ठरविले आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीवरून शिवसेना व भाजप यांच्यात राडा सुरू झाला आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विकास जैन यांचा भाजपचे राजू शिंदे यांनी कॉंग्रेसच्या मदतीने पराभव केल्याने युतीत बेबनाव निर्माण झाला आहे. शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात हंगामा केला. त्यामुळे भाजपही दुखावला आहे. भाजपनेही शिवसेनेच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. उद्या होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत शिवसेनेला काय प्रत्युत्तर द्यायचे ते ठरवू, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. युतीतील हा वाद मिटण्याची शक्‍यता धूसर असल्याचे बोलले जात आहे.

कॉंग्रेसने मात्र युतीतील भांडणाचा लाभ उठविण्याचे ठरविले आहे. परदेशातून मुख्यमंत्री येताच अब्दुल सत्तार यांनी त्यांची भेट घेतली व थेट औरंगाबाद महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली. पालिका आयुक्तांकडून अहवाल मागवून घ्यावा व त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याचे सत्तार यांनी आज मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेत सुरू झालेल्या राजकीय वादाला आता वेगळेच वळण लागण्याची चिन्हे आहेत.
प्रतिक्रिया
On 6/24/2010 2:58 PM pramila padare said:
राजेंद्र दर्डा आता संधीचा लाभ घेणार. शिवसेना, भाजपा बोंबलत बसा. संजय रूट आपण याचे मेन कारण आहात, लेखणी म्हणजे राजकारण नव्हे याचा प्रत्यय आपणस shiv senetun काढल्यावर कळेल.
On 6/24/2010 2:48 PM nagesh said:
तेते शिवसेना शिवाय पर्याय नाही. जय maharashta .....
On 6/24/2010 1:31 PM MARATHA said:
काही पण करा पण कॉंग्रेसच्या हातात संभाजीनगर देऊ नका.......नाही तर तिथले मराठी माणसे भिकेला लागलेच म्हणून समजा..........
On 6/24/2010 12:53 PM MNS said:
कोन्ग्रेस ला दुसर्याच्या टाळू वरचे लोणी खायला आवडते. तसेच तर ते मोठे झाले आहेत. युती चे भांडण हे म्हणजे त्यांना आयती मिळालेली संधी आहे. ती हे संधीसाधू कशी सोडतील?
On 6/24/2010 12:05 PM deshi said:
शिवसेना आणि बीजेपी यांना राज्य करण्याची अक्कल नाही. तो धुर्तापणा फक्त कॉंग्रेस कडे आहे. आणी हे अकलेचे भिकारी त्याला बळी पडतात. जेवा जनसेवे वरून लक्ष जाऊन फक्त सत्तेचे राजकारण उरते तेवा ह्या गोष्टी घडायला लागतात. सगळे लालची लेकाचे
On 6/24/2010 11:22 AM Dava Dola said:
चला परत कॉंग्रेस राज्य करायला मोकळे ..युती कुत्रा सारखे फक्त भुंकणार
On 6/24/2010 9:34 AM उर्मिला अशोक शहा said:
न्याय्य रीतीने निवडून आलेली नगरपालिका कॉंग्रेस बरखास्त करू इच्छिते,आहे का नाही टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार.कॉंग्रेसला दोष देऊन उपयोग नाही भगव्याना यश पचले नाही शिवसेनेने आता पर्यंत कॉंग्रेसची अनेक वेळा मदत घेऊन विजय मिळविले,भाजपने तसे केले तर रस्त्यावर येऊन हाणामारी हि शिवसेना संस्कृती लोकांना मान्य नाही. लवकर प्याचअप करा अन्यथा लोकच तुम्हाला झिडकारतील कॉंग्रेसला लोकांनीच झिडकारले.तेंव्हा बरखास्तीचे प्रयोग सत्ता आहे म्हणून करू नये नाहीतर अंगलट येईल जनतेचा विश्वास घात करणे अयोग्य जागते रहो
On 6/24/2010 9:31 AM ठणठणपाळ said:
अगोदर हात "ओले" करायचे आणि नंतर "हात धुऊन" घ्यायचे...हि तर कॉंग्रेसची strategy असते..
On 6/24/2010 9:21 AM रोखठोक said:
दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.
On 6/24/2010 8:56 AM sv said:
अहो युती आणि kongresmadhil हे संगनमत आहे.त्यात वेगळे काही नाही. हे संगनमत १९४७ पासून चालू आहे. जनतेची उचलून मारायची एवढेच काम सगळ्या राजकीय पक्षांनी केले आहे.
On 6/24/2010 8:12 AM ganesh said:
म्हणून तर कॉंग्रेस नि भाजपला मदत केली तोडा, फोडा आणि राज्य मिळावा हि ब्रिटीशांची शिकवणूक काँग्रेसनी उचलली आहे. यात विशेष कांहीही नाही. शीव सेना आणि भाजप राज्य करू शकणार नाही त्याला डोक लागत हाना माऱ्या करून राज्य चालवता येत नाही. काँग्रेसनी फार चांगल केले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: