Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

वैष्णवांच्या गर्दीने आला चंद्रभागेस भक्तीचा महापूर
-
Wednesday, July 21, 2010 AT 12:15 AM (IST)

पंढरपूर - दशमीनिमित्त चंद्रभागेत स्नानासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली. दशमी व एकादशीला चंद्रभागेच्या स्नानाला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे.

कैवल्यमूर्ती संत ज्ञानेश्‍वर महाराज व जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल (ता. 19) वाखरी मुक्कमी विसावला. दुपारी सोहळ्यातील आज शेवटच्या रिंगणानंतर पालख्या पंढरीकडे मार्गस्थ झाल्या. त्यापूर्वी छोट्या-मोठ्या दिंड्या चंद्रभागेच्या वाळवंटात दाखल झाल्या. विठूनामाचा गजर करीत वारकऱ्यांनी चंद्रभागेत स्नान केले. काहींनी नदीची खणानारळाने ओटी भरून पूजा केली, दिवे सोडले. वाळवंटात शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली. काल (ता. 19) पहाटेपासून दगडीपुलाजवळील बंधाऱ्यातून नदीत पाणी सोडल्याने वारकऱ्यांच्या स्नानाची सोय झाली. नदी पात्रातील पाणी अस्वच्छ झाले होते. नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी वारकऱ्यांमधून सुरू होती.

खेळ मांडीयेला वाळवंटी
वारकऱ्यांच्या राहुट्यांनी वाळवंटाचा परिसर फुलला आहे. टाळ-मृदंगाच्या तालावर भजन, कीर्तन व भारुडे सुरू होती. फुगड्या, सुरपाट्यांचे खेळ रंगले होते.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: