Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

हॉकी इंडियाला 'आयएचएफ' न्यायालयात खेचणार
-
Wednesday, July 21, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: sports,  hockey,  india,   ihf,   court

नवी दिल्ली - "हॉकी इंडिया'च्या निवडणुकीचे काही खरे नाही. सदस्यात्वाच्या मान्यतेवरून सुरू असलेली न्यायालयीन लढाई, केंद्रिय क्रीडा मंत्रालयाच्या अटींबरोबर आता भारतीय हॉकी महासंघाच्या (आयएचएफ) न्यायालयात खेचण्याच्या इशाऱ्यामुळे हॉकी इंडियाच्या निवडणुकीसमोर नवे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने 22 मे रोजी हॉकी इंडियाच्या निवडणुक प्रक्रियेतून "आयएचएफ'ला दूर ठेवता येणार नाही, असा आदेश दिला होता. मात्र, हॉकी इंडियाने प्रत्यक्षात "आयएचएफ'शी कुठलाच संपर्क ठेवलेला नाही. त्यामुळे आता हॉकी इंडियावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दावा ठोकण्याचा इशारा "आयएचएफ'ने दिला. दिल्लीतील अव्वल वकिलांशी चर्चा करून आपण अंतिम निर्णय घेऊ, असेही "आयएचएफ'ने आज स्पष्ट केले.

"आयएचएफ'चे अध्यक्ष के. पी. एस. गिल म्हणाले, ""हॉकी इंडियाच्या एकूणच निवडणूक प्रक्रिया संशयास्पद आहे. मुळात ए. के. मट्टू आणि अस्लम शेर खान यांच्या राजिनाम्यानंतर हॉकी इंडियाकडे पुरेसे सदस्यही नाहीत. त्यामुळे ते नोंदणीकृत संस्थेतही मोडत नाहीत.'' दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परगटसिंग यांच्या पाठीशी "आयएचएफ' उभे आहे. परगट अध्यक्ष बनल्यास त्याला पूर्ण सहकार्य करण्याची तयारीही "आयएचएफ'ने ठेवली आहे. परगट माजी खेळाडू असून, ते "आयओए'च्या कार्यपद्धतीविरुद्ध आहेत, त्यामुळेच त्यांना सहकार्य करण्याची "आयएचएफ'ची तयारी ठेवली असावी, अशी चर्चा सध्या दिल्लीत सुरू आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: