Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यात पावसामुळे काही प्रमाणात वाढ
-
Sunday, July 25, 2010 AT 08:23 PM (IST)
Tags: rain,  monsoon,  dam,   nashik,   north maharashtra

नाशिक - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणांतील साठ्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. पिकांना वेळेत पाणी मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, पावसाने आजही हजेरी लावली.

शुक्रवार (ता. 23)पासून जिल्ह्यात चांगला पाऊस होत आहे. काल (ता. 24) दिवसभरात झालेला पाऊस तालुकानिहाय असा ः नाशिक 32 मि.मी., पेठ 117, इगतपुरी 97, दिंडोरी 26, त्र्यंबकेश्‍वर 100, निफाड 18, सिन्नर 13.4, येवला 16, मालेगाव 5, चांदवड 14, नांदगाव 3, कळवण 18, सुरगाणा 62, देवळा 6, बागलाण 7. अशा रीतीने एकूण 534 मिलिमीटर पाऊस काल झाला. आजही दिवसभर रिमझिम सुरू होती. जिल्ह्यात आतापर्यंत 5553 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात मोठ्या व मध्यम प्रकल्पाच्या 22 धरणांच्या परिसरात चांगला पाऊस होत आहे. जिल्ह्यातील धरणांतील आजचा साठा (दशलक्ष घनफुटात) असा ः दारणा 4313, गंगापूर 1916, पालखेड 190, करंजवण 810, ओझरखेड 154, वाघाड 270, कडवा 362, मुकणे 228, आळंदी 107, कश्‍यपी 289, पुणेगाव 138, वालदेवी 340, चणकापूर 720, केळझर 61, हरणबारी 274, गिरणा 1418, गौतमी गोदावरी 332, भावली 916.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: