Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

जेम्स लेनच्या पुस्तकाची राज्यात नाकेबंदी
-
Monday, July 12, 2010 AT 12:30 AM (IST)

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त लेखन करणाऱ्या जेम्स लेन यांच्या पुस्तकावरील बंदी न्यायालयाने उठविली असली तरी या पुस्तकाची महाराष्ट्रात नाकेबंदी करण्याचा मानस राज्य सरकारने व्यक्त केला आहे. "द शिवाजी-हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकाची राज्यात कुठेही विक्री अथवा छपाई होणार नाही, याची दक्षता राज्य सरकार घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज केली.

सह्याद्री अतिथीगृहात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, या अगोदर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जेम्स लेन यांच्या पुस्तकावरील बंदीबाबत सर्वाधिक चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने बंदी कायम ठेवल्याबाबत सर्वच मंत्र्यांनी नाराजी व्यक्‍त केली. न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यभर उमटलेले तीव्र पडसाद आणि जनतेचा रोष लक्षात घेता, या पुस्तकाची महाराष्ट्रात नाकेबंदी करण्याचाच निर्णय मंत्रिमंडळात झाला. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे ऍडव्होकेट जनरल, विधी विभागाचे सचिव आणि गृहविभागाचे अतिरिक्‍त प्रधान सचिव यांची समिती नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती, मुख्यमंत्र्यांनी दिली.

या वादग्रस्त पुस्तकाची राज्यात कुठेही विक्री अथवा छपाई होणार नाही. यासाठी राज्य सरकारने कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासाठी ही समिती सरकारला कायदेशीर सल्ला देणार आहे.

दरम्यान, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राष्ट्रीय अस्मिता असणाऱ्या महान व्यक्‍तिमत्त्वाची बदनामी करणाऱ्या पुस्तकांवर बंदीचा कायदा असण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले; मात्र अशा स्वरूपाचा कायदा केंद्र सरकारने करायला पाहिजे, अशी पुस्ती त्यांनी जोडली. जेम्स लेन यांना शिवाजी महाराज यांच्यावरील लेखन करण्यास मदत करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्वानांचीदेखील पोलिसांनी चौकशी केली होती; मात्र अशा प्रकारची मदत त्यांनी केली नसल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. जेम्स लेन यांना पुस्तक लिहिण्यासाठी इतिहास संशोधक एस. एस. बहुलकर यांनी मदत केल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळे पोलिसांनी श्री. बहुलकरांचीही चौकशी केली होती; मात्र त्यांनी मदत केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले नाही, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

तीव्र पडसादाची शक्‍यता
दरम्यान, उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याने विधानसभेत जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तरुण आमदारांनी सरकारलाच धारेवर धरण्याची रणनीती आखली आहे. यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या वादग्रस्त पुस्तकावर कायमची बंदी घालण्याची मागणी केली असून जेम्स लेन यांना मदत करणाऱ्या इतिहास संशोधन संस्था, इतिहास संशोधक यांच्यावरही कारवाई करण्याची आग्रही मागणी सभागृहात करण्याचे मनसुबे आखले आहेत.
Follow
Us on
Twitter
प्रतिक्रिया
On 8/5/2010 6:25 PM tardalkar a s said:
जेम्स लेन हा परदेशी लेखक महाराष्ट्रात येवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर संशोधन करीत होता.पण त्यास त्या कमी एतद्देशीयांनी सहकार्य केले खोटी आणि कपोलकल्पित माहिती पुरवली. सबब जेम्स पेक्षा इतदिशियचं घोर अपराधी आहेत आणि त्यांना जबरदस्त शिक्षा झालीच पाहिजे.
On 7/12/2010 5:13 PM sachin said:
इस्लामिक इंडिया हा काय प्रकार आहे नावातच प्रोब्लेम आहे.हे तर लगेच दिसून येते.आता ह्या गोष्टीवर काय बोलायचे. हा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे महागाईचा मुद्दा मागे राहिला आहे.महागाईचा मुद्दा ह्या मुळे हे राजकारण केले असावे .(राजनीती)
On 12.07.2010 16:17 Maharashtrian said:
मयूर इतिहासाची थोडी माहिती आहे का ?? एक काम कर आपल्या बाजूचाच राज्य आंध्र प्रदेश तिथे जओन विचार बरे ते ओळखतात कि श्री छत्रपती शिवाजी महाराजांना . महाराज महाराष्ट्राचे होते फक्त
On 7/12/2010 2:11 PM nagesh said:
जेम्स लेन हा अपराधी आहे पण त्याला मदत करणारे भारतीय होता मग त्याचे काय करयाचे?
On 7/12/2010 12:16 PM Raje said:
जेम्स चा निषेध करून चालणार नाही तर oxford आणि भांडारकर महाराष्ट्राची आणि भारताची माफी मागितली पाहिजे जेम्स ला भारतात आणून त्याने हे कुठून आणि कसे लिहिले याची चोकशी झालीच पाहिजे . मराठी मेडिया ने हे प्रकरण महाराष्ट्रआता लोकाप्रयात पोहचवले आहे तसेच हिंदी आणि इंग्लिश मेडिया याने सुधा केले पाहिजे .
On 7/12/2010 12:03 PM Datta said:
जरा सबुरीने घ्या ..... आपण कुणीही हे पुस्तक वाचले नाहीये !! उगीच कावकाव करू नका. !! इतिहासातील मडी उकरून " आज " का खराब करत आहोत आपण ?? आपला दत्ता जगताप .....बारामती
On 7/12/2010 11:01 AM mayur said:
फक्त महारास्त्र तच विक्री बंध करून चालणार नाही पूर्ण देशात विक्री बंध केली पाहिजे शिवाजी महाराज हे फक्त महारास्त्राचे राजे न्हवते ते पूर्ण देशाचे राजे होते...........
On 7/12/2010 10:12 AM Aek Punekar said:
जेम्स लेनला ज्या लोकांनी पुस्तक लिहिण्यासाठी व पुस्तक छापण्या साठी मदत केली त्या पुण्यातील देश द्रोह्यावर प्रथम कारवाही करा
On 12/07/2010 5:13 AM Sarang Madgulkar said:
जेम्स लेन च्या खोडसाळ लिखाणाच्या बाजूने जो कोणी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रीतीने बोलेल, समर्थन करेल, ... तो मेल्यावर नरकात जाईल.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: