Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मॉन्सून पुन्हा होणार आठवड्यात सक्रिय
पीटीआय
Tuesday, June 29, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: monsoon,   rain,   imd,   new delhi,   national

नवी दिल्ली -  मोसमी पाऊस सध्या लांबला असला, तरी तो आठवडाभरात सक्रिय होऊन देशभरात पर्जन्यवृष्टीस सुरवात होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याचे महासंचालक अजित त्यागी यांनी आज व्यक्त केला.

"यंदा मॉन्सून सक्रिय झाल्यापासून देशात 12 टक्के पाऊस पडला आहे. आता पावसाने ओढ दिली असली, तरी काळजी करण्याचे कारण नाही. पुढील आठवड्यात पुन्हा पाऊस पडण्यास सुरवात होईल. तसे झाले नाही तर मात्र चिंता करण्यासारखी स्थिती असेल,'' असे त्यागी म्हणाले.

"मॉन्सूनच्या प्रगतीत सुरवातीला अडथळे निर्माण झाल्याने पावसाला विलंब झाला. मात्र, या वर्षी काळजी करण्याचे कारण नाही. कारण जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देशभरात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याच्या मॉन्सून विभागाचे प्रमुख डी शिवानंद पै यांनी व्यक्त केला आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: