Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

शुल्कवाढीच्या विरोधात रोझरी पालक संघ स्थापन
-
Sunday, July 04, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: fee,  rosary,  education,  pune,   school

पुणे - शाळेतील शुल्कवाढीला विरोध करण्यासाठी रोझरी शाळेच्या कॅंप, वारजे, बिबवेवाडी, साळुंके विहार, विमाननगर येथील पालकांनी एकत्र येऊन रोझरी पालक संघाची (पुणे शहर सर्व शाखा) स्थापना केली आहे. संघाच्या प्रतिनिधींनी शनिवारी शिक्षण उपसंचालक सुनील मगर यांची भेट घेतली. येत्या आठ दिवसांत याबाबत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पालकांनी मगर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

रोझरी शाळेने गेल्या वर्षी आकारलेल्या आणि यंदाच्या शुल्कात मोठी तफावत आहे. याबाबत पालकांनी शाळेकडे तक्रार केली असता, शासन निर्णयानुसारच वाढ झाल्याचे सांगण्यात येते आहे. पुस्तके, वह्या आणि गणवेशाबाबत सक्ती केली असून, यासाठी अवाजवी शुल्क आकारण्यात येत आहे. शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि बाकही अपुरे आहेत. सरकारने शाळेतील सुविधा, शिक्षकांची शैक्षणिक पात्रता, त्यांचे वेतन या सर्व बाबींची तपासणी करावी, अशी मागणी पालकांनी निवेदनात केली असल्याची माहिती अशोक बंबोली आणि अजय साठे यांनी दिली.
प्रतिक्रिया
On 7/5/2010 12:10 AM teja said:
राजकारणी लोकांचे पैसे आहेत rosary ... अरे जागे हुअ नाही तर पालक पेटले तर वाट लागेल... खूप झाले आत्ता
On 7/4/2010 1:57 PM KN said:
खरे तर शासन गप्प का बसेले आहे काळात नाही. Rosary प्रशासन सरळ सरळ जाहीर करते कि आम्ही फी शासनाच्या परवानगीने घेतली आहे. खरे तर शासना ने परवानगी कशी दिली हेच कळत नाही. आधीच महागाई ने सामान्य माणूस भरडला जात आहे त्यात डीसेल पेट्रोल ची वाढ त्यामुळे मुलांना ने आन करण्याचा खर्च वाढणार आहे सरकार ने या गोस्त्तींचा विचार करून ताबडतोब फी वाढ रद्द करावी आणि फी वाढी बद्दल कडक नियम घालून द्यावे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: