Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पुण्यात स्वाइन फ्लूमुळे आणखी दोघांचा मृत्यू
-
Tuesday, July 27, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: swine flu,   h1n1,   pune

पुणे - पुण्यात स्वाइन फ्लूमुळे आणखी दोन रुग्णांचा सोमवारी मृत्यू झाला. यामुळे एक एप्रिलपासून या रोगाने शहरात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 64 झाली आहे.

जितिन भीमराव शिंगोडे (वय 29, रा. आळंदी रस्ता, येरवडा) यांच्यावर इनलॅक्‍स बुधराणी रुग्णालयात 20 जुलैपासून उपचार सुरू होते. 17 जुलैपासून त्यांच्यात स्वाइन फ्लूची लक्षणे दिसत होती. रविवारी अचानक त्यांना छातीत वेदना सुरू झाल्या. श्‍वसनास त्रास होऊ लागला. उपचारादरम्यान सकाळी साडेनऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला. जयश्री गणपत कचरे (वय 40, रा. जामखेड, नगर) या पाच जुलैपासून आजारी होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे 13 जुलैला त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

शहरातील चार शाळांमधील 11 विद्यार्थ्यांना, तर तीन महाविद्यालयांतील तीन विद्यार्थ्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे सोमवारी निदान झाले. सात जूनला शाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत 62 शाळा-महाविद्यालयांतील 81 विद्यार्थ्यांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला आहे. तर गेल्या वर्षी स्वाइन फ्लूची साथ सुरू झाल्यापासून 274 रुग्ण दगावले आहेत.

Follow
Us on
Twitter
प्रतिक्रिया
On 7/27/2010 6:33 PM Pawar Abhang said:
गेल्या दोन वर्ष्यावापूर गरीब लोकच मरतात मानून राजकारण्यांना काळजी नाही सविन फ्लू अजित पवारांना होऊ दे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: