Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

इंधन दरवाढ समर्थनार्थ केंद्र सरकारतर्फे जाहिराती
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Monday, June 28, 2010 AT 12:30 AM (IST)

नवी दिल्ली -  पेट्रोलियम पदार्थांचे वाढीव दर मागे घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिल्यानंतर केंद्र सरकारतर्फे ही दरवाढ अपरिहार्य कशी होती, हे सांगणे सुरू झाले आहे. शेजारील देशांमध्ये रॉकेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर तुलनेने भारतात कसे कमी आहेत, याची माहिती देणाऱ्या जाहिराती पेट्रोलियम मंत्रालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

या अर्धपान जाहिरातींच्या माध्यमातून इंधन दरवाढीचे समर्थन करून नागरिकांचीही समजूत घालण्याची मोहीम पेट्रोलियम मंत्रालयाने राबविली आहे. मंत्रालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातींमध्ये म्हटले आहे, की शेजारील पाकिस्तानात भारतीय रुपयांमध्ये "एलपीजी' सिलिंडरमागे 577 रुपये मोजावे लागतात. बांगलादेशात 537 रुपये, नेपाळमध्ये 782 रुपये, तर दक्षिणेकडे असलेल्या श्रीलंकेत सर्वाधिक 822 रुपये प्रतिसिलिंडरचा दर आहे. त्या तुलनेत भारतात दिल्लीमध्ये वाढीव दरानंतरही सिलिंडरसाठी 345 रुपये आकारणी होत असून, त्यातही प्रतिसिलिंडर 225 रुपयांचे अनुदान सरकारतर्फे दिले जात आहे. तसेच केरोसिनचे भारतात (दिल्लीत) प्रतिलिटर दर 12 रुपये 32 पैसे एवढे आहेत. त्या तुलनेत पाकिस्तानात 35.97 रुपये, बांगलादेशात 29 रुपये, श्रीलंकेत 21 रुपये आणि नेपाळमध्ये सर्वाधिक 39 रुपये ग्राहकांना एक लिटर रॉकेलसाठी द्यावे लागतात.

या आकडेवारीच्या आधारे भारतातील सिलिंडर आणि रॉकेलचे दर अत्यंत कमी असून, इंधन दरवाढीनंतरही वार्षिक 53 हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या इंधन दरवाढीच्या घोषणेनंतर पेट्रोलियम मंत्रालयातर्फे अशाच प्रकारे जाहिरातींच्या माध्यमातून लोकांची समजूत घालण्यात आली होती. यंदाही त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे.
 
प्रतिक्रिया
On 6/28/2010 5:30 PM @ Dnayneshwar said:
तू सौदी अराबिया मध्येच का नाही जात राह्यला?? २.८८ रुपये लिटर डिझेल घे, ५.२८ रुपये चं पेट्रोल... तुला माहिती आहे न इथ का स्वस्त आहे ते?? आणि हो पाणी कसा मिळता ते महिती करून घे हा जायच्या आधी... :P
On 6/28/2010 4:06 PM AMOL H B said:
ज्या कोणी महाभागांनी हि तुलना केली आहे त्यांना त्या देशातील अर्थव्यवस्थेबद्दल बद्दल काय घंटा माहिती आहे का? पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका... ह्या बिनडोक लोकांना हे तरी सांगा कि भारताची करन्सी हि त्यांच्या करन्सीपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे एवढा फरक आहे. वां! देश काय प्रगती करतोय.... गोरगरिबांच्या टाळूवरचे लोणी खावून भामटे परत जाहिराती लावतात .... अरे थोडी तरी लाज कशी वाटत नाही यांना... आणि त्याहून आपण लोक थोर, ह्यांना निवडून देतो आणि हे आपल्याच .......... खुपसतात!
On 6/28/2010 3:44 PM shrikant said:
अरे लाज वाटली पाहिजे तुम्ही स्वताला प्रगत मानता आणि लहान देश बरोबर बरोबरी करता
On 6/28/2010 1:44 PM suresh said:
सगळे खरे आहे पण ज्या देशांची उधारने कांग्रेस ने दिली आहेत त्या देशातील टैक्स भरनारे किती लोक आहेत ???? हे कॉंग्रेसने सांगावे.
On 6/28/2010 1:05 PM Ajit Patil said:
अरे बाळ सचिन आणि ज्ञानदेव, सौदी हा जगातला सर्वात जास्त तेल उत्पादक देश आहे. तसेच दुबई मध्ये सुद्धा तेल उत्पादन होते. आणि त्याच बरोबर त्यांच्याकडे स्वताच्या रिफायनरी सुद्धा आहेत. त्यामुळे तिथे स्वस्त आहे. ह्या उलट नायजेरिया मध्ये तेल उत्पादन होते तरी पण तिथे तेल महाग आहे कारण त्यांच्याकडे रिफायनरी नाहीत. आपल्याकडे दुध २६ रुपये लिटर आहे तेच सौदी आणि दुबई मध्ये पहा. आणि हो त्यांच्याकडे TAX हा प्रकार नाही.
On 6/28/2010 12:10 PM KSK said:
आता विरोधी पक्शानला सुद्धा पैसे कमवायचा चास मिळणार. जितका कडाडून विरोध तितके चांगली कमाई. तू मारल्या सारखे कर मी रडून दाखवतो. तेरी भी चूप आणि मेरी भी चूप. आपण सगळे भाऊ भाऊ जनतेला मिळून खाऊ खाऊ !
On 6/28/2010 12:02 PM Satish said:
या नाठालाना कुठल्या लायकीच्या देशांबरोबर बरोबरी करायची ते सुधा कळत नाही. स्वतःत लायकी नसल्याने असे होत असावे. लोकांना कायम मूर्ख समजून देश चालवतात आणि गरिबीच्या भावनांना निवडणुकीवेळी वर काढतात. समाजाने वेळीच धडा दिला नाही तर हे असेच चालणार.
On 6/28/2010 11:50 AM ramesh said:
Petrol in Nagpur is costiest-than any city in India-reason Mah.gov.Tax and highest Octroi at nagpur,-NMC-NIT-Maharashtr Gov.and central gov.-thanks for giving slow poison to Nagpurkars.
On 28/06/2010 11:23 AM mahendra said:
मित्रानो सौदी आणि दुबई या देशांकडे क्रुडे ओईल (खनिज तेल) आहे म्हन्नोन तिकडे पेट्रोल , दिएसेल स्वस्त मिळणारच आपल्या देशयत क्रुडे ओईल चे साठे कमी आहेत हे आपण लक्ष घेतले पाहिजे.
On 6/28/2010 11:00 AM Dnayneshwar said:
सौदी अराबिया मध्ये दिएसेल २४ हलला म्हणजे २.८८ भारतीय रुपये लिटर आहे. आणि पेट्रोल ४४ हलला म्हणजे ५.२८ भारतीय रुपये लिटर आहे. सौदी (८५% कुर्रुंत इम्पोर्ट फ्रोम सौदी आहे ) ते भारत वाहतूक खर्च आणि प्रोफित मिळून पेट्रोल ८ ते १० रुपयात लिटर मिळावे. पण भारत सरकार करांच्या नावाखाली ५००% लुट करते.
On 6/28/2010 9:59 AM सचिन-दुबई said:
दुबई मध्ये पेट्रोल १.४२ दिरहाम प्रती लिटर मिळते. १ दिरहाम = १२.५५ रुपये. म्हणजेच १७.८२ रुपये प्रती लिटर पेट्रोल मिळते. आणि भारतात ????
On 6/28/2010 9:30 AM shruti said:
बेस्ट...congress rocks!!!
On 6/28/2010 3:15 AM Amol said:
आणि पेट्रोलचे दर??? ते मात्र सगळ्यात जास्त...


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: