
पुणे - आजारी असताना ते आपल्याला बरं करतात, आपलं आरोग्य चांगलं रहावं म्हणून ते चांगला सल्ला देतात आणि म्हणूनच आपल्या तोंडून सहजपणे कृतज्ञतेचे शब्द निघतात... थॅंक्यू डॉक्टर!
1 जुलै रोजी "डॉक्टर्स डे'च्या निमित्ताने डॉक्टरांबद्दल वाटणारी कृतज्ञता जाहीरपणे व्यक्त करण्याची संधी "सकाळ टाईम्स' आपल्याला देत आहे. 1 जुलैच्या अंकात त्याला प्रसिद्धी देण्यात येईल.
त्यासाठी आपण फक्त एवढंच करायचं की, आपल्या डॉक्टरांचे पूर्ण नाव, इंग्रजी भाषेत 50 शब्दात आपला संदेश आणि आपलं पूर्ण नाव अशा स्वरूपात येत्या 28 जून रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आमच्याकडे पाठवा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर आपण पाठविलेल्या संदेशाला विनामूल्य प्रसिद्धी दिली जाईल. तेव्हा आपला संदेश लगेचच लिहा आणि आमच्याकडे पाठवा, त्यासाठी पत्ता आहे... "सकाळ' कार्यालय, बुधवार पेठ, पुणे. किंवा "सकाळ' कार्यालय, शिवाजीनगर, पुणे.
आपण आपला संदेश ई-मेल द्वारेही पाठवू शकता,
messages@sakaaltimes.com या पत्त्यावर.
Follow
Us on
Twitter