भुवनेश्वर - ओरिसात माओवादग्रस्त मयूरभंज जिल्ह्यात पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी रात्री उशिरा 15 वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या केली. माओवाद्यांनी एखाद्या अल्पवयीन मुलाची हत्या करण्याची ही राज्यातील बहुधा पहिलीच घटना असावी.
सुकांत मुरमू असे मृत तरुणाचे नाव असून, तो पश्चिम बंगालच्या सीमेला लागून असलेल्या हंडीभंगा गावातील रहिवासी होता.
रात्री दीडच्या सुमारास सुमारे तीस माओवाद्यांनी घराला घेराव घालून सुकांतला मारहाण करीत घराबाहेर काढले. त्यानंतर त्याचे हात बांधून कुटुंबीयांसमोरच त्याचा गळा चिरण्यात आल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली. बंगालमधील जंगलात पळून जाताना माओवाद्यांनी या वेळी रामचंद्र मरांडी या होमगार्डच्या घराची जाळपोळही केली. घरातील वस्तूही लुटल्या. सुदैवाने मरांडी, तसेच त्याचे कुटुंबीय घरी नव्हते. माओवादी कारवायांची माहिती तो पोलिसांना पुरवीत असल्याचा त्यांचा संशय होता.
Follow
Us on
Twitter