Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

कसोटी मालिकेसाठी पाकचे चार खेळाडू रवाना
यूएनआय
Saturday, July 10, 2010 AT 12:00 AM (IST)

लाहोर -  ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघात दाखल होण्यासाठी यासीर हमीद, अजहर अली, तन्वीर अहमद आणि झुल्कारनेन हैदर हे चार खेळाडू आज रवाना झाले.

यासीर हमीदचे तीन वर्षांनंतर पाकिस्तान संघात पुनरागमन झाले आहे. फैसल इक्‍बालच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू अजहर अली आणि मध्यमगती गोलंदाजी तन्वीर यांना प्रथमच स्थान मिळाले आहे. झुल्कारनेन याची कमरान अक्‌मलला पर्यायी यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. पाकिस्तान निवड समितीने कराचीचा यष्टिरक्षक सर्फराज अहमद यांचा विचार केला नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटींनंतर इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: