धुळ्यात नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद
-
Wednesday, July 14, 2010 AT 12:15 AM (IST)
धुळे - शहरातील महिलांना 'मधुरांगण'च्या रूपाने 'सकाळ माध्यम समूहाने' पाच वर्षांपूर्वी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. हे व्यासपीठ आता विस्तारत आहे. त्याच्या विस्ताराचा आणखी एक टप्पा म्हणून सभासद नोंदणीस सोमवारपासून (ता. 12) सुरवात झाली. त्यास महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हिलांच्या सर्वांगीण विकासाला वाव मिळवून देणारे, महिलांना सर्वार्थाने सक्षम बनविणारे, वैविध्यपूर्ण उपक्रम देणारे, सांस्कृतिक कार्यक्रमांनी समृद्ध करणारे आणि अंगभूत कौशल्याला वाव देण्याचे काम "मधुरांगण' व्यासपीठाच्या माध्यमातून होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून धुळ्यात नैपुण्यपूर्ण कार्यक्रम होतात. त्यात तेजस्विनी पुरस्काराच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार झाला. पालकत्व, आरोग्य, खाद्य, निबंध, नृत्य आदी सर्व विषय हाताळले. या सर्व उपक्रमांना महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. आगामी काळात धावपळीच्या युगात वावरणाऱ्या गृहिणी, नोकरदार महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना उपयुक्त दर्जेदार असे कार्यक्रम "मधुरांगण'तर्फे यंदा सादर होतील. नवीन वर्षात सहजीवन, आरोग्य, गृह व्यवस्थापन, गुंतवणूक, उद्योजकता, स्वसंरक्षण या विषयांवर माहितीपर कार्यक्रम, कला, छंद, सौंदर्य, संगणक प्रशिक्षण, स्पोकन इंग्लिश कार्यशाळा होतील. त्याशिवाय नाट्यप्रयोग, चित्रपट आणि सहलींची मजा "मधुरांगण' सदस्यांना सवलतीत घेता येईल. तसेच व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा व चित्रपट महोत्सव हे यंदाचे खास आकर्षण आहे.
चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'अशी ही ट्वेंटी-थर्टी' हा विशी-तिशीतील तरुणाईचे दर्शन घडविणारा कार्यक्रम, शेखर ढवळीकर लिखित आणि दिग्दर्शित "रेशीमगाठी' हा लग्न जुळविण्यातील गमती-जमती आणि अडचणी मांडणारा विनोदी कार्यक्रम, तर "लावण्यसंध्या' हा घरंदाज लोकसंगीताचा उत्सव असे मेगा इव्हेंट होतील.
'मधुरांगण' सभासदात्वसाठी वार्षिक वर्गणी 300 रुपये असेल. त्यात "मधुरांगण'च्या प्रत्येक सभासदाला वर्षभरातील आकर्षक कार्यक्रमांव्यतिरिक्त "तनिष्का' मासिक घरपोच मिळेल. नाव नोंदणीसाठी शहरातील विविध भागात केंद्रे कार्यान्वित केली आहेत. तेथे संपर्क साधावा, असे आवाहन मधुरांगणाच्या सहसंयोजिका मीना खंडेलवाल यांनी केले आहे.
नोंदणी केंद्र असे (पत्ता व दूरध्वनी क्रमांक या क्रमाने) - सकाळ, (धुळे विभागीय कार्यालय, राष्ट्रभाषा भवन, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, 235936, 9850977490), दीपक भावसार (अलंकार ब्युटी शॉपी, बांबूगल्ली, 237285,9422289565), विजया गिरासे (रूपमिलन ब्युटीपार्लर, 18 ए फुले कॉलनी, 240282, 9422787660), अरुणा भन्साली (नवकार कलेक्शन, आदिनाथ पार्क, श्वास हॉस्पिटलसमोर, ऐंशी फुटी रोड, 240011), शोभा येवले (विनोद वाचनालय, क्रांतीचौक, चितोड रोड, 249571, 9422788571), वैजयंती अमृतकर (बॅग्ज ऍण्ड साडी हाउस, डॉ. रघुवंशी यांच्या दवाखान्यामागे, जमनागिरी रोड, 9422751784), अजय कासोदेकर (अजय चष्माघर, देवरे डोळ्यांचे हॉस्पिटल, गणपती मंदिर रोड, 236321), प्रकाश भावसार (न्यू अलंकार शॉपिंग सेंटर, 64, जयहिंद कॉलनी चौक, देवपूर), सोनाली मराठे (मयूर कॉलनी, डॉ. रोडा यांच्या हॉस्पिटलजवळ, देवपूर, 9270147465), कुमुदिनी साळुंखे (साळुंखे क्लासेस, मालेगाव रोड, 9763537906), कल्पना चोरडिया (प्रगती ब्यूटीपार्लर, प्लॉट क्रमांक एक, महावीर कॉलनी, विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मागे, साक्री रोड, 276896, 9371542977).