Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

...अन् ती 'माउली' रडू लागली! (ब्लॉग)
विश्वनाथ गरुड (wishwanath.garud@esakal.com)
Wednesday, July 14, 2010 AT 07:21 PM (IST)

सकाळी निघायला थोडा उशीरच झाला होता. पालखी पुढं जाऊन अर्धा-पाऊण तास होऊन गेला होता. मग गाडीतून थोडं अंतर पुढं जाऊन फलटणजवळच्या विडणी गावातून चालायला सुरवात केली. उन्हाचा चांगलाच चटका बसत होता. घामाच्या धाराही वाहात होत्या. सात आठ किलोमीटर चालून पिंपरदमध्ये दुपारच्या विसाव्याच्या ठिकाणी पोचलो. संस्थानच्या तंबूत सोहळाप्रमुख डॉ. शिवाजीराव मोहिते आणि साताऱयाचे पोलिस उपाधीक्षक वसंत जाधव यांच्याबरोबर बोलत होतो. तंबूत पत्रकारांची फारशी गर्दी नव्हती. त्यावेळी एक ४०-४५ वर्षांची महिला तंबूजवळ आली. ती थोडीशी गोंधळल्यासारखी वाटत होती. काही वेळानं त्या माउलीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. काय झाल म्हणून विचारल्यावर तिनं दिंडीतून चुकल्याचं सांगितलं.  आम्ही लगेचच कोणत्या दिंडीतून चालताय, याची चौकशी केली. त्यावर तिनं रथामागं ४ क्रमांकाच्या दिंडीत असल्याचं सांगितल. पिंपरदकडे येताना वाटेत टॅंकरमधून पाण्याची बाटली भरताना वेळ गेला आणि त्यात तिच्या दिंडीतील महिला वारकरी पुढे निघून गेल्या. त्या माउलीला काही सुचत नव्हते. तिच्या दिंडीतील वारकरी दुपारच्या विसाव्यासाठी कुठं थांबतात, हे मलाही माहिती नव्हतं.
 
सुरवातीला तिला धीर देण्याचं काम आम्ही केलं. कोणती दिंडी दुपारी विसाव्यासाठी कुठं थांबते, हे शोधणं फार जिकिरीचं काम. चोपदारांनाही याची फारशी माहिती नसते. प्रत्येक दिंडीचा रात्रीच्या मुक्कामाची ठिकाणं ठरलेली असतात. त्याची माहिती चोपदारांकडे असते. मात्र, दुपारचा विसावा दोन-अडीच तासांचा असतो. त्यामुळं दिंड्या सोयीप्रमाणं वेगवेगळ्या ठिकाणी थांबतात. त्या माउलीला तिच्या दिंडीपर्यंत कसं पोचवायचं, असा प्रश्न पडला होता. चार नंबरची दिंडी शोधण्यासाठी खूप धावपळ केली. पण त्यातून फार काही हाती पडलं नाही. शेवटी मी शोधा-शोध थांबवली. दुपारचा एक वाजून गेला होता. त्यामुळं दुसऱया एका दिंडीत त्या माउलीच्या जेवणाची व्यवस्था करून दिली. जेवण झाल्यानंतर त्या माउलीला रथाजवळ उभं राहण्यास सांगितलं. कोणत्याही चुकलेल्या वारकऱयाला चालतानाच दिंडी सापडते, असा आतापर्यंतचा अनुभव. लिहिता, वाचता येत नसल्यानं आम्ही त्या माउलीला एक उपाय सांगितला. विसाव्याच्या ठिकाणाहून रथ पुढे गेल्यावर तीन पताका सोडून चोथ्या पताका गेल्यावर त्या दिंडीत चालण्याची सूचना केली. तिलाही ते बरोब्बर कळलं. सहज म्हणून त्या माउलीला नाव-गाव विचारलं, मुद्रिकाबाई ठवरे असं तिचं नाव. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील आनंदवाडी येथून ती आली होती.
 
पालखी सोहळ्यात रोज असे अनेक वारकरी दिंडीतून चुकतात. एकदा दिंडीतून चुकलं, की विसाव्याचं ठिकाण शोधणं किंवा मुक्कामाच्या ठिकाणी जाणं खूप जिकिरीचं होऊन बसतं. अनेक वारकऱयांना दिंडीचा तळ शोधता न आल्यानं कधीकधी जागा मिळेल तिथं विश्रांती घ्यावी लागते. जवळ फारसे पैसे नसतात. मोबाईल वगैरे लांबची गोष्ट. गावाकडून आल्यामुळं काही महिलांना तर पुरुषांशी कसं बोलायचं, याचाही प्रश्न पडतो. जग खूप हायटेक झालंय. सातासमुद्रापार असलेले मित्रही सोशल नेटवर्किंगमुळे रोजच्या रोज संपर्कात असतात. इथं मात्र काहीच अंतरावर असलेल्या वारकऱयांशी संपर्क साधणंही खूप अवघड होऊन बसतं. २०-२५ हजार लोकवस्ती असलेल्या गावात एकाचवेळी दोन-अडीच लाख लोक आल्यानं मोबाईलचं नेटवर्कही जाम होऊन जातं. त्यामुळं मोबाईल असूनही कधीकधी काहीच करता येत नाही. मुद्रिकाबाईना त्यांची दिंडी आतापर्यंत सापडली असेल. वारीत चुकणाऱयांची संख्या खूप असली, तरी एक गोष्ट निश्चितच चांगलीये की चुकलेल्यांना मार्ग दाखविणारे हातही लाखो आहेत. चुकलेल्यांना मदत करण्यासाठी कोणी ना कोणी तरी पुढे येतेच आणि मग वारीचा मार्ग सुकर होऊन जातो.
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 9/15/2010 11:55 PM sandip.r said:
tejashri tya maulila vacta pan yet nahi tar ti mobile no.kasa ghail...tuzyaitki ti shikaleli nahi he samjun ghe......kay taric kay...
On 9/1/2010 11:05 AM sharad said:
अप्रतिम लेख आहे परंतु त्या माउलीला तिची दिंडी सापडली का?
On 31-07-2010 02:09:40 asha said:
शेवटी विठ्ठलाची कृपा.....
On 7/27/2010 4:26 PM tejashree said:
khup chan pan aplya sobatchya lokancha mobile no. jarur sobat asava.jenekarun apnas lok sahayya karu shaktil.
On 7/23/2010 8:15 AM Dnyandev Deokar said:
दिंडी प्रमुखांचे मोबाईल नंबर चोप्दारांकडे ठेवायला हवेत म्हंजे असे प्रकार घडणार नाहीत .धन्यवाद
On 20-07-2010 09:49:09 manisha sangale said:
लेख छान आहे देव इतर्त्त्र शोधण्यापेक्षा माणसाच्या रुपात भेटतो तो असा
On 7/19/2010 2:38 PM Devkumar Chothave said:
परंतु त्या माउलीला तिची दिंडी सापडली का नाही. ?
On 7/19/2010 1:26 PM abhay said:
व्हा फारच छान विठल विठल विठल पंधुरंग !!
On 7/16/2010 1:25 PM Ankush Chavan said:
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
On 7/15/2010 3:20 PM devi said:
tumcha didhi cha bhatmy khup chagly asthth
On 7/15/2010 2:55 PM suniti said:
chukalelyala vat dakhavane he mothe punnyache kam aahe. te kartana aapan karayche aani kelyaver he "tyane kele"ase mhanayche.,samajayche. tarch aapan khare varkari.
On 7/15/2010 2:37 PM amol said:
की
On 7/15/2010 2:22 PM dgp said:
माउली सगळी वाट दाखवते आणि मदत पण करते. छान वाटला लेख , डोळे पाणावले वारीला येऊ न सकल्याची खंथ मनात आहेच
On 7/15/2010 1:43 PM Amol said:
खूप चं न पण यासाठी एक करता येईल. प्रत्येक वर्कार्याजवळ एक माहितीपुरंना पेप्पर देता येईल त्यमुळे त्यंना चुकले तरी मदत होईल
On 7/15/2010 1:06 PM Narendra said:
देव उभा पुढे मागे !!! मग काळजी कशाची ? तो असा कोणाच्या रुपात मदतीला उभा असतोच ! बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री द्यानदेव तुकाराम !!! पंढरीनाथ महाराज कि जय !!!
On 7/15/2010 1:02 PM vishal bhau said:
माउली माउली !!! धन्यवाद आपल्या सहकार्याबद्दल .... वारीत चक्क देव सापडतो तो असा ..
On 7/15/2010 12:15 PM nitin walunj said:
जनसेवा हीच ईश्वर सेवा तुमच्या दिंडीच्या बातम्या रोज वाचून दिंडीत आपण आहोत असे वाटते.
On 7/15/2010 12:00 PM Amar said:
Bhat साहेब...शांत व्हा.. changale kaam kele manhe te swatachech aase samaju naka.....baghanara baghtoy....
On 7/15/2010 11:52 AM Kc said:
हा लेख वाचून माझे डोळे पाणावले
On 15-07-2010 11:50:28 yogesh kulkarni said:
chaaaaaaaaaaaaaaaaannnnnnnnnnnnn..............................................
On 7/15/2010 10:50 AM Chavan said:
mauli Dnyaneshwar Mauli chalali Pandharila VithurayaChya Bhetila
On 7/15/2010 10:12 AM avinash bhosale said:
वारीतील प्रत्येक माणसाला mobile घेऊन देण्याची माझी इच्छा आहे कोणी मला मदत करेल का?
On 7/15/2010 9:22 AM suryakant kale said:
तुमी खूप चागलं काम केल, मी परभणी जिला चा .जनसेवा हीच ईश्वर सेवा. सर्व मदतीच्या हातांना विठू माउली नक्की पावणार. त्यांना पण दिंडीत चाल्याचा पुण्या लाभणार.
On 7/15/2010 9:20 AM Appa said:
अप्रतिम लेख !!! पंढरीची वारी हा चित्रपट वाचकांनी जरूर पाहावा...एका प्रकारचे समाधान देऊन जातो तो....आणि नकळत आपण वारीचा भाग होऊन जातो...
On 7/15/2010 9:15 AM Bhat said:
dakhavalis Layaki,,, me pana ,,, mhanje amhi jeu ghalto,,, ashe lok ani he punha puja sangnare ghya adarsh,,,
On 7/15/2010 8:59 AM milind said:
अभिनंदन
On 7/15/2010 4:01 AM SP said:
सुंदर लेख आहे
On 15/07/2010 3:10 AM umesh bhosale said:
किती दिवस मराठी माणूस जमिनी विकून पालखी मागे धावणार ! महाराष्ट्र मराठी माणसाचा नाही राहिला, कदाचित १०-२० वर्ष्यात अमराठी लोक महाराष्ट्र पालखी कायदेशीर बंद पडतील, हे सत्य आहे, मी पण मराठी आहे, पण मुंबई मराठीची स्थिती १० वर्ष्यापुर्वी आणि पुण्यात सध्या फारच वाईट आहें, सातारा नाशिक आणि मग नागपूर , झाले महाराष्ट्राचे कल्याण, विठ्ठल विठ्ठल !!!!!
On 7/15/2010 12:08 AM ajit vartak said:
विस्वनाथ गरुड ह्यांचा हा लेख वाचून खूप समाधान आणि आनंद वाटला. चांगला लेख लिहिल्या बद्दल अभिनंदन
On 7/14/2010 11:42 PM Suhas Kulkarni said:
अप्रतिम लेख आहे, मनस्वी समाधान झाले
On 14/07/2010 23:20 raghu said:
mala tumacha lekh wachun phar phar anand zala.
On 7/14/2010 11:05 PM Rishi said:
"Jai hari Vithal" sakal ne swatachi publicity karu naye. varkari parampara hi atishay pauranik ahe ani pahilya pasun varkari harvat asnar ani palkhi ani vithu mauli tyanchi kalji ghet asnarach. Sakal ne changle kam kele ahe pan tyacha asa publicity stunt mhanun vapar karun tyache pavitrya kami karu naye ashi vinanti
On 7/14/2010 9:35 PM r.d.kulkarni said:
तुमच्या दिंडीच्या बातम्या रोज वाचून दिंडीत आपण आहोत असे वाटते.आम्ही १९९८ साली अमरनाथला जाऊन आल्यावर मित्रांनी स्फूर्ती घेऊन पुढील वर्षापासून निवृत्तीनाथांच्या यात्रेत नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर एक दिवस भंडारा ठेऊन येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला पोटभर जेऊ घालून सेवा करतो.
On 7/14/2010 8:35 PM माउली तुझ्या पदरात घे said:
सुंदर आहे. पण एक खटकलं, मुद्रिकाबाईंना दिंडी आतापर्यंत सापडली असेल म्हणजे काय? आणि नसेल तर काय? एक विचार.
On 7/14/2010 8:24 PM Ganesh said:
विठ्ठल विठ्ठल
On 14/07/2010 20:15 prasad said:
जनसेवा हीच ईश्वर सेवा. सर्व मदतीच्या हातांना विठू माउली नक्की पावणार. त्यांना पण दिंडीत चाल्याचा पुण्या लाभणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
On 7/14/2010 8:07 PM Raau said:
छान लेख आहे...
On 7/14/2010 7:56 PM rahul said:
चांगली goshta केलीत आपण..... Dindhyanna manage करण्यासाठी आणि ashya हरवलेल्या varkaryanna मदतीसाठी ekhadi चांगली संस्था pudhe यायला pahije....
On 7/14/2010 7:36 PM rahul jagdale said:
तुमचा इ सकाळ वाचून खूप आनंद झाला. धन्यवाद.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: