Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

बिहारमध्ये नौका उलटून 42 जण बुडाले
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Saturday, July 03, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: boat,  submerged,  patna,  bihar,   national,  snn

पाटणा  -  बिहारमधील पश्‍चिम चंपारण्य जिल्ह्यात गंडक नदीत नौका उलटल्याने तब्बल 42 जण बुडल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत दोन बालकांसह तिघांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या नौकेत 65 पेक्षा अधिक प्रवासी होते.

भगवानपूरहून रानहा येथे नौका जात होती. गोरिया घाटाजवळ नौका उलटली. त्यामध्ये बेतिया जिल्ह्यातील घोरैया गावासह परिसरातील इतर गावांमधील नागरिक होते. नौकेची क्षमता 40 जणांचीच असतानाही अधिक जण बसले होते. सुमारे 20 जणांनी पोहत आपला जीव वाचविला. गंडक नदीच्या उसळत्या पाण्यामुळे नौका उलटल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. राज्य सरकारने या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना एक लाख रुपये देण्याची घोषणा केली असून, दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.

जोरदार वारा आणि संततधार पाऊस यामुळे मदतकार्यात अडथळा येत आहे. नदीच्या प्रवाहाला वेग असल्याने बुडालेल्या व्यक्तींचे मृतदेह दूरपर्यंत वाहून गेल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा प्रशासन शेजारील जिल्ह्यातील जीवरक्षकांची मदत घेत आहे. चंपारण्य जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक बैठकीत व्यस्त होते, अशी टीका स्थानिकांनी केली आहे. दरम्यान, संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांना घटनास्थळी त्वरित जाण्याचे आदेश दिल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: