Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पॉस्को विरोधकांनी पाळला ओरिसात काळा दिवस
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Thursday, June 24, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: national,   orissa,   posco,   snn

भुवनेश्‍वर - पॉस्को पोलाद महाप्रकल्पाला विरोध करणाऱ्या विरोधी आंदोलकांनी आज काळा दिवस पाळला. हा प्रस्तावित प्रकल्प गुंडाळण्याच्या मागणीसाठी "पॉस्को प्रतिरोध संग्राम समिती'ने पॅराद्वीप, धिंकिया, गोविंदपूर, पाटणा आदी भागांत रॅलीही काढल्या.

प्रस्तावित जागेवर सर्वेक्षणास राज्य सरकारला परवानगी दिली असली, तरी प्रकल्पाला विरोध कायम असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी तातडीने प्रकल्पाच्या प्रस्तावित जागेला भेट द्यावी, या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला. राज्य सरकारने पॉस्कोसोबतच्या कराराचे नूतनीकरण करू नये, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: