Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

दलित न्यायापासून वंचितच
-
Thursday, July 15, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: dalit,  court,  mumbai,  maharashtra,  khairlanji case,   crime

मुंबई - खैरलांजी येथील दलित कुटुंबाच्या क्रूर हत्याकांडातील आरोपींना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फाशीऐवजी आज जन्मठेपीची शिक्षा सुनावल्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांसह दलित संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा करावी, अशी मागणी अत्याचारग्रस्त कुटुंबासह दलित व पुरोगामी संघटनांकडून यापूर्वी करण्यात आली होती. मात्र आज नागपूर खंडपीठाने आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने नाराजी उमटली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे रिपब्लिकन व परिवर्तनवादी चळवळीला धक्का बसला आहे. आरोपींची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयातही कायम राहील ही अपेक्षा फोल ठरली, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीचे निमंत्रक माजी खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आपण सरकारला विनंती करणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) चे अध्यक्ष टी. एम. कांबळे यांनी खैरलांजी प्रकरणी सरकार व सीबीआय तपास करण्यात कुचकामी ठरल्याने फाशीची शिक्षा रद्द झाल्याचा आरोप केला आहे. या निर्णयामुळे जातीयवादाला प्रोत्साहन मिळेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आरोपींची फाशी रद्द झाल्याने दलित न्यायापासून वंचित राहिल्याची प्रतिक्रिया भारतीय दलित पॅंथरचे नेते दयाल बहाद्दूरे यांनी व्यक्त केली आहे.
प्रतिक्रिया
On 7/16/2010 1:57 PM SANDIP BORADE said:
HANG थेम TILL THEIR DEATH. THOSE WHO WERE INVOLVED IN THIS SHAMEFUL ACT AND THE VERDICT SHOULD ALSO BE CHECKED ONCE AGAIN OTHERWISE NOBODY WILL TRUST THE JUDICIARY SYSTEMS IN THIS COUNTRY. IT SHOULD HAPPEN WITH THE POLITICIANS WHO SUPPORTED TO THIS SHAMEFUL ACT.
On 7/16/2010 10:13 AM Anil said:
गावोगावी दलित मजुरांना सर्रास शिवीगाळ, मारहाण होते. ते सर्वच गुन्हे नोंदवत नाहीत. गुन्हा नोंदवायला गेल्यास पोलिसांकडून शिकवणी घेतली जाते. घरं जाळणे, दगडफेक हे नित्याचे आहे. हे इतर कुणाच्या वाट्याला येत नाही. आख्खं गाव एका कुटूंबावर चालून आलं, महिलांवर बलात्कार झाले, लहान मुलांना हाल करून मारले.. हा राग जातीवरून होता. भोतमांगे इतर जातीचे असते तर प्रकरण इतकं टोकाला गेलं असतं ? उद्या दिनेश वगैरेंच्या घरावर ही पाळी येऊ नये ही प्रार्थना.स्वसंरक्षणार्थ दलितांना शस्त्र हाती घ्यायला लागू नये.
On 7/15/2010 2:17 PM Ganesh said:
दलित न्यायापासून वंचितच... 5000 varsha pasun hech hot ale ahe...ata tari jagoo dya .Manuvadyanoo...
On 7/15/2010 2:18 PM kiran bolke said:
दलित न्यायापासून वंचितच.काय लिहिता,उगाचच जातीभेद करतात.तुम्ही तर असं बोलतात जसं उच्च जातीच्या लोकांनाच न्याय मिळतो.लिहितांना तरी भान ठेवत जावे.उगाचच तेढ निर्माण करतात.याचं बरं आहे काहीच नाही झालं तर जात पुढे करून खोटे गुन्हे दाखल करतात. न्यायव्यवस्थेवरून माझा विश्वास उडाला आहे, वाईट कृत्यअ पेक्षा शिक्षा फार कमी झाली. पुन्हा: विचार झाला पाहिजे.
On 7/15/2010 1:47 PM hussain said:
अरे भाई हम मुस्लीम लोगो पर भी काफी अत्याचार होते है. लेकीन इन लोगोन को वो दिखते नाही .. ये लोग सिर्फ जब दलित लोगोन्पर अत्याचार होते है तभी चील्लाते है ! इस देश मे मुस्लीम लोगो कि बात सुन्नेवला कोई नाही है! या अल्ला हमारी रक्षा करना !
On 15/07/2010 13:20 Prasad said:
"या निर्णयामुळे जातीयवादाला प्रोत्साहन मिळेल": रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) चे अध्यक्ष टी. एम. कांबळे. जर जातीय वाद थाब्वायाचा असेल तर का पीडितांची जात सांगता? गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे पण ह्या दुर्दैवी घटनेच्या आधारे जातीचे राजकारण करू नये, कृपा करून.
On 7/15/2010 1:19 PM dinesh said:
दलित न्यायापासून वंचितच.काय लिहिता,उगाचच जातीभेद करतात.तुम्ही तर असं बोलतात जसं उच्च जातीच्या लोकांनाच न्याय मिळतो.लिहितांना तरी भान ठेवत जावे.उगाचच तेढ निर्माण करतात.याचं बरं आहे काहीच नाही झालं तर जात पुढे करून खोटे गुन्हे दाखल करतात.
On 7/15/2010 1:00 PM vishal said:
हे असाच होणार असे वाटतच होते गरिबांना कोणी वाली राहिला नाही हेच ह्या निर्णयामुळे सिद्ध झाले आहे.
On 7/15/2010 10:26 AM Rahul said:
न्यायव्यवस्थेवरून माझा विश्वास उडाला आहे, वाईट कृत्यअ पेक्षा शिक्षा फार कमी झाली. पुन्हा: विचार झाला पाहिजे.
On 7/15/2010 10:15 AM nanu said:
एकीकडे महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायचे आणि दुसरीकडे मानवतेला काळिमा फासणारे गुन्हे होतात. व त्यातले गुन्हेगार मस्त मजा करतात. सरकार पिडीत लोकांची बाजू मांडण्यास नेहमी कुचकामी का ठरते? त्यांच्या जागेवर जर एखादा नेता किवा त्याचा परिवार असता तर ? ह्या लोकांकडून न्यायाची अपेक्षा करणेच चुकीचे आहे.
On 15-07-2010 09:32:24 sanghratna said:
गुनेगाराना शिक्षा झालीच पाहिझे आसे नाही परंतु त्यांचा गुण ध्यानात घेतला तर फाशीच काय कुठलाही शिक्षा कमी पडते (कसाब )
On 7/15/2010 8:47 AM arun said:
गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली असती तर आधीच्या दहा फाशीच्या आरोपीन्सारखे हेही रिकामे बसले असते. त्यापेक्षा जन्मठेपेने निदान शिक्षा तरी भोगतील.
On 2010/07/15 8:24 Dev said:
हि खरच न्यायाची हार आहे.... .. न्यायव्यवस्थेच्या अश्या साहाय्यमुळे भारतात अजूनही असे कांड होताच आहेत..... न्यायव्यवस्थे /शासनाने ह्याचा विचार करायला पाहिजे..... .....ACTROCITY ACT चा अर्थ काय ?


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: