स्टुअर्ट ब्रॉड, कॉलिंगवूडचे कसोटीसाठी संघात पुनरागमन
वृत्तसंस्था
Monday, July 26, 2010 AT 12:00 AM (IST)
पाकविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघ जाहीर
लीड्स - पाकिस्तानविरुद्ध बुधवारी (ता. 29) सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी इंग्लंड संघात वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि पॉल कॉलिंगवूड यांचे पुनरागमन झाले. इंग्लंड निवड समितीने रविवारी संघाची घोषणा केली.
ब्रॉड आणि कॉलिंगवूड यांना बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्याच वेळी एकदिवसीय सामन्यासाठी विशेषज्ञ मानण्यात येणाऱ्या इयॉन मॉर्गनला कसोटीसाठी एक संधी देण्यात आली. पायाच्या दुखापतीमुळे एक महिनाभर क्रिकेटपासून दूर राहिलेल्या केविन पीटरसनलाही या संघात स्थान मिळाले आहे.
बांगलादेशविरुद्ध सातत्यपूर्ण कामगिरी करणारा इयान बेल मात्र या मालिकेत दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. स्टीवन फिन आणि अजमल शहजाद हे इंग्लंड संघातील अन्य दोन वेगवान गोलंदाज असतील.
इंग्लंड संघ - ऍण्ड्रयू स्ट्रॉस (कर्णधार), ऍलिस्टर कूक, जोनाथन ट्रॉट, केविन पीटरसन, पॉल कॉलिंगवूड, इयॉन मॉर्गन, मॅट प्रायर (यष्टिरक्षक), ग्रॅमी स्वान, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, स्टिवन फीन, अजमल शहजाद.